Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Dussehra |
  • Navratri |
  • Ind vs Wi test |
  • Bihar Election 2025 |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Donald Trump Tarrif Threat : भारतावर पुन्हा एकदा कर वाढवणार ट्रम्प? २५% पेक्षा जास्त दराची धमकी

Donald Trump Threat To India : ट्रम्प यांनी पुन्हा एकदा भारतावरील टॅरिफ वाढवण्याचे संकेत दिले आहेत. भारताच्या रशियाकडून तेल खरेदी करत राहण्याच्या निर्णायवर ट्रम्प यांनी ही घोषणा केली आहे.

  • By स्वराली शहा
Updated On: Aug 05, 2025 | 08:32 PM
Donald Trump threat to India of raise in Tarrif substantially in 24 hours

Donald Trump threat to India of raise in Tarrif substantially in 24 hours

Follow Us
Close
Follow Us:
  • डोनाल्ड ट्रम्प यांनी पुन्हा एकदा भारताच्या रशियन तेल खरेदीवरुन कर वाढवण्याचा इशारा दिला आहे.
  • तसेच रशियाने देखील डोनाल्ड ट्रम्प यांच्या भारतविरोधी विधानांना रशियासाठी धोका मानले जाईल असे म्हटले आहे.
  • आता ट्रम्प भारतावर पुढील २४ तासांत २५% पेक्षा जास्त कर लादणार आहेत.

Donald Trump Threat To India : वॉशिंग्टन : अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प (Donald Trump) यांनी पुन्हा एकदा भारतावर हल्ला बोल केला आहे. ट्रम्प यांनी पुन्हा एकदा भारताला टॅरिफची धमकी दिली आहे. पुढील २४ तासांमध्ये ट्रम्प यांनी भारतावरील टॅरिफ (Tarrif) वाढवणार असल्याचे म्हटले आहे. त्यांच्या या विधानाने पुन्हा एकदा सर्वत्र खळबळ उडाली आहे. ट्रम्प यांनी भारताच्या रशियासोबत व्यापार सुरु ठेवण्याच्या निर्णयानंतर ही घोषणा केली आहे. यापूर्वी त्यांनी भारतावर २५% टॅरिफ लादण्याची धमकी दिली होती, मात्र आता डोनाल्ड ट्रम्प हा कर वाढवणार असल्याचे म्हणत आहेत.

काय म्हणाले ट्रम्प?

ट्रम्प यांनी CNBC वृत्तसंस्थेशी बोलताना म्हटले की, गेल्या काही काळात भारत चांगला व्यापारी भागीदारी राहिलेला नाही. भारत रशियाकडून तेल खरेदी करत आहे आणि रशियाला युक्रेनविरुद्धच्या युद्धात त्यांच्या सैन्य कारवायांना मदत पुरवत आहेत. आधी आम्ही २५%  टक्क्यापर्यंत कर लादणार होतो, पण आता पुढील २४ तासांत हा कर वाढवणार आहे, असे ट्रम्प यांनी म्हटले.

ट्रम्प यांनी आरोप केला की, भारत रशियाकडून तेल खरेदी करत आहे, यामुळे रशियाच्या लष्करी हत्यारांना इंधन मिळत आहे, त्यांना मोठ्या प्रमाणात निधी पुरवला जात आहे आणणि ते असेच करत राहिले तर मला आनंद होणार नाही.

पुतिन यांचा संताप अनावर! अमेरिकेच्या धमकीनंतर ‘या’ क्षेपणास्त्राच्या तैनातीवर घेतला मोठा निर्णय

रशियाची डोनाल्ड ट्रम्प यांनी धमकी 

याच वेळी रशियाने (Russia)देखील डोनाल्ड ट्रम्प यांच्या भारतावर कर लादण्याच्या धमकीला तीव्र विरोध केला आहे. रशियाचे क्रेमलिनचे प्रवक्ते दिमित्री पेस्कोव्ह यांनी, आपला मित्र राष्ट्र भारताला समर्थन दिले आहे. त्यांनी म्हटले आहे की, भारतविरोधी अमेरिकेची किंवा डोनाल्ड ट्रम्प यांची कोणतीही विधाने रशियासाठी धोका मानली जातील.रशियाने स्पष्ट केले आहे की, अमेरिका किंवा इतर कोणताही देश कोणत्याही देशाला रशियापासून व्यापार करण्यास थांबवू शकत नाही. प्रत्येक देशाला त्याच्या हितासाठी, सार्वभौमत्वासाठी आपला व्यापारी भागीदार निवडण्याचा अधिकार आहे.

