Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • raj thackeray |
  • IPL 2026 |
  • Marathi News |
  • crime news |
  • devendra fadnavis
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Ebola Outbreak: विना उपचाराचा मृत्यू! इबोलाच्या ‘Bundibugyo’ स्ट्रेनचे संकट; 50% मृत्यूदर, भारताचीचीही मोठी तयारी

आफ्रिकेत इबोला विषाणूचा प्रादुर्भाव वेगाने पसरत आहे. काँगो आणि युगांडामध्ये ९०० हून अधिक संशयित रुग्ण आणि २२० मृत्यूंची नोंद झाली आहे. जागतिक आरोग्य संघटनेने (WHO) याला आंतरराष्ट्रीय आरोग्य आणीबाणी म्हणून घोषित केले आहे.

  • By हर्षदा पाटोळे
Updated On: May 27, 2026 | 12:45 PM
ebola outbreak congo uganda india airport screening guidelines 2026 global health emergency

ebola outbreak congo uganda india airport screening guidelines 2026 global health emergency

Follow Us
Close
Follow Us:
  • जागतिक आणीबाणी
  • भारताची सतर्कता
  • उपचार नसलेला धोका

Ebola Outbreak May 2026 : जग अजून कोरोनाच्या धक्क्यातून पूर्णपणे सावरलेले नाही, तोच आता एका नवीन आणि भयंकर विषाणूने (Ebola) जगाची झोप उडवली आहे. आफ्रिकेतील लोकशाही प्रजासत्ताक काँगो आणि युगांडामध्ये ‘इबोला’ विषाणूने भीषण स्वरूप धारण केले आहे. ताज्या आकडेवारीनुसार, या भागात ९०० हून अधिक संशयित रुग्ण आढळले असून २२३ हून अधिक निष्पाप जीवांचा बळी गेला आहे. जागतिक आरोग्य संघटनेने (WHO) परिस्थितीचे गांभीर्य ओळखून १७ मे २०२६ रोजी याला ‘आंतरराष्ट्रीय आरोग्य आणीबाणी’ (PHEIC) म्हणून घोषित केले आहे. हा विषाणू केवळ आफ्रिकेपुरता मर्यादित न राहता जगाच्या कानाकोपऱ्यात पसरण्याची भीती व्यक्त होत असल्याने भारतासह सर्वच देश आता युद्धपातळीवर तयारीला लागले आहेत.

काय आहे ‘बुंदीबुग्यो’ स्ट्रेन आणि तो इतका घातक का?

यावेळी पसरत असलेला इबोलाचा प्रकार हा ‘बुंदीबुग्यो’ (Bundibugyo) स्ट्रेन आहे. हा इबोलाच्या ज्ञात प्रकारांपैकी सर्वात दुर्मिळ आणि धोकादायक मानला जातो. सर्वात चिंतेची बाब म्हणजे, या स्ट्रेनवर अद्याप कोणतीही अधिकृत लस किंवा विशिष्ट औषधोपचार उपलब्ध नाही. २००७ मध्ये पहिल्यांदा युगांडात सापडलेल्या या विषाणूचा मृत्यूदर ३० ते ५० टक्क्यांच्या दरम्यान आहे. म्हणजेच, संसर्ग झालेल्या दर दोन व्यक्तींमागे एकाचा मृत्यू होण्याची शक्यता असते. यामुळेच आरोग्य यंत्रणांसमोर मोठे आव्हान उभे राहिले आहे.

