Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Maharashtra Local Body Election |
  • Thackeray Brothers Alliance |
  • Political news |
  • IND vs NZ |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Maulana Shamsul Huda: ईडीने ब्रिटनमधील धर्मगुरूविरुद्ध दाखल केला मनी लाँड्रिंगचा गुन्हा; कोट्यवधींच्या मालमत्तेची चौकशी सुरू

Maulana Shamsul Huda: ब्रिटनमध्ये राहणारे मौलाना शमसुल हुदा खान यांच्याविरुद्ध अंमलबजावणी संचालनालयाने (ईडी) पीएमएलए अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे. त्यांच्यावर परदेशात असताना शिकवणी न देता पगार घेतल्याचाही आरोप आहे.

  • By हर्षदा पाटोळे
Updated On: Dec 26, 2025 | 01:57 PM
ED files money laundering case against UK cleric Investigation into assets worth crores begins

ED files money laundering case against UK cleric Investigation into assets worth crores begins

Follow Us
Close
Follow Us:
  • ब्रिटनमध्ये राहणारे मौलाना शमसुल हुदा खान यांच्याविरुद्ध अंमलबजावणी संचालनालयाने (ED) मनी लाँड्रिंगचा (PMLA) गुन्हा दाखल केला आहे.
  • गेल्या २० वर्षांत मौलानांनी ३० कोटी रुपयांहून अधिक किमतीच्या डझनभर मालमत्ता खरेदी केल्या असून ८ बँक खात्यांद्वारे कोट्यवधींचे संशयास्पद व्यवहार केले आहेत.
  •  धार्मिक शिक्षणाच्या नावाखाली कट्टरतावादाला खतपाणी घालणे आणि पाकिस्तानी संघटनांशी असलेल्या कथित संबंधांची आता कसून चौकशी सुरू आहे.

ED case against Maulana Shamsul Huda Khan : उत्तर प्रदेशातील आझमगढमधून ब्रिटनला (Britain) गेलेल्या एका इस्लामिक धर्मोपदेशकाचा काळा कारभार आता अंमलबजावणी संचालनालयाने (ED) उघडकीस आणला आहे. मौलाना शमसुल हुदा खान यांच्यावर मनी लाँड्रिंग प्रतिबंधक कायद्यांतर्गत (PMLA) गुन्हा दाखल करण्यात आला असून, त्यांच्या कोट्यवधींच्या मालमत्तेची आणि संशयास्पद परदेशी निधीची चौकशी सुरू झाली आहे. उत्तर प्रदेश दहशतवाद विरोधी पथकाने (ATS) दाखल केलेल्या एफआयआरच्या आधारे ईडीने हे मोठे पाऊल उचलले आहे.

काम न करता पगार आणि ब्रिटिश नागरिकत्व

शमसुल हुदा खान यांचा इतिहास तपासला असता एक धक्कादायक बाब समोर आली आहे. १९८४ मध्ये त्यांची उत्तर प्रदेशातील एका सरकारी अनुदानित मदरशात सहाय्यक शिक्षक म्हणून नियुक्ती झाली होती. तपासात असे उघड झाले आहे की, खान यांनी २०१३ मध्ये ब्रिटनचे नागरिकत्व मिळवले होते. मात्र, आश्चर्याची गोष्ट म्हणजे २०१३ ते २०१७ या काळात ते परदेशात स्थायिक असतानाही, भारतातून त्यांना ‘शिक्षक’ म्हणून नियमित पगार मिळत राहिला. एकाही दिवसाची शिकवणी न घेता सरकारी तिजोरीतून पगार लाटल्याचा गंभीर आरोप त्यांच्यावर आहे.

जागतिक घडामोडी संबंधित बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा : India-US Ties: ‘Nobel’मुळे पडला भारत-अमेरिका मैत्रीत मिठाचा खडा; PM मोदींच्या एका भूमिकेमुळे ट्रम्पने भारताकडे फिरवली पाठ

३० कोटींचे साम्राज्य आणि संशयास्पद बँक खाती

ईडीच्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, गेल्या २० वर्षांत शमसुल हुदा खान यांनी अनेक परदेश दौरे केले. या काळात त्यांनी भारतात सुमारे ७ ते ८ वेगवेगळी बँक खाती उघडली, ज्याद्वारे कोट्यवधी रुपयांचे व्यवहार झाले. तपासात असे दिसून आले आहे की, या पैशातून त्यांनी ३० कोटी रुपयांपेक्षा जास्त किमतीच्या अनेक जमिनी आणि इमारती खरेदी केल्या आहेत. त्यांच्या ‘राजा फाउंडेशन’ नावाच्या एनजीओद्वारे अनेक मदरशांना निधी पुरवला जात होता, ज्याचा वापर कट्टरपंथी विचारसरणी पसरवण्यासाठी केला जात असल्याचा संशय आहे.

