Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • वर्ल्ड
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • टेक
    • ऑटो
    • फोटो
    • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Krishna Janmashtami 2025 |
  • Independence Day 2025 |
  • Shravan 2025 |
  • Today's Gold Rate |
  • Ind vs Eng
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

ढाकामध्ये दुर्गा मंदिराची तोडफोड; भारताने बांगलादेश सरकारला फटकारले, हिंदू सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर

Durga temple vandalised Dhaka : बांगलादेशातील हिंदू समाजावर पुन्हा एकदा धार्मिक असहिष्णुतेचा हल्ला झाला असून, राजधानी ढाका येथील खिलखेत परिसरात दुर्गा माता मंदिराची तोडफोड करण्यात आली आहे.

  • By हर्षदा पाटोळे
Updated On: Jun 27, 2025 | 11:47 AM
Durga temple vandalised Dhaka

Durga temple vandalised Dhaka

Follow Us
Close
Follow Us:

Durga temple vandalised Dhaka : बांगलादेशातील हिंदू समाजावर पुन्हा एकदा धार्मिक असहिष्णुतेचा हल्ला झाला असून, राजधानी ढाका येथील खिलखेत परिसरात दुर्गा माता मंदिराची तोडफोड करण्यात आली आहे. या घटनेवर भारताने तीव्र प्रतिक्रिया व्यक्त करत, बांगलादेशच्या अंतरिम सरकारवर सुरक्षा पुरवण्यात अपयश आल्याचा आरोप केला आहे. भारताच्या परराष्ट्र मंत्रालयाने बांगलादेशला स्पष्ट शब्दांत सुनावले असून, हिंदू समाजाच्या संरक्षणासाठी जबाबदारीचे भान राखण्याचे आवाहन केले आहे.

अतिरेक्यांच्या धमक्यांनंतरही सुरक्षा न दिल्याचा आरोप

ढाकामधील खिलखेत परिसरात असलेल्या दुर्गा मंदिरावर अतिरेकी गटांकडून दीर्घकाळ धमक्या येत होत्या, असेही समोर आले आहे. यासंदर्भात भारताने माहिती दिली की, अतिरेकी घटक या मंदिराच्या विध्वंसाची मागणी करत होते. मात्र, सुरक्षा पुरवण्याऐवजी, बांगलादेश सरकारने या मंदिराच्या बांधणीस ‘बेकायदेशीर’ घोषित करून त्याच्या पाडण्यास परवानगी दिली. परिणामी, मूर्ती सुरक्षितपणे काढण्याआधीच मंदिराचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले.

जागतिक घडामोडी संबंधित बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा : International Labour Day 2025: श्रमिकांच्या हक्कांचा जागर आणि संघर्षाच्या इतिहासाची आठवण

भारताचा तीव्र आक्षेप, परराष्ट्र मंत्रालयाची स्पष्ट भूमिका

भारताचे परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते रणधीर जयस्वाल यांनी या घटनेवर तीव्र नाराजी व्यक्त केली. त्यांनी म्हटले, “बांगलादेशातील हिंदू आणि त्यांच्या धार्मिक स्थळांचे संरक्षण करणे ही तिथल्या सरकारची जबाबदारी आहे. अशा घटना वारंवार घडत असलेल्या पाहून आम्हाला गंभीर चिंता वाटते.” जयस्वाल यांनी ही घटना फक्त धार्मिक असहिष्णुतेपुरती मर्यादित नसून, भारत-बांगलादेश संबंधांवरही त्याचा प्रतिकूल परिणाम होऊ शकतो, असेही स्पष्ट केले. ते पुढे म्हणाले, “भारत सर्व मुद्यांवर संवादासाठी तयार आहे, पण त्यासाठी सकारात्मक आणि सुरक्षित वातावरण आवश्यक आहे.”

#Bangladesh

Muhammad Yunus-led terr*orist government is demolishing Durga Temple in #Dhaka.

Hindu minorities of Bangladesh are helpless.