जागतिक घडामोडी संबंधित बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा : Israel Attack Lebanon : इस्रायलचा लेबनॉनवर भीषण प्रहार; हिजबुल्ल्हाच्या कमांड सेंटर्सना क्षेपणास्त्रांनी केले उद्धवस्त

काँगोमध्ये भीतीदायक वास्तव: रुग्णालयांवर हल्ले आणि पळणारे रुग्ण

काँगोमधील परिस्थिती अत्यंत हृदयद्रावक आणि चिंताजनक आहे. तेथील इतुरी प्रांतात मे २०२६ मध्ये या साथीचा उगम झाला. हा भाग आधीच सशस्त्र संघर्ष आणि हिंसाचाराने होरपळलेला आहे. धक्कादायक बाब म्हणजे, तेथे इबोला रुग्णांवर उपचार करणाऱ्या रुग्णालयांवर हल्ले होत आहेत. मोंगबवालू जनरल रेफरल हॉस्पिटलवर झालेल्या हल्ल्यात उपचाराचे तंबू जाळण्यात आले, ज्यामुळे १८ रुग्ण जीव वाचवण्यासाठी पळून गेले. यातील काही रुग्ण पॉझिटिव्ह होते, जे आता समाजात संसर्ग पसरवू शकतात. काही लोक आपल्या नातेवाईकांचे मृतदेह दफन करण्यासाठी रुग्णालयातून पळवून नेत आहेत, मात्र इबोलाग्रस्तांचे मृतदेह सर्वात जास्त संसर्गजन्य असतात, हे लोक विसरत आहेत.

A 28-year-old #Ugandan woman, who arrived at #KempegowdaInternationalAirport on May 23, has been isolated at the Epidemic Diseases Hospital in Indiranagar as a precautionary measure after her samples were collected for #Ebola testing amid a global alert over the viral disease.… pic.twitter.com/wBW5b55lEn — The Times Of India (@timesofindia) May 27, 2026

credit – social media and Twitter

भारताची ‘कवचकुंडले’: विमानतळांवर कडक पाहरे

भारताने या संकटाचा सामना करण्यासाठी तातडीने पावले उचलली आहेत. केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने २४ मे रोजी एक विशेष नियमावली (Protocol) जारी केली आहे.

  • विमानतळ तपासणी: काँगो, युगांडा आणि दक्षिण सुदानमधून येणाऱ्या प्रत्येक प्रवाशाचे ‘थर्मल स्क्रीनिंग’ केले जात आहे.
  • ट्रॅव्हल ॲडव्हायझरी: सरकारने नागरिकांना पुढील आदेश येईपर्यंत या बाधित देशांचा प्रवास टाळण्याचे आवाहन केले आहे.
  • केरळ मॉडेल: केरळ सरकारने बाधित देशांतून येणाऱ्या लोकांसाठी २१ दिवसांचे ‘इन्स्टिट्यूशनल क्वारंटाईन’ (विलगीकरण) अनिवार्य केले आहे. नुकतेच बंगळुरूमध्ये युगांडाहून आलेल्या एका महिलेला संशयावरून विलगीकरणात ठेवले होते, मात्र सुदैवाने तिचा रिपोर्ट निगेटिव्ह आला, ज्यामुळे देशाला मोठा दिलासा मिळाला.

जागतिक स्तरावर ‘हाय-अलर्ट’ आणि आर्थिक मदत

केवळ भारतच नाही, तर अमेरिका, कॅनडा आणि युरोपीय देशांनीही कडक निर्बंध लादले आहेत. कॅनडाने बाधित देशांच्या नागरिकांसाठी ९० दिवसांची इमिग्रेशन प्रक्रिया स्थगित केली आहे. युरोपियन युनियनने आफ्रिकेला २२० दशलक्ष रुपयांची मदत जाहीर केली आहे, जेणेकरून विषाणूचा मागोवा घेणे सोपे होईल. आफ्रिकेतील नऊ शेजारील देशांना ‘हाय-रिस्क’ श्रेणीत ठेवण्यात आले आहे.

Russian Embassy in South Africa says scientists in Russia have developed a new vaccine against the latest strain of #Ebola virus. Scientists say the vaccine may also work against the rare Bundibugyo strain linked to recent outbreaks in Democratic Republic of the Congo.#WHO… pic.twitter.com/hutbhWxnpW — All India Radio News (@airnewsalerts) May 27, 2026

credit – social media and Twitter

जागतिक घडामोडी संबंधित बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा : India Canada FTA : भारत-कॅनडा संबंधांना नवी दिशा; दोन्ही देशांमध्ये ‘मुक्त व्यापार करारा’वर सहमती

इबोलाचे स्वरूप आणि लक्षणे: कसे ओळखावे?

