Explainer: ५६ वर्षे जुनी 'मॅड मॅन थिअरी' काय आहे? इराणला हरवण्यासाठी तिचा वापर करणारे ट्रम्प स्वतःच 'असे' झाले पराभूत ( फोटो सौजन्य : सोशल मीडिया )
What is Madman Theory in International Relations : जागतिक राजकारणात डोनाल्ड ट्रम्प (Donald Trump) हे एक ‘अंदाज न येणारे’ व्यक्तिमत्व म्हणून ओळखले जातात. कधी ते इराणला पृथ्वीवरून संपवून टाकण्याची भाषा करतात, तर कधी शांततेचा हात पुढे करतात. अनेकांना हा ट्रम्प यांचा लहरीपणा वाटतो, मात्र यामागे अमेरिकेची ५६ वर्षे जुनी आणि अत्यंत घातक अशी लष्करी रणनीती दडलेली असू शकते, जिला राजकीय भाषेत ‘मॅड मॅन थिअरी’ (Madman Theory) म्हटले जाते. या रणनीतीचा वापर करून ट्रम्प यांनी इराणला केवळ घाबरवलेच नाही, तर त्यांना वाटाघाटीच्या टेबलावर येण्यास भाग पाडले आहे.
या रणनीतीचा उगम १९६९ मध्ये अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष रिचर्ड निक्सन यांच्या काळात झाला. निक्सन यांना व्हिएतनाम युद्ध संपवायचे होते, पण त्यांना शत्रूला हे दाखवायचे होते की ते काहीही करू शकतात. निक्सन यांनी आपल्या सहकाऱ्यांना सांगितले होते की, “शत्रूला वाटू द्या की मी वेडा झालो आहे आणि मी कधीही अणुबॉम्बचे बटण दाबू शकतो.” जेव्हा एखादा जागतिक नेता स्वतःला अस्थिर, अनपेक्षित आणि लहरी म्हणून जगासमोर सादर करतो, तेव्हा त्याचे शत्रू त्याच्याशी पंगा घेण्यास घाबरतात. कारण शत्रूला हे माहित नसते की तो नेता पुढच्या क्षणी काय करेल. याच ‘भीती’चा वापर करून शत्रूला तडजोड करायला लावणे, हे या थिअरीचे मुख्य सूत्र आहे.
जागतिक घडामोडी संबंधित बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा : Iran US Ceasefire: ‘पाकिस्तानला पुन्हा भारतात विलीन करा!’ नोबेल मागणाऱ्या शहबाज आणि मुनीर यांची ब्रिटिश पत्रकाराने मोडली खोड
डोनाल्ड ट्रम्प यांनी इराणसोबतच्या संघर्षात नेमकी हीच चाल खेळली. त्यांनी एकदा इराणची ‘संस्कृती नष्ट’ करण्याची धमकी दिली, तर दुसऱ्याच क्षणी इराणच्या जनतेबद्दल सहानुभूती दाखवली. एका बाजूला होर्मुझची सामुद्रधुनी बंद झाल्यास इराणचे वीज प्रकल्प आणि पूल उडवून देण्याचे इशारे दिले, तर दुसरीकडे युद्धविरामासाठी स्वतः पुढाकार घेतला.
विश्लेषकांच्या मते, ट्रम्प यांनी जाणीवपूर्वक आपली विधाने बदलली. ही ‘गुड कॉप, बॅड कॉप’ (चांगला पोलीस, वाईट पोलीस) रणनीतीचाच एक भाग आहे. यामुळे इराणच्या नेत्यांना ट्रम्प यांचा नेमका हेतू काय आहे, हेच समजेनासे झाले. ट्रम्प कोणत्याही वेळी कोणताही करार मोडीत काढू शकतात किंवा हल्ला करू शकतात, या संशयामुळे इराणला बॅकफूटवर जावे लागले.
In his constant warnings to Iran, US President Donald Trump might be following the Madman Theory that was used by former US President Richard Nixon during the Vietnam War. What is the Madman Theory, and is the Iran war ceasefire a result of that? | Writes @Avikateel30 Read More:… pic.twitter.com/qQWGK6ja6t — IndiaToday (@IndiaToday) April 8, 2026
credit – social media and Twitter
ही थिअरी अत्यंत प्रभावी असली तरी ती तितकीच धोकादायक आहे. इराणला हरवण्यासाठी ट्रम्प यांनी या रणनीतीचा वापर केला खरा, पण यामुळे जागतिक स्तरावर अमेरिकेची विश्वासार्हता कमी झाली आहे का? असा प्रश्न विचारला जात आहे. जेव्हा एखादा नेता स्वतःला ‘मॅड मॅन’ म्हणून सादर करतो, तेव्हा त्याचे मित्र राष्ट्र देखील साशंक होतात. फ्रान्सचे मॅक्रॉन असोत किंवा दक्षिण कोरिया, ट्रम्प यांच्या अनपेक्षित वागण्यामुळे अमेरिकेचे जुने मित्रही आता त्यांच्यापासून अंतर राखू लागले आहेत.
जागतिक घडामोडी संबंधित बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा : World War 3: ‘या’ अटीमूळे थांबेल युद्ध? लेबनॉनवरील इस्रायली हल्ल्यामुळे इराणचा संयम सुटला; अराघची व्हाईट हाऊसवर कडाडले
ट्रम्प यांची ही चाल इराणला चर्चेच्या टेबलावर आणण्यात यशस्वी ठरली असली, तरी दीर्घकाळात ही रणनीती अमेरिकेसाठी ‘बूमेरँग’ ठरू शकते. शत्रूला गोंधळात टाकणे ही युद्धातील जुनी कला असली, तरी अणुयुगाच्या जगात ‘वेड्या माणसाचा सिद्धांत’ वापरणे म्हणजे आगीशी खेळण्यासारखे आहे. इराण या थिअरीला बळी पडणार की ट्रम्प स्वतःच आपल्या विणलेल्या जाळ्यात अडकणार, हे येणारा काळच सांगेल.
Ans: एखादा नेता स्वतःला अनपेक्षित किंवा अस्थिर म्हणून सादर करतो, जेणेकरून शत्रूने दहशतीमुळे तडजोड करावी, यालाच मॅड मॅन थिअरी म्हणतात.
Ans: अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष रिचर्ड निक्सन यांनी १९६९ मध्ये व्हिएतनाम युद्धादरम्यान या रणनीतीचा शोध लावला होता.
Ans: इराणला दबावाखाली आणून त्यांना अमेरिकेच्या अटी मान्य करायला लावणे आणि होर्मुझची सामुद्रधुनी खुली करणे, हे यामागील मुख्य कारण आहे.






