Israel Attack Lebanon : इस्रायलचा लेबनॉनवर भीषण प्रहार; हिजबलुल्हाच्या कमांड सेंटर्सना क्षेपणास्त्रांनी केले उद्धवस्त (फोटो सौजन्य: सोशल मीडिया)
US Iran Peace Deal : अमेरिका इराणमध्ये शांतता करार अंतिम टप्प्यात; ‘Hormuz’ बाबत मोठी अपडेट समोर
मिळालेल्या माहितीनुसार, इस्रायल(Israel)च्या हवाई दलाने लेबनॉनमधील हिजबुल्लाहच्या लष्करी ताकदीला मोडून काढण्यासाठी विनाशकारी हल्ला केला आहे. अवघ्या काही तासांतच ७० हून अधिक लष्करी ठिकाणांना लक्ष्य करण्यात आले आहे. या कारवाईत ८५ हून अधिक क्षेपणास्त्रे आणि अत्याधुनिक दारुगोळ्याचा वापर करण्यात आला आहे. हिजबुल्लाचे मुख्य नियंत्रण असलेल्या १० कमांड सेंटर्सनाही नष्ट करण्यात आले आहे. अनेक गुप्त शस्त्रास्त्रांची ठिकाणी आणि पायाभूत सुविधा असलेली लष्करी तळे देखील उडवून टाकण्यात आली आहेत.
मीडिया रिपोर्टनुसार, इस्रायलच्या या भीषण कारवाईत मोठी जीवितहानी झाली आहे. मशघरा परिसरात हवाई हल्ल्यात एका निवासी इमारतीच्या ढिगाऱ्याखाली येऊन ५ जणांचा मृत्यू झाला आहे. तर कौथारियेह अल-सियाद भागात २ जणांचा नाहक बळी गेला आहे. याशिवाय अनेक लोक जखमी झाल्याची माहिती देखील समोर आली आहे.
इस्रायलच्या लष्कराने, एका हल्ल्यात हिजबुल्लाह(Hezbollah)च्या दोन बंदूकधाऱ्यांना देखील थेट टार्गेट करुन कंठस्थान करण्यात आले आहे. हिजबुल्लाहची लष्करी क्षमता पूर्णपणे संपुष्टात आणणे या मोहिमेचे उद्दिष्ट असल्याचे इस्रायलने म्हटले आहे.
सध्या लेबनॉनवरील हल्ल्यानंतर हिजबुल्लाह संतप्त झाला असून संभाव्य प्रत्युत्तराची शक्यता निर्माण झाली आहे. याच पार्श्वभूमीवर इस्रायलने आपल्या उत्तरेकडी सीमावर्ती भागांमध्ये कडक सुरक्षा व्यवस्था तैनात केली आहे. सर्व शाळा आणि शैक्षणिक संस्था पुढील आदेश मिळेपर्यंत बंद ठेवण्यात आल्या आहेत. याशिवाय सर्वाजनिक कार्यक्रमही रद्द करण्यात आले आहेत. केवळ २०० लोकांची मर्यादा असलेल्या कार्यक्रमांसाठीच परवानगी देण्यात आली आहे.
दुसरीकडे अमेरिकेने देखील इराणवर मोठी लष्करी कारवाई केली आहे. दक्षिण इराणमध्ये होर्मुझ (Hormuz) समुद्रात धोकादायक माइन्स पेरणाऱ्या इराणी युद्धनौका नष्ट करण्यात आल्या आहेत. तसेच बंदर अब्बास, जास्क आणि काही पायाभूत लष्करी सुविधांनाही लक्ष्य करण्यात आले आहे. यामुळे मध्यपूर्वेत पुन्हा युद्धाचे ढग गडद होऊ लागले आहेत.