इबोला हा संक्रमित व्यक्तीच्या रक्त, घाम, लाळ किंवा इतर शारीरिक द्रवांच्या थेट संपर्कातून पसरतो. याची सुरुवातीची लक्षणे ही मलेरिया किंवा डेंग्यूसारखीच असतात, त्यामुळे लोक गोंधळून जातात. ताप येणे, तीव्र अशक्तपणा, स्नायू दुखणे आणि घसा खवखवणे ही प्राथमिक लक्षणे आहेत. परिस्थिती बिघडल्यास शरीराच्या आतून आणि बाहेरून रक्तस्त्राव सुरू होतो. म्हणूनच, जर कोणालाही ताप किंवा अंगदुखी जाणवत असेल आणि त्यांचा परदेश प्रवासाचा इतिहास असेल, तर त्यांनी तातडीने डॉक्टरांशी संपर्क साधणे गरजेचे आहे.

💡

Frequently Asked Questions

  • Que: इबोला विषाणू हवेतून पसरतो का?

    Ans: नाही, इबोला हवेतून पसरत नाही. तो केवळ संक्रमित व्यक्तीच्या शरीरातील द्रव्यांच्या (रक्त, लाळ, घाम) थेट संपर्कातून पसरतो.

  • Que: बुंदीबुग्यो इबोला स्ट्रेनवर लस उपलब्ध आहे का?

    Ans: नाही, सध्या पसरत असलेल्या बुंदीबुग्यो स्ट्रेनवर कोणतीही विशिष्ट लस किंवा जागतिक स्तरावर मान्यताप्राप्त उपचार उपलब्ध नाही.

  • Que: भारताने कोणत्या देशांसाठी ट्रॅव्हल ॲडव्हायझरी जारी केली आहे?

    Ans: भारत सरकारने काँगो (DRC), युगांडा आणि दक्षिण सुदान या देशांचा प्रवास टाळण्याचा सल्ला नागरिकांना दिला आहे.

Web Title: Ebola outbreak congo uganda india airport screening guidelines 2026 global health emergency

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: May 27, 2026 | 12:45 PM

Topics:  

  • Africa Continent
  • Ebola
  • virus
  • World news

संबंधित बातम्या

Abraham Accord : काय आहे अब्राहम करार? ट्रम्प यांच्या दबावामुळे पाकिस्तानची कोंडी; इस्रायलला मान्यता द्यावी लागणार?
1

Abraham Accord : काय आहे अब्राहम करार? ट्रम्प यांच्या दबावामुळे पाकिस्तानची कोंडी; इस्रायलला मान्यता द्यावी लागणार?

Detect, Delete, Deport : बंगाल सरकारच्या कडक भूमिकेमुळे बांगलादेशी घुसखोरांमध्ये दहशत; स्वत:च मायदेशी परण्यास तयार?
2

Detect, Delete, Deport : बंगाल सरकारच्या कडक भूमिकेमुळे बांगलादेशी घुसखोरांमध्ये दहशत; स्वत:च मायदेशी परण्यास तयार?

Indus Water Treaty : सिंधू पाणी वाटप करारावर पुन्हा गयावया करु लागला पाकिस्तान; आंतरराष्ट्रीय स्तरावर भारताला आवाहन
3

Indus Water Treaty : सिंधू पाणी वाटप करारावर पुन्हा गयावया करु लागला पाकिस्तान; आंतरराष्ट्रीय स्तरावर भारताला आवाहन

US Iran Conflict : अमेरिकी हल्ल्यानंतर इराण संतप्त; थेट इस्रायलला संपवण्याचा इशारा, मध्यपूर्व पुन्हा पेटणार?
4

US Iran Conflict : अमेरिकी हल्ल्यानंतर इराण संतप्त; थेट इस्रायलला संपवण्याचा इशारा, मध्यपूर्व पुन्हा पेटणार?

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.