Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • bigg boss marathi 6 |
  • T20 World Cup 2026 |
  • Gold Rate |
  • Marathi News |
  • Holi
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Greenland Controversy : ग्रीनलँडसाठी ट्रम्पची पुन्हा दादागिरी! विरोध करणाऱ्यांवर टॅरिफची तलवार

Greenland Dispute : ग्रीनलँडवरुन अमेरिका आणि युरोपीय देशांमध्ये तीव्र वाद भडकण्याची शक्यता आहे. ट्रम्प यांनी त्यांना विरोध करणाऱ्या देशांनी टॅरिफची धमकी दिली असून यामुळे युरोपीय देशात खळबळ उडाली आहे.

  • By स्वराली शहा
Updated On: Jan 17, 2026 | 03:59 PM
Greenland controversy

Greenland controversy

Follow Us
Close
Follow Us:
  • ग्रीनलँडसाठी ट्रम्प पुन्हा आक्रमक
  • विरोध करणाऱ्या देशांनी दिली टॅरिफची धमकी
  • युरोपमध्ये खळबळ
US Greenland Policy : वॉशिंग्टन : अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प (Donald Trump) पुन्हा एकदा ग्रीनलँडवरुन आक्रमक झाले आहेत. राष्ट्रीय सुरक्षाचा हवाला देत ट्रम्प यांनी ग्रीनलँड (Greenland) अमेरिकेसाठी महत्त्वाचे असल्याचे म्हटले आहे. तसेच यावर त्यांना विरोध करणाऱ्या देशांवर टॅरिफ लावण्याची धमकी ट्रम्प यांनी दिली आहे. यामुळे युरोपसह जागतिक राजकारणात मोठी खळबळ उडाली आहे.

Greenland Mystery : नकाशावर अमेरिकेत, पण मालक युरोपचा! ग्रीनलँड आजही डेन्मार्कचा गुलाम? यामागचं गूढ काय?

ग्रीनलँड अमेरिकेकडे असल्यास नाटो अधिक मजबूत होईल – ट्रम्प

ट्रम्प यांनी असा युक्तिवाद केला आहे की, नाटोची लष्करी ताकद अमेरिकेवर अवलंबून आहे. ट्रम्प यांच्या कार्यकाळातच नाटो अधिक शक्तिशाली झाला असून ग्रीनलँड अमेरिकेकडे असल्यास ही ताकद आणखी वाढेल असा दावा ट्रम्प यांनी केला आहे. ट्रम्प यांनी एका परिषेदत राष्ट्रीय सुरक्षेचा हवाला देत ग्रीनलँड अमेरिकेसाठी महत्त्वाचा असल्याचेही म्हटले आहे. त्यांनी ग्रीनलँडवर अमेरिकेच्या नियंत्रणाला विरोध करणाऱ्या देशांवर टॅरिफचा पर्याय असल्याची धमकी दिली आहे.

याशिवाय वॉशिंग्टनमधील व्हाईट हाउसमधून ग्रीनलँडवर लष्करी कारवाईचेही संकेत मिळेल आहे. व्हाइट हाउसच्या मते, ट्रम्प आर्क्टिक प्रदेशात रशिया आणि चीनची वाढती उपस्थिती टाळण्याचा प्रयत्न करत आहे. यासाठी ते अमेरिकेच्या नियंत्रणाखाली असणे महत्त्वाचे असल्याचे ट्रम्प यांचे मत आहे. येथून रशिया आणि चीनच्या लष्करी हालचालींवर सहज लक्ष ठेवता येईल असे त्यांनी म्हटले आहे. यासाठी ट्रम्प यांचे विशेष दूत डेन्मार्कला भेट देण्याची शक्यता आहे.

युरोपमधून तीव्र प्रतिक्रिया

ट्रम्प यांच्या या धमकीवर युरोपमधून तीव्र प्रतिक्रीय उमटत आहेत. फ्रान्सचे राष्ट्राध्यक्ष इमॅन्युएल मॅक्रॉन यांनी ग्रीनलँडवर हल्ल्याचा विचारचही करु नका असा इशारा दिला आहे. तसेच इतर युरोपीय देशांनी ग्रीनलँडच्या सुरक्षा आणि प्रादेशिक सार्वभौमत्वावर कोणतीही तडजोड केली जाणार नाही असा इशाराही दिला आहे. सध्या ग्रीनलँडवरुन अमेरिका आणि युरोपीय देशांमधील वाद अधिक तीव्र होताना दिसत आहे.

