Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • bigg boss marathi 6 |
  • T20 World Cup 2026 |
  • Gold Rate |
  • Marathi News |
  • Marathi News
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

ट्रम्प यांनी पुन्हा दाखवला इंगा! कोर्टाच्या निर्णयाला केराची टोपली दाखवत जगावर १५% टॅरिफची घोषणा

Donald Trump Global Tariff : डोनाल्ड ट्रम्प अमेरिकन न्यायालयाच्या आदेशाला झुगारत पुन्हा एकदा संपूर्ण जगावर टॅरिफ लादले आहे. त्यांनी १२२ कलम अंतर्गत लावलेले टॅरिफ १०% वरुन १५% पर्यंत वाढविण्याची घोषणा केली आहे.

  • By स्वराली शहा
Updated On: Feb 22, 2026 | 08:45 AM
Donald Trump Global Tariff

Donald Trump Global Tariff

Follow Us
Close
Follow Us:
  • ट्रम्प यांचाय सुप्रीम कोर्टाला दणका
  • न्यायालयाच्या निर्णयाला केराची टोपली
  • जगावरील कर १०% वरुन १५% ची घोषणा
Donald Trump Tariff News in Marathi : वॉशिंग्टन : अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प (Donald Trump) यांनी पुन्हा एकदा आक्रमक भूमिका घेतली आहे. अमेरिकेच्या सर्वोच्च न्यायालयाने ट्रम्प यांचा टॅरिफ प्लॅन असंवैधानिक घोषित केल्यानंतर अवघ्या तीन तासांतच त्यांनी जगावर १०% कर लादला होता, जो आता १५% पर्यंत केला आहे. यामुळे संपूर्ण जगभरात खळबळ माजली आहे. ट्रम्प यांनी न्यायालयाच्या निर्णयाला केराची टोपली दाखवत कर वाढवण्याची घोषणा केली आहे.

‘मोदी माझे मित्र, पण…’ ; सुप्रीम कोर्टाच्या निर्णयानंतर ट्रम्प यांचा भारताला टॅरिफबाबत मोठा इशारा

न्यायालयाने ट्रम्प यांच्या टॅरिफला ठरवले बेकायदेशीर

शुक्रवारी (२० फेब्रुवारी) अमेरिकेच्या सर्वोच्च न्यायालयाने ट्रम्प यांनी १९७७ च्या इंटरनॅशनल इमर्जन्सी इकॉनॉमिक पॉवर्स ॲक्ट अंतर्गत जगावर लादलेल्या टॅरिफ बेकायदेशीर असल्याचे सांगत रद्द केले होते. ६-३ अशा बहुमताने अध्यक्ष ट्रम्प यांचा विविध देशांतून येणाऱ्या मालावर लागू केलेला टॅरिफ (Tariff) न्यायालयाने बेकायदेशीर असल्याचे म्हटले. न्यायालयाने सांगितले की, अशा प्रकारे टॅरिफ लादण्याचा अधिकार राष्ट्राध्यक्षांना नाही. न्यायालयाच्या या निर्णयामुळे जागतिक बाजारपेठांना दिलासा मिळाला होता.

न्यालयाच्या निर्णयावर ट्रम्प यांची टीका

मात्र ट्रम्प यांनी ट्रुथ सोशल मीडियावर पोस्ट करत न्यायालयाच्या निर्णयावर तीव्र टीका केली. ट्रम्प यांनी न्यायालयाच्या निर्णयावर कडक शब्दात टीका करत निर्णय हास्यास्पद असल्याचे म्हटले. न्यायालयाच्या निर्णयानंतर तीन तासांच्या आत त्यांनी जगावर १०% कर लादण्याच्या कार्यकारी आदेशावर स्वाक्षरी केली.

हा कर ट्रम्प यांनी कलम १२२ अंतर्गत १५० दिवसांसाठी लागू केला. त्यांच्या मते, न्यायालयाने त्यांचा निर्णय रद्द करु अमेरिकेत मोठे संवैधानिक संकट उभे केले आहे. दरम्यान आता ट्रम्प यांनी १२२ कलम अंतर्गत लागू केलेला कर हा १० वरुन १५% पर्यंत करण्याची घोषणा केली आहे. यामुळे जागतिक बाजारपेठांमध्ये पुन्हा एकदा भूकंप आला आहे.

