Ex-US NSA on president Trump's claiming credit for India-Pakistan ceasefire
वॉशिंग्टन: भारताच्या ऑपरेशन सिंदूर मोहीमेनंतर पाकिस्तानसोबत लष्करी संघर्ष सुरु झाला होता. हा संघर्ष जवळपास चार दिवस सुरु राहिला. यामध्ये भारताने पाकिस्तानच्या हल्ल्यांना चोख प्रत्युत्तर दिले. याच वेळी जगभरातून दोन्ही देशांना संयम बाळगण्यास सांगितले जात होते. १० मे रोजी भारत आणि पाकिस्तानमध्ये युद्धबंदी होऊन शस्त्रसंधी लागू झाली. दरम्यान याची घोषणा अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी केली होती. घोषणा करताना त्यांना अमेरिकेच्या मध्यस्थीने युद्धविराम झाल्याचे म्हटले होते.
भारत आणि पाकिस्तानमधील युद्धबंदीचे श्रेय ट्रम्प यांनी स्वत:ला दिले होते. दरम्यान डोनाल्ड ट्रम्प यांच्या दुसऱ्याचे क्रेडिट घेण्याच्या सवयीवर अमेरिकन माजी वरिष्ठ अधिकाऱ्याने मोठे खळबळजनक विधान केले आहे. ट्रम्प यांनी दुसऱ्याच्या कामाचे श्रेय घेण्याची सवय आहे असे माजी अधिकाऱ्याने म्हटले आहे. अमेरिकेचे माजी राष्ट्रीय सुरक्षा सल्लागाक जॉन बॉल्टन यांनी हे विधान केले आहे. त्यांनी म्हटले की, “डोनाल्ड ट्रम्प यांनी दुसऱ्याच्या कामाचे श्रेय घेण्याची सवय आहे, ही सवय जुनी आहे. मग ते पात्र असो वा नसोत.” त्यांच्या या वक्तव्याने मोठी खळबळ उडाली आहे.
जॉन बोल्टन यांनी तुर्कीच्या पाकिस्तानला मिळणाऱ्या पाठिंब्यावरही भाष्य केले आहे. त्यांनी तुर्कीकडून पाकिस्तान दिल्या जाणाऱ्या समर्थनावर चिंता व्यक्त केली आहे. त्यांनी भारताला आणि जगाला या प्रकणाकडे गांभीर्याने पाहण्याची गरज असल्याचे म्हटले आहे. त्यांनी म्हटले की, अलीकडे तुर्कीच्या लष्करी क्षेत्राची ताकद वाढत आहे. तुर्कीच्या ड्रोनन संपूर्णजगाचे लक्ष वेधले आहे. परंतु त्यांना अधुनिक म्हणता येणार नाही असेही बोल्टन यांनी म्हटले आहे. परंतु यामुळे मोठ्या प्रमाणात अस्थिरता वाढण्याची शक्यता बोल्टन यांनी व्यक्त केली आहे.
एएनआयशी बोलताना बोल्टन यांनी म्हटले की, तुर्कीचे राष्ट्राध्य एर्दोगान प्रशासनाला पाकिस्तानमद्ये जास्त रस आहे. जगाने पाकिस्तानला तुर्कीच्या पाठिंब्याकडे बारकाईने लक्ष दिले पाहिजे. तसेच त्यांनी असेही म्हटले की, भारताला पहलगाम हल्ल्यानंतर दहशतवादाला पोसणाऱ्या आणि दङशतवाद्यांविरोधात कारवाई करण्याचा पूर्ण अधिकार आहे.