AK-203 असॉल्ट रायफल (फोटो सौजन्य: सोशल मीडिया)
मॉस्को: भारत आणि पाकिस्तानच्या तणावादरम्यान भारताची लष्करी ताकद संपूर्ण जगाला कळाली. यामुळे अनेक देशांमद्ये घबराट उडाली आहे. याच वेळी भारत आपली लष्करी ताकद अजून वाढवम्यावर भर देत आहे. दरम्यान भारताल रशियामुळे मोठे यश मिळाले आहे. भारत आणि रशियाचे संबंध गेल्या अनेक काळापासून दृढ होत आहेत. दरम्यान रशियाच्या आणखी एका निर्णयाने भारताच्या मेक इन इंडियाला मोठे यश मिळाले आहे. रशियाने एक मोठा निर्णय घेतला आहे.
रशियाने भारतात तयार होणाऱ्या रशियन असॉल्ट रायफल्सच्या इतर देशांमध्ये निर्यातीसाठी परवानगी दिली आहे. रशियाच्या निर्यात संस्थेने भारताच्या रशियन असॉल्ट रायफलच्या इतर देशात विक्रीसाठी परवानगी दिली आहे. रशियाची सरकारी वृत्तसंस्था TASS ने ही माहिती दिली आहे. रशियाचा हा निर्णय भारतासाठी अत्यंत महत्त्वपूर्ण आणि एक मोठे यश मानला जात आहे.
उत्तर प्रदेशातील अमेठी जिल्ह्यात AK-203चा कारखाना आहे. या कारखान्याला असॉल्ट रायफल भारत आणि इतर देशांमध्ये उत्पादने पुरवण्यास परवानगी मिळाली आहे, असा हवाला रशियाच्या रोसोबोरोनेक्सपोर्टच्या प्रमुखांनी दिला. त्यांनी सांगितले की, AK-203 रायफल्सचा हा कारखाना रशिया-भारत भागीदारी मजबूत करेल आणि मेक इन इंडियाला पाठिंबा मिळेल. अमेठील येथी इंडो-रशियन रायफल्स प्रायव्हेट लिमिटेहड (IRRPL)हा भारत आणि रशियाचा एक महत्त्वपूर्ण प्रकल्प आहे.
या प्रकल्पाद्वारे भारत मेक इन इंडिया कार्यक्रमांतर्गत मोठ्या प्रमाणात AK-203 असॉल्ट रायफल्सचे उत्पादन करण्यासाठी तयार आहे. गेल्या वर्षी भारताला रशियाने या असॉल्ट रायफलचे ३५ हजार सुटे भाद पुरवले आहेत. तर २००३ मध्ये रायफलचा एक संच मिळाला आहे. यामुळे आता भारतीय सशस्त्र दलाला ६० हजाराहून अधिक रायफल्स मिळतील तसेच निर्यात देखील करता येतील.
AK-203 असॉल्ट रायफल ही AK-200 ची अत्याधुनिक आवृत्ती आहे. ही भारतीय सैन्यात वापरल्या जाणाऱ्या काडतूस चेंबरसाठी तयार करण्यात आली आहे. ही राफल एका मिनिटात ७०० राऊंड फायर करु शकते. सध्या भारतीय लष्कराकडे याच्या ७० हजार रायफल्स आहेत. अमेठी येथील अलॉल्ट रायफल्सचा कोरवा कारखाना २०१९ मध्ये सुरु करण्यात आला होता.