ट्विटरचे सीईओ इलॉन मस्क (Elon Musk) यांनी ट्विटरची (Twitter) मालकी स्वत:कडे घेतल्यापासुन काहीना काही बदल करण्याचा धडाकाच लावला आहे. कंपनीच्या धोरणात बदल करण्यापासुन तर कर्मचाऱ्यांना नोकरीवरुन काढुन टाकण्यापासुन सतत काही ना काही निर्णय ते घेत आहेत. इलॉन मस्क नुकतच सीईओ पदाचा निरोप सोडणार असल्याचं सांगितलं होतं. आता त्यांनी पु्न्हा नवा निर्णयाची घोषणा केली आहे. पण हा निर्णय फक्त ट्विटर ब्लू टिक सब्स्क्रायबर्ससाठी (Blu Tick Subscriber) आहे. आता सदस्यांना आता दोन तासांची व्हिडीओ क्लिप अपलोड करु शकणार आहेत.
[read_also content=”सुषमा अंधारेना मारहाण केल्याचा दावा करणाऱ्या अप्पासाहेब जाधवांची पक्षातून हकालपट्टी, ठाकरे गटाची कारवाई https://www.navarashtra.com/mumbai/kokan/mumbai/appasaheb-jadhav-who-claimed-to-have-beaten-up-sushma-andhare-get-suspended-from-party-nrps-401439.html”]
आता ट्विटर ब्लू टिक सदस्य दोन तासांच्या 8 GB पर्यंतच्या व्हिडीओ क्लिप अपलोड करू शकतील. असं एलॉन मस्क यांनी सांगितलं आहे. एलॉन मस्क यांनी त्यांच्या ट्विटर अकाऊंटवरून ट्वीट केलं की, “ट्विटर ब्लू व्हेरिफाईड सब्सक्रायबर आता दोन तासांचा (8 जीबी) व्हिडीओ अपलोड करू शकतात.” म्हणजेच, ही सेवा मिळवण्यासाठी यूजर्सना ट्विटर ब्लूचं सदस्यत्व घ्यावं लागेल. त्यानंतरच ते दोन तासांचा व्हिडीओ ट्विटरवर अपलोड करु शकणार आहेत.
Twitter Blue Verified subscribers can now upload 2 hour videos (8GB)!
— Elon Musk (@elonmusk) May 18, 2023
त्याच्या या ट्विटवर युजर्सच्या अनेक भन्नाट प्रतिक्रिया येत आहेत. अनेकांनी या निर्णयाचे कौतुक केले तर काहींनी या निर्णयाला ट्रोल करणं सुरू केलं आहे. एका युझरने म्हण्टलं की, दोन तासाचे व्हिडिओ अपलोड करण्याचा निर्णय चांगला आहेत, हे आता YouTube चा पर्याय म्हणून वापरता येईल.
तर आणखी एका युझरने म्हण्टलं की, यामुळे टिकटॉक, शॉर्ट्स आणि रीलचे अनुकरण करणार नाही, याची काळजी घ्या फक्त ”
तिसऱ्या युझरने “ट्विटर हे नवीन नेटफ्लिक्स आहे,” एका म्हण्टलयं.
नुकतंच एलॉन मस्क यांनी ट्विटरच्या नव्या सीईओंचीही (Twitter New Ceo) घोषणा केली. इलॉन मस्क यांनी पद सोडण्याची घोषणा करण्यासोबतच ट्विटरसाठी नवीन सीईओची निवड करण्यात आल्याचही सांगितलं, जी लवकरच या पदाचा कार्यभार स्वीकारणार असल्याचेही त्यांनी सांगितलं. NBC युनिव्हर्सलच्या शीर्ष जाहिरात विक्री कार्यकारी लिंडा याक (linda Yaccarino) ट्विटरच्या नवीन सीईओपद सोपवण्यात आलं आहे.