सुप्रीम कोर्टालाही जुमानलं नाही! ट्रम्प यांचा 'बदला'; जगभरातील देशांवर लादला १०% टॅरिफ (फोटो सौजन्य: सोशल मीडिया)
ट्रम्प यांनी आपल्या ट्रुथ सोशल मीडियावरुन या निर्णयाची घोषणा केली. त्यांनी लिहिले की, मला हे सांगातना खूप अभिमान वाटतो की, मी सर्व देशांवर १०% जागतिक टॅरिफ (Tariff) लावण्याच्या आदेशावर स्वाक्षरी केली आहे. हा निर्णय तात्काळ लागू होईल असे त्यांनी म्हटले. तसेच त्यांनी पत्रकार परिषदेत बोलताना, त्यांनचा निर्णय १९७४ च्या ट्रेड अक्टच्या कलम अंतर्गत लागू करण्यात आला असल्याचे आणि सध्या देशांवर असलेल्या टॅरिफ व्यतिरिक्त असल्याचे म्हटले.
शुक्रवारी (२० फेब्रुवारी), अमेरिकेच्या सर्वोच्च न्यायालयाने ६-३ अशा बहुमताने अध्यक्ष ट्रम्प यांचा विविध देशांतून येणाऱ्या मालावर लागू केलेले ‘टॅरिफ’ बेकायदेशीर ठरवला होता. न्यायालयाने म्हटले होते की, “राष्ट्राध्यक्षांनी आणीबाणीच्या अधिकारांचा वापर अशा प्रकारे करणे हे कायद्याच्या मूळ उद्देशाला हरताळ फासणारे आहे.” न्यायालयाने आणीबाणीच्या शक्तींच्या दुरुपयोग होत असल्याचे म्हटले.
हा निर्णय न्यायाधीशांच्या ९ खंडपीठाने दिला, ज्यामध्ये सॅम्युअल अलिटो, क्लेरन्स थॉमस आणि ब्रेट कवनुघ या तीन न्यायाधीशांनी टॅरिफच्या बाजूने मत व्यक्त करत ‘एक्झिक्युटिव्ह फ्लेक्सिबिलिटी’चे समर्थन केले. तर, इतर सहा न्यायाधीशांनी स्पष्ट केले की, आयात शुल्क लावण्याचे अधिकार राष्ट्रपतींना बहाल नाही. या निर्णयाने ट्रम्प प्रशासनाचे सर्व कार्यकारी आदेश तात्काळ प्रभावाने अमान्य ठरवले आहेत.
दरम्यान न्यायालयाच्या या निर्णयानंतर ट्रम्प यांनी तीव्र संताप व्यक्त केला होता. त्यांनी न्यायालयाचा निर्णय अत्यंत निराशाजनक असल्याचे म्हटले. त्यांनी म्हटले की, मी व्यापार थांबवू शकतो किंवा निर्बंध लावू शकतो, पण कर लागू शकत नाही, जे हास्यास्पद आहे.
सध्या ट्रम्प यांनी निर्णयाने संपूर्ण जगभरात खळबळ उडाली आहे. ट्रम्प यांच्या निर्णयामुळे जागतिक स्तरावर महागाई वाढण्याची शक्यता आहे. तसेच ट्रम्प यांच्या टॅरिफला प्रत्युत्तर देण्यासाठी भारत, चीन, युरोपीय देश टॅरिफ लादू शकतात, ज्यामुळे व्यापार युद्धाची ठिणगी उडेल. तसेच शेअर बाजारावरही याचा मोठा परिणाम होण्याची शक्यता आहे.
Ans: ट्रम्प यांनी जगभरातील देशांवर १०% जागतिक टॅरिफ लादण्याच्या कार्यकारी आदेशावर स्वाक्षरी केली आहे.
Ans: ट्रम्प यांनी न्यायालयाचा निर्णय अत्यंत निराशाजनक असल्याचे म्हटले. तसेच त्यांनी म्हटले की, हे अत्यंत हास्यास्पद आहे, मी व्यापार थांबवू शकतो, निर्बंध लादू शकतो, पण टॅरिफ लावू शकत नाही.
Ans: ट्रम्प यांच्या जागतिक टॅरिफमुळे महागाई वाढण्याची शक्यता आहे. तसेच भारत, चीन, युरोपीय देश प्रत्युत्तरात टॅरिफ लादल्यास व्यापार युद्ध सुरु होण्याची आशंका आहे. याशिवाय शेअर बाजारावरही याचा परिणाम होईल.