🚨 BIG BREAKING ED files PMLA case against ex-UP madrassa teacher Shamsul Huda Khan. He allegedly drew govt salary for years while living in UK after taking British citizenship. ED probes ₹33cr assets and suspected funding links with Pakistan-based networks. pic.twitter.com/II4sLago3R — Megh Updates 🚨™ (@MeghUpdates) December 26, 2025

credit : social media and Twitter

पाकिस्तान आणि ‘दावत-ए-इस्लामी’शी संबंध?

तपास संस्थांच्या मते, मौलाना शमसुल हुदा खान यांचे संबंध ब्रिटनमधील काही कट्टरपंथी संघटनांशी आहेत. एवढेच नाही तर त्यांचे पाकिस्तान दौरे आणि तिथल्या काही अतिरेकी संघटनांशी असलेले कथित संबंधही आता तपासाच्या कक्षेत आले आहेत. पाकिस्तानमधील कट्टरपंथी संघटना ‘दावत-ए-इस्लामी’ शी ते जोडलेले असू शकतात, असा संशय व्यक्त केला जात आहे. त्यांच्या आझमगढ आणि संत कबीर नगर येथील दोन मदरशांची नोंदणी यापूर्वीच अनियमिततेमुळे रद्द करण्यात आली आहे.

जागतिक घडामोडी संबंधित बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा : Bangladesh Crisis: ‘I have a dream, जसे 1971 मध्ये सर्व धर्म एकत्र…; हिंदूंवरील हल्ल्यांवर Tariq Rahman नक्की काय म्हटले?

कट्टरतावादाला खतपाणी घालण्याचे केंद्र

धार्मिक शिक्षणाच्या नावाखाली तरुण पिढीला कट्टरपंथी बनवण्याचे काम खान यांच्या माध्यमातून केले जात असल्याचा आरोप आहे. परदेशातून येणारा पैसा नक्की कोठून येतो आणि त्याचा वापर भारतात कोणत्या कारवायांसाठी केला जातो, याचा शोध आता ईडी घेत आहे. मौलानांच्या मालमत्तेची कागदपत्रे आणि बँक खात्यांचे सविस्तर ऑडिट केले जात असून, लवकरच या प्रकरणात मोठे अटकसत्र किंवा मालमत्ता जप्तीची कारवाई होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

💡

Frequently Asked Questions

  • Que: मौलाना शमसुल हुदा खान यांच्यावर ईडीने गुन्हा का दाखल केला?

    Ans: त्यांच्यावर मनी लाँड्रिंग (PMLA), बेकायदेशीर रित्या ३० कोटींची मालमत्ता जमा करणे आणि परदेशात राहूनही सरकारी पगार लाटल्याचा आरोप आहे.

  • Que: मौलाना शमसुल हुदा खान यांचे मूळ गाव कोणते आहे?

    Ans: ते मूळचे उत्तर प्रदेशातील आझमगढ (Azamgarh) येथील रहिवासी असून सध्या ते ब्रिटनचे नागरिक आहेत.

  • Que: कोणत्या संघटनांशी त्यांचे कथित संबंध असल्याचा संशय आहे?

    Ans: त्यांचे संबंध ब्रिटनमधील कट्टरपंथी गट आणि पाकिस्तानमधील 'दावत-ए-इस्लामी' सारख्या संघटनांशी असण्याची शक्यता तपासली जात आहे.

Web Title: Ed files money laundering case against uk cleric investigation into assets worth crores begins

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Dec 26, 2025 | 01:57 PM

Topics:  

  • britain
  • Enforcement Directorate
  • international news

संबंधित बातम्या

Reliance Industries : मुकेश अंबानींची मोठी झेप! रशियन तेलासाठी अमेरिकन सरकारकडून मिळाली विशेष सवलत
1

Reliance Industries : मुकेश अंबानींची मोठी झेप! रशियन तेलासाठी अमेरिकन सरकारकडून मिळाली विशेष सवलत

Bangladesh Crisis: ‘I have a dream, जसे 1971 मध्ये सर्व धर्म एकत्र…; हिंदूंवरील हल्ल्यांवर Tariq Rahman नक्की काय म्हटले?
2

Bangladesh Crisis: ‘I have a dream, जसे 1971 मध्ये सर्व धर्म एकत्र…; हिंदूंवरील हल्ल्यांवर Tariq Rahman नक्की काय म्हटले?

India-US Ties: ‘Nobel’मुळे पडला भारत-अमेरिका मैत्रीत मिठाचा खडा; PM मोदींच्या एका भूमिकेमुळे ट्रम्पने भारताकडे फिरवली पाठ
3

India-US Ties: ‘Nobel’मुळे पडला भारत-अमेरिका मैत्रीत मिठाचा खडा; PM मोदींच्या एका भूमिकेमुळे ट्रम्पने भारताकडे फिरवली पाठ

World War 3 : युद्ध अटळ! सलग दुसऱ्या दिवशीही चिनी युद्धनौका अन् ‘Spy balloons’ने तैवानमध्ये खळबळ; मिळाले गूढ संकेत
4

World War 3 : युद्ध अटळ! सलग दुसऱ्या दिवशीही चिनी युद्धनौका अन् ‘Spy balloons’ने तैवानमध्ये खळबळ; मिळाले गूढ संकेत

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.