अमेरिका आणि इस्रायलमध्ये युद्धाची ठिणगी? नागरिकांच्या हत्येमुळे नेतन्याहू झाले संतप्त, म्हणाले... (फोटो सौजन्य: सोशल मीडिया)
जेरुसेलम: बुधवारी रात्री अमेरिकत इस्रायली दूतावासाच्या दोन कर्मचाऱ्यांची गोळ्या घालून हत्या करण्यात आली. अमेरिकेच्या वॉशिंग्टन डीसीतील ज्यू संग्रहालयाजवळ ही घटना घडली. पोलिसांनी संशयिताला ताब्यात घेतल्याची माहिती समोर आली आहे. दरम्यान या हल्ल्यानंतर इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहू यांनी संताप व्यक्त केला आहे. त्यांनी हल्ल्यावर तीव्र प्रतिक्रिया दिली आहे. याचा बदला घेतला जाईल असे नेतन्याहूंनी म्हटले आहे. पोलिसांनी संशयिताला ताब्यात घेतले त्यावेळी तो पॅलेस्टाईन स्वातंत्र्याच्या घोषणा देत होता, असे सांगितले जात आहे.
इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहू यांनी अमेरिकेचे ॲटर्नी जनरल पाम बोंडी यांच्याशी हल्ल्यासंबंधी चर्चा केली. नेतन्याहूंनी संपूर्ण घटनेचा तपशील मागितला आहे. तसेच इस्रायली कर्मचाऱ्यांच्या हत्येबद्दल नाराजी व्यक्त केली आहे. नेतन्याहूंनी असेही म्हटले आहे की, राजदूत आणि दूतावासीतल कर्मचारी चौकशी दरम्यान संपूर्ण सहकार्य करतील, पण न्याय मिळाला पाहिजे.
अटर्नी जनरल पाम यांनी नेतन्याहूंना घटनेबद्दल माहिती देताना म्हटले की, या घटनेबद्दल आम्हाला खेद आहे. तसेच अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी देखील यावर चिंत व्यक्त केली आहे. तसेच न्याय मिळवून देण्याचे आश्वासन दिले आहे. तसेच हल्ल्यात मृत्यूमुखी पडलेल्या कुटुंबियांदद्दल अटर्नी जनरल पाम यांनी शोख व्यक्त आहे.
“These horrible D.C. killings, based obviously on antisemitism, must end, NOW! Hatred and Radicalism have no place in the USA. Condolences to the families of the victims. So sad that such things as this can happen! God Bless You ALL!” —President Donald J. Trump pic.twitter.com/Z30bjAQOpZ
— The White House (@WhiteHouse) May 22, 2025
पंतप्रधान नेतन्याहूंनी, इस्रायल आणि यहूदी-विरोधी लोकांना गंभीर परिणाम भोगावे लागतील असे म्हटले आहे. इस्रायल रक्ताचा बदला रक्तानेच घेईल असे त्यांनी म्हटले. तसेच त्यांनी जगभरातील इस्रायली दूतावासच्या आणि कर्मचाऱ्यांच्या सुरक्षा वाढवम्याची मागणी केली आहे.
दरम्यान या हल्ल्यात एका संशयिताला अटक करण्यात आली आहे. आरोपीचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. व्हिडिओमध्ये तो पॅलेस्टिनी समर्थनार्थ घोषणाबाजी करत आहे. आरोपी फ्री पॅलेस्टिनी च्या घोषणा देत आहे. सध्या या घटनेने मोठी खळबळ उडाली आहे. यामुळे यहूदी समुदाय आणि इस्रायली समर्थकांमध्ये भीतीचे वातावरण आहे.
डोनाल्ड ट्रम्प यांनी या घटनेवर आपली प्रतिक्रिया देताना म्हटले की, ही घटना भयानक आहे. यहूदी-विरोधी हत्याकाडांचा अंत झाला पाहिजे. अमरिकेत द्वेष पसवणाऱ्या कट्टरतावादाला स्थान नाही. तसेच पीडीतांच्या कुटुंबियांबद्दल सहानुभूती. हे खूप दू:खद आहे! देव सर्वांना आशिर्वाद देवो.