Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Womens World Cup |
  • Ind vs Aus |
  • Bihar Election 2025 |
  • Political News |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

India Canada Relations : एस. जयशंकर पुढील आठवड्यात कॅनडा दौऱ्यावर ; भारताशी संबंधाना मिळणार नवी दिशा

S. Jaishankar Canada Visit : गेल्या काही महिन्यात भारत आणि कॅनडा संबंधामध्ये पुन्हा सुधारणा होताना दिसत आहे. भारताचे परराष्ट्र मंत्री यासाठी पुढील आठवड्यात कॅनडा दौऱ्यावर जाणार आहेत.

  • By स्वराली शहा
Updated On: Nov 05, 2025 | 08:51 PM
External Affairs Minister Jaishankar to visit Canada next week

External Affairs Minister Jaishankar to visit Canada next week

Follow Us
Close
Follow Us:
  • भारत-कॅनडा संबंधामध्ये सुधारणेचे चिन्ह
  • एस. जयशंकर जाणार कॅनडा दौऱ्यावर
  • दोन्ही देशांतील संबंध दृढ करण्याचा हेतू

S.Jaishankar Canada Visit : नवी दिल्ली/ओटावा : भारत आणि कॅनडा संबंधामध्ये सुधारणा होताना दिसून येत आहे. कॅनडाचे पंतप्रधान मार्क कार्नी (Mark Carney) यांच्या सत्ते आल्यानंतर दोन्ही देशांच्या संबंधाना एक नवी दिशा मिळताना दिसून आली आहे. येत्या आठवड्यात भारताचे परराष्ट्र मंत्री एस. जयशंकर (S. Jaishankar) देखील कॅनडाच्या दौऱ्यावर जाणार आहे. याचा उद्देश अलीकडे सुधारलेले भारत आणि कॅनडा संबंध अधिक दृढ करणे आहे.

भारतीय वंशाचे ममदानी यांनी न्यूयॉर्कमध्ये उडवला विजयी गुलाल; बनले पहिले मुस्लिम महापौर

भारत-कॅनडा संबंधामध्ये सुधार

ANI ने दिलेल्या वृत्तानुसार, येत्या आठवड्यात ११-१२ नोव्हेंबर रोजी जयशंकर कॅनडाला जाणार आहेत. येथे ते ओंटारियोच्या नायगारा प्रदेशात होणाऱ्या G7 परराष्ट्र मंत्र्यांच्या बैठकीत सहभागी होतील. एस. जयशंकर यांचा दौरा सध्या अत्यंत महत्त्वाचा मानला जात आहे. दोन्ही देशांतील संबंध सुधारत आहेत.

तसेच गेल्या महिन्यात कॅनडाच्या परराष्ट्र मंत्री अनिता आनंद यांनी देखील भारताला भेट दिली होती. त्यांनी यावेळी एस. जयशंकर आणि उद्योग मंत्री पियुष गोयल यांची भेट घेतली होती. तसेच त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांचीही भेट घेतली होती. तसेच कॅनडाने G7 परिषदेसाठी मोदींना आमंत्रणही दिले होते.

का बिघडले होते भारत कॅनडा संबंध?

कॅनडात खलिस्तानी दहशतवादी हरदीप सिंग निज्जर यांची १८ जून २०२३ रोजी हत्या करण्यात आली होती. गुरुद्वाराबाहेर त्याच्यावर गोळ्या झाडण्यात आल्या होत्या. तसेच भारताने निज्जरला मोस्ट वॉन्टेड दहशतवादी म्हणून घोषित केले होते. निज्जरवर भारतात अनेक खून आणि दहशतवादी कारवायां केल