Earthquake of 6.2 magnitude in Turkey, Panic in IstanbulEarthquake of 6.2 magnitude in Turkey, Panic in Istanbul
अंकारा: बुधवारी (23 एप्रिल) तुर्कीच्या इस्तंबूलमध्ये भूकंपाचे जोरदार झटके जाणवले आहेत. दुपारी 3:19 वाजता झालेल्या 6.2 रिश्टर स्केलच्या तीव्र भूकंपामुळे तुर्कीजवळील बल्हेरियास ग्रीस आणि रोमानियासारख्या देशांमध्येही भूकंपाचे धक्के जाणवले आहेत. यामुळे लोकांमध्ये भितीचे वातावरण पसरलेले आहे. मिळालेल्या माहितीनुसार, इस्तंबूलपासून 73 किलोमीटर अंतरावर 6.2 तीव्रतेचा भूकंप झाला. या जोरदार भूकंपामुळे काही सेंकदातच लोकांना त्यांच्या घरातून बाहरे पडावे लागले.
स्थानिक माध्यमांनी दिलेल्या माहितीनुसार, भूकंपाचे धक्के इतके तीव्र होते की, जमी देखील हादरु लागल्या. भितीने लोक सैरावार रस्त्यांवर झावत सुटले. इस्तंबूल, अंकरा आणि इझमीर या प्रमुख शहरांमध्ये भूकंपाचे जोरदार झटके जाणवले. सध्या कोणतीही जीवितहानी किंवा वित्तहानी झाल्याची माहिती समोर आलेली नाही. मात्र, अधिकार्यांच्या म्हणण्यानुसार, काही जुन्या इमारतींना भेगा पजल्या आहेत.
भूकंपाची झटके जाणवताच सर्व आपत्ती व्यवस्थापन संस्था सतर्क झाल्या आहेत. संभाव्य बाधित भागांमध्ये मदत आणि बचाव पथके पाठवण्यात आली आहेत. तसेच हेल्पलाईन नंबर देखील जारी करण्यात आला आहे. प्रशासनाने लोकांना, सुरक्षित ठिकाणी राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे. भूकंपाचे आणखी काही धक्के बसण्याची शक्यता असल्याचे म्हटले आहे.
तुर्कीच्या भूकंपशास्त्रीय विभागाने दिलेल्या माहितीनुसार, भूमध्य समुद्राच्या प्रदेशात प्लेट्सच्या हालचालींमुळे भूकंप झाला आहे. भूकंपाची खोली अपेक्षेपेक्षा कमी होती. यामुळे मोठ्या भागात याचा परिणाम जाणवला. ग्रीस आणि बल्गेरियातील शहरांमध्ये भूकंपाचे सौम्य तर रोमानियाच्या काही भागात तीव्र झटके जाणवले. आणखी काही भूकंपाचे धक्के बसण्याची शक्यता असल्याचे तुर्कीच्या भूकंपशास्त्रीय विभागाने म्हटले आहे.
तुर्की हे भूकंपप्रवण क्षेत्र आहे. या संवेदनशील क्षेत्रात यापूर्वी अनेकवेळा प्राणघातक भूकंप झाले आहेत. यापूर्वी 2023 मध्ये सर्वाधिक विनाशकारी भूकंपाने तुर्कीतील हजारो लोकांचा बळी गेला होता. अशा परिस्थितीमध्ये अलीकडच्या भूकंपाच्या धक्क्यांनी जुन्या जखमा ताज्या केल्या आहेत. सध्या सरकार आणि आपत्ती व्यवस्थापन संस्था परिस्थितीवर लक्ष ठेवून आहेत. संभाव्य बाधित भागांमध्ये मदत आणि बचाव पथके पाठवण्यात आली आहेत.
मिळालेल्या माहितीनुसार पृथ्वीच्या आत सात प्लेट्स आहेत. ज्या फिरत राहतात. ज्या भागात या प्लेट्स आदळतात त्याला फॉल्ट लाइन म्हणतात. प्लेट्सचे कोपरे वारंवार टक्कर झाल्यामुळे वाकतात. जेव्हा जास्त दाब तयार होतो, तेव्हा प्लेट्स तुटू लागतात. खालील ऊर्जा बाहेर येण्याचा मार्ग शोधते आणि गडबड झाल्यानंतर भूकंप होतो. भूकंपाचा केंद्रबिंदू हे ठिकाण आहे ज्याच्या खाली प्लेट्सच्या हालचालीमुळे ऊर्जा सोडली जाते. या ठिकाणी भूकंपाची कंपने अधिक तीव्र असतात. कंपनाची वारंवारता जसजशी वाढते तसतसा त्याचा प्रभाव कमी होतो.