ग्रीनलँडमध्ये लष्करी तैनाती 

याच पार्श्वभूमीवर डेन्मार्कच्या विनंतीवरुन नाटो देशांनी मोठे पाऊल उचचले आहे. नाटो देशांनी ग्रीनलँडमध्ये आपले सैन्य तैनात केले आहे. यामध्ये सहा देशांचा समावेश आहे. डेन्मार्कच्या विनंतीवरुन स्वीडन, नॉर्वे, जर्मनी, फ्रान्स, नीदरलँड्स, आणि कॅनडाने ग्रीनलँडमध्ये आपले लष्कर पाठवले आहे. नाटो देशांची ही तैनाती डोनाल्ड ट्रम्प यांच्या ग्रीनलँडवरील ताबा घेण्याच्या निर्णयाला थेट आव्हान मानले जात आहे.

Greenland Crisis : खनिजांची भूक अन् सत्तेची हाव! वॉशिंग्टनमध्ये चर्चा फिसकटली; ग्रीनलँडच्या मालकीवरून पुन्हा ‘महाभारत’

💡

Frequently Asked Questions

  • Que: ग्रीनलँड अमेरिकेसाठी महत्त्वाचा का आहे?

    Ans: ग्रीनलँडचे भौगोलिक स्थान आर्क्टिकमधझ्ये धोरणात्मकदृष्ट्या अधिक महत्त्वाचे आहे. येथे लष्करी उपस्थिती वाढल्यास नाटोची ताकद अधिक मजबूत होईल. तसेच येथून चीन-रशियाच्या हालचालींवर नजर ठेवता येईल. यामुळे ग्रीनलँड अमेरिकेसाठी महत्त्वाचे आहे.

  • Que: ट्रम्प यांनी ग्रीनलँडवरुन कोणाला धमकी दिली?

    Ans: ट्रम्प यांनी त्यांच्या ग्रीनलँडवरील नियंत्रण मिळवण्याच्या योजनेला समर्थन न करणाऱ्या देशांनी ट्रम्प यांनी टॅरिफची धमकी दिली आहे.

  • Que: ट्रम्पच्या टॅरिफ धमकीवर युरोप-फ्रान्समधून काय प्रतिक्रिया येत आहेत?

    Ans: ट्रम्प यांच्या टॅरिफ धमकीवर फ्रान्सचे अध्यक्ष इमॅन्युएल मॅक्रॉन यांनी ग्रीनलँडलवर हल्ला न करण्याचा इशारा दिला आहे. तसेच युरोपीय देशांनी डेन्मार्कच्या समर्थनार्थ लष्करी आणि राजकीय पातळीवर भूमिका घेतली आहे.

Web Title: Donald trump greenland threat new tarrif on europian countries

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jan 17, 2026 | 03:59 PM

Topics:  

  • Donald Trump
  • Greenland
  • World news

संबंधित बातम्या

Israel-Iran War: खामेनेईंनंतर आता इराणच्या माजी राष्ट्राध्यक्षांचा खात्मा! इस्रायलच्या भीषण हल्ल्याचा थरकाप उडवणारा Video समोर
1

Israel-Iran War: खामेनेईंनंतर आता इराणच्या माजी राष्ट्राध्यक्षांचा खात्मा! इस्रायलच्या भीषण हल्ल्याचा थरकाप उडवणारा Video समोर

Iran Israel युद्ध आणखी पेटलं! खामेनेईंच्या मृत्यूनंतर इराणचा ओमानच्या जहाजावर हल्ला; भारतीय भरडले
2

Iran Israel युद्ध आणखी पेटलं! खामेनेईंच्या मृत्यूनंतर इराणचा ओमानच्या जहाजावर हल्ला; भारतीय भरडले

आधी शिक्षण घे..वैज्ञानिक हो…; शहीद होण्याची इच्छा व्यक्त करणाऱ्या चिमुरड्याला खामेनेईचा मोलाचा सल्ला, ‘तो’ VIDEO व्हायरल
3

आधी शिक्षण घे..वैज्ञानिक हो…; शहीद होण्याची इच्छा व्यक्त करणाऱ्या चिमुरड्याला खामेनेईचा मोलाचा सल्ला, ‘तो’ VIDEO व्हायरल

Iran-Israel War: महायुद्ध संपले नाही! इराणच्या मशिदीवर ‘लाल झेंडा’, रक्ताचा बदला घेण्याची गर्जना; ट्रम्पनेही दिली ‘भयंकर’ धमकी
4

Iran-Israel War: महायुद्ध संपले नाही! इराणच्या मशिदीवर ‘लाल झेंडा’, रक्ताचा बदला घेण्याची गर्जना; ट्रम्पनेही दिली ‘भयंकर’ धमकी

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.