And why the World is silent! pic.twitter.com/TSrCSV589F

— Hindu Voice (@HinduVoice_in) June 26, 2025

credit : social media

बांगलादेशला द्विपक्षीय चर्चेची आठवण

या पार्श्वभूमीवर भारताने पुन्हा एकदा द्विपक्षीय चर्चेच्या गरजेवर भर दिला आहे. गेल्या काही महिन्यांपासून भारत आणि बांगलादेश दरम्यान व्यापार, जलवाटप आणि सीमारेषेवरील अस्थिरतेसंदर्भात विविध मुद्यांवर चर्चा सुरु आहे. गंगा पाणी कराराचे नूतनीकरण, तसेच सीमावर्ती भागातील सुरक्षा हा देखील महत्त्वाचा मुद्दा ठरतो आहे. जयस्वाल म्हणाले, “भारताने वाणिज्य सचिव पातळीवर बांगलादेशी अधिकाऱ्यांशी याआधीही या बाबी मांडल्या आहेत. मात्र, हिंदू समाजाच्या सुरक्षेबाबत सरकारकडून ठोस पावले उचलली जात नाहीत, ही खेदाची बाब आहे.”

व्यापार निर्बंधांची पार्श्वभूमी

या घटनेच्या काही दिवसांपूर्वीच भारत सरकारने बांगलादेशातून होणाऱ्या तयार कपडे आणि अन्य वस्तूंच्या आयातीवर काही निर्बंध लावले होते. भारत सरकारचा हेतू होता, द्विपक्षीय व्यापारात समानता आणि निष्पक्षता राखणे. त्यामुळे या धार्मिक घटनेला व्यापार आणि राजनैतिक पातळीवरील घडामोडींशी जोडूनही पाहिले जात आहे.

जागतिक घडामोडी संबंधित बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा : ट्रम्प यांची घोषणा; ‘लवकरच भारतासोबतही मोठा व्यापार करार’, चीन-अमेरिका करारानंतर नवा संकेत

ढाक्यातील दुर्गा मंदिराचा विध्वंस

ढाक्यातील दुर्गा मंदिराच्या विध्वंसाने भारतातील संताप वाढवला आहे. या घटनेमुळे बांगलादेशातील धार्मिक अल्पसंख्यांकांच्या सुरक्षिततेबाबत नव्याने प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे. भारताने स्पष्ट शब्दांत बांगलादेश सरकारकडे तक्रार नोंदवून, हिंदू समाजाचे रक्षण करण्याची जबाबदारी बजावण्याची मागणी केली आहे. यानंतर बांगलादेश सरकारकडून काय कारवाई होते, याकडे संपूर्ण जगाचे लक्ष लागले आहे.

Web Title: Durga temple vandalised in dhaka india warns bangladesh on hindu safety

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jun 27, 2025 | 11:46 AM

Topics:  

  • Bangladesh
  • india
  • temple news
  • World news

संबंधित बातम्या

Pakistan Flood : पाकिस्तान आणि POK मध्ये पावसाचा हाहा:कार; पूर-भूस्खलनामुळे ३२ जणांचा मृत्यू, अनेक बेपत्ता
1

Pakistan Flood : पाकिस्तान आणि POK मध्ये पावसाचा हाहा:कार; पूर-भूस्खलनामुळे ३२ जणांचा मृत्यू, अनेक बेपत्ता

Trump Putin Meet : पत्रकाराच्या ‘त्या’ प्रश्नावर भांबावले पुतिन ; दिली अशी प्रतिक्रिया की VIDEO तुफान व्हायरल
2

Trump Putin Meet : पत्रकाराच्या ‘त्या’ प्रश्नावर भांबावले पुतिन ; दिली अशी प्रतिक्रिया की VIDEO तुफान व्हायरल

Earthquake: ऑस्ट्रेलियात 5.6 रिश्टर स्केलचा भूकंप; क्वीन्सलँड हादरले, लोक घाबरून घराबाहेर
3

Earthquake: ऑस्ट्रेलियात 5.6 रिश्टर स्केलचा भूकंप; क्वीन्सलँड हादरले, लोक घाबरून घराबाहेर

अवकाशातून येतोय मृत्यू…! ११६ दिवसांनंतर काय होणार आहे? शास्त्रज्ञाच्या दाव्याने जग हादरले
4

अवकाशातून येतोय मृत्यू…! ११६ दिवसांनंतर काय होणार आहे? शास्त्रज्ञाच्या दाव्याने जग हादरले

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.