
Donald Trump reaction to Robert Mueller death
रॉबर्ट म्युरल गेल्या अनेक वर्षांपासून पार्किन्सन आजाराने त्रस्त होते. या आजारामुळे वयाच्या ८१ व्या वर्षी त्यांचे निधन झाले आहे. शुक्रवारी(२० मार्च) त्यांनी अखेरचा श्वास घेतला. म्यूलर यांच्या निधनाची बातमी समजताना ट्रम्प यांनी त्यांच्या ट्रुथ सोशल मीडियावर अत्यंत असंवेदनशील पोस्ट केली. त्यांनी म्हटले की, आज रॉबर्ट एस. म्यूलर III राहिले नाहीत. ही चांगली गोष्ट आहे. मला तो मेल्याचा आनंद आहे, कारण आता तो निरपराध लोकांना त्रास देऊ शकणार नाही. ट्रम्र यांच्या या विधानामुळे त्यांना प्रचंड ट्रोल केले जात आहे. सध्या यामुळे त्यांचा म्यूलर यांच्यावरील वैयक्तिक राग आणि शत्रुत्व समोर आले आहे.
ट्रम्प आणि म्यूलर यांच्यातील वादाचे मूळ कारण २०१६ मधील अमेरिकन राष्ट्राध्यक्ष निवडणुक आहे. यावेळी रशियाने निवडणुकीत हस्तक्षेपण केल्याच्या कथित आरोपांची आणि ट्रम्प यांच्या मोहिमांशी संबंध असल्याची चौकशी करण्यत आली होती. यावेळी रॉबर्ट म्यूलर यांची स्पेशल काऊन्सिल म्हणून नियुक्त करण्यात आली होती. या चौकशीमुळे ट्रम्प पहिल्या राजकीय कार्यकाळात वादळात सापडले होते. तेव्हापासून ट्रम्प आणि म्यूलर यांच्यात तणाव निर्माण झाला.
एकीकडे ट्रम्प यांनी म्यूलर यांच्या मृत्यूवर आनंद व्यक्त केला आहे. तर दुसरीकडे अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष बराक ओबामा यांनी त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली वाहली आहे. त्यांनी म्हटले की, म्यूरल एफबीआयच्या इतिहासातील सर्वात महान संचालकांपैकी एक होते. ९/११ च्या दहशतावीद हल्ल्यानंतर त्यांनी संस्थेत सुधारणात्मक बदल केले होते. ज्यांचे आजही महत्व आहे. त्यांची आपल्या कामाप्रती आणि कायद्याप्रतीची निष्ठा अतुलनीय होती.
२००१ ते २०१३ पर्यंतच्या काळात त्यांनी एफबीयचे नेतृत्व केले होते. ते अत्यंत शिस्तप्रिय आणि कर्तव्यदक्ष अधिकारी मानले जायचे. त्यांच्या निधानवर ट्रम्प यांनी केलेल्यावादग्रस्त टिप्पणीमुळे अमेरिकेत दोन गट पडले आहेत. ट्रम्प यांनी मानवी संवेदनांची पायमल्ली केल्याचा विरोधाकांनी म्हटले आहे.त्यांचा तीव्र निषेध केला जात आहे.
🚨 BREAKING: President Trump celebrates the death of former Special Counsel Robert Mueller, who investigated him in the Trump-Russia hoax WOW “Robert Mueller just died. Good, I’m glad he’s dead. He can no longer hurt innocent people!” pic.twitter.com/yjEvWUNW1e — Eric Daugherty (@EricLDaugh) March 21, 2026
Ans: ट्रम्प यांनी FBI चे माजी संचालक रॉबर्ट म्यूलर यांच्या निधनावर आनंद व्यक्त केल्यासारखी प्रतिक्रिया दिली आहे. यामुळे ट्रम्प वादाच्या भोवऱ्यात सापडले असून त्यांच्यावर टीका केली जात आहे.
Ans: FBI चे माजी संचालक रॉबर्ट म्यूलर यांना गेल्या काही काळापासून पार्किन्सन आजार होता, ज्यामुळे ८१ वर्षी त्यांचे निधन झाले, अशी माहिती त्यांच्या कुटुंबाने दिली होती.
Ans: 2016 मध्ये राष्ट्राध्यक्ष निवडणुकीनंतर रशियन हस्तक्षेपांच्या आरोपांची चौकशी करण्यासाठी म्यूलर यांची विशेष वकील म्हणून नियुक्त करण्यात आली होती. तेव्हापासून ट्रम्प आणि म्यूलर यांच्या वाद निर्माण झाला होता.