🇺🇸❗🇮🇳 President Trump says he will raise tariffs on India “substantially” over the next 24 hours. pic.twitter.com/6nGF9H7Zou — Molo44 🇮🇹🇺🇦 (@MoloWarMonitor) August 5, 2025

भारताचेही डोनाल्ड ट्रम्प यांच्या धमकी सडेतोड उत्तर

याच वेळी भारताने देखील अमेरिकेच्या धमकीला सडेतोड उत्तर दिले आहे. भारताच्या परराष्ट्र मंत्रालयाने ट्रम्प यांचे आरोप निराधार आणि चुकीचे असल्याचे म्हटले आहे. भारताने स्पष्ट केले आहे की, भारताला लक्ष्य केले जात आहे, हे चुकीचे असून अमेरिकाच्या शब्द आणि कृतीमध्ये तितकाच फरक आहे. अमेरिका देखील रशियाकडून युरेनियम, पॅलेडियम आणि खते आयात करत आहे. जर ते रशियाशी व्यापार करु शकतात, तर भारतही करु शकतो.

शिवाय खुद्द अमेरिकेने जागतिक बाजारपेठ स्थिर ठेवण्यासाठी भारताला आवाहन केले होते, असे भारताच्या परराष्ट्र मंत्रालयाचेन स्पष्ट केले आहे.  भारताने स्पष्ट केले आहे की, भारताची अर्थव्यवस्था प्रमुख आणि उभरती आहे, यामुळे आपले राष्ट्रीय हित आणि आर्थिक सुरक्षितता जपण्यासाठी स्वतंत्र पावले उचलत राहिल.

Russia On Trump : ‘हा रशियासाठी धोका’ ; ट्रम्प यांच्या टॅरिफ धमकीवर पुतिन यांचा इशारा

Web Title: Donald trump threat to india of raise in tarrif substanitally in 24 hours

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Aug 05, 2025 | 08:28 PM

Topics:  

  • America
  • Donald Trump
  • Russia
  • Tarrif
  • World news

संबंधित बातम्या

२ लाख घ्या अन् अमेरिका सोडा…; कोणाला दिली ट्रम्प प्रशासनाने ही ऑफर? काय आहे प्रकरण? 
1

२ लाख घ्या अन् अमेरिका सोडा…; कोणाला दिली ट्रम्प प्रशासनाने ही ऑफर? काय आहे प्रकरण? 

‘मला उशीर अजिबात मंजूर नाही, लवकर पावलं उचला नाहीतर…’, ट्रम्पची हमासला धमकी
2

‘मला उशीर अजिबात मंजूर नाही, लवकर पावलं उचला नाहीतर…’, ट्रम्पची हमासला धमकी

Syria News : सीरियाच्या माजी राष्ट्राध्यक्षांची हत्या करण्याचा प्रयत्न; रशियामध्ये विषप्रयोग झाल्याची चर्चा
3

Syria News : सीरियाच्या माजी राष्ट्राध्यक्षांची हत्या करण्याचा प्रयत्न; रशियामध्ये विषप्रयोग झाल्याची चर्चा

ब्रिटनचे पंतप्रधान भारत दौऱ्यावर येणार; दोन्ही देशांच्या विज्ञान आणि तंत्रज्ञान संबंधांना मिळणार नवी दिशा
4

ब्रिटनचे पंतप्रधान भारत दौऱ्यावर येणार; दोन्ही देशांच्या विज्ञान आणि तंत्रज्ञान संबंधांना मिळणार नवी दिशा

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.