जगावर काय होणार परिणाम

ट्रम्प यांचे हे टॅरिफ केवळ शत्रू देश चीन पुरते मर्यादित नसून, भारत, युरोपीय देशांसारख्या धोरणात्मक मित्र राष्ट्रांवरही लादले आहेत. या निर्णयामुळे अमेरिकेत आयात केलेल्या वस्तूंची किंमत वाढून सामान्य नागरिकांच्या खिशावर ताण पडणार आहे. तसेच परिणामी इतर देशही अमेरिकेन उत्पादनांवर प्रचंड कर लादू शकतात. यामुळे जागतिक स्तरावर महागाई वाढण्याची शक्यता आहे.

भारतावर काय होणार परिणाम?

भारतासाठी हा निर्णय काहीसा दिलासादायक आहे. कारण ट्रम्प यांनी व्यापार करारानंतर भारतावर लादलेले १८% टॅरिफ न्यायालयाच्या निर्णयामुळे शून्य झाले आहे. मात्र १५ टक्के टॅरिफची टांगती तलावर पुन्हा लटकत आहे. यामुळे भारताच्या कापड, दागिने, आणि आयटी क्षेत्रातील निर्यातीवर परिणाम होण्याची शक्यता आहे.

US President Donald Trump posts – “…I, as President of the United States of America, will be, effective immediately, raising the 10% Worldwide Tariff on Countries, many of which have been “ripping” the U.S. off for decades, without retribution (until I came along!), to the… pic.twitter.com/kFZQJiJNnq — ANI (@ANI) February 21, 2026

सुप्रीम कोर्टालाही जुमानलं नाही! ट्रम्प यांचा ‘बदला’; जगभरातील देशांवर लादला १०% टॅरिफ

💡

Frequently Asked Questions

  • Que: ट्रम्प यांनी जगावर किती टक्क्यापर्यंत टॅरिफ वाढवले आहे?

    Ans: ट्रम्प यांनी १२२ कलम अंतर्गत लावलेले टॅरिफ १०% वरुन १५% पर्यंत वाढविण्याची घोषणा केली आहे.

  • Que: ट्रम्प यांनी जगावर १५% टॅरिफ का लादले आहे?

    Ans: ट्रम्प यांच्या मते, गेल्या अनेक दशकांपासून अनेक देशांनी अमेरिकेला लुटले आहे. यामुळे देशांतर्गत उत्पादनाला चालना देण्यासाठी आणि व्यापार तूट कमी करण्यासाठी जगावर टॅरिफ लादले आहे.

  • Que: ट्रम्प यांच्या निर्णयाचा जगावर काय परिणाम होईल?

    Ans: ट्रम्प यांच्या निर्णयामुळे जागतिक बाजारात खळबळ उडाली आहे. यामुळे जागतिक स्तरावर महागाई वाढण्याची शक्यता आहे. तसेच इतर देशही अमेरिकन उत्पादनांवर टॅरिफ लादू शकतात.

Web Title: Donald trump global tariff hikes from 10 percent to 15 percent

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Feb 22, 2026 | 08:44 AM

Topics:  

  • Donald Trump
  • Tariff
  • World news

संबंधित बातम्या

इराणची उलटी गिनती सुरु! अमेरिकेच्या ‘त्या’ बॉम्बने उडणार अणुकेंद्राच्या ठिकऱ्या, काय आहे ट्रम्प यांचा प्लॅन? 
1

इराणची उलटी गिनती सुरु! अमेरिकेच्या ‘त्या’ बॉम्बने उडणार अणुकेंद्राच्या ठिकऱ्या, काय आहे ट्रम्प यांचा प्लॅन? 

War Alert : मध्यपूर्वेत महायुद्ध पेटणार? अमेरिका-सौदीच्या ‘या’ कराराने उडाली इराणची झोप
2

War Alert : मध्यपूर्वेत महायुद्ध पेटणार? अमेरिका-सौदीच्या ‘या’ कराराने उडाली इराणची झोप

जगात खळबळ माजणार? अनेक देशांच्या अडचणी वाढणार!  ट्रम्प यांच्याकडे अजूनही आहे एक ‘ब्रह्मास्त्र…
3

जगात खळबळ माजणार? अनेक देशांच्या अडचणी वाढणार! ट्रम्प यांच्याकडे अजूनही आहे एक ‘ब्रह्मास्त्र…

Saudi-UAE वाद विकोपाला! क्राउन प्रिन्सचा यूएई Spy शेखला गंभीर इशारा; नेमकं प्रकरण काय?
4

Saudi-UAE वाद विकोपाला! क्राउन प्रिन्सचा यूएई Spy शेखला गंभीर इशारा; नेमकं प्रकरण काय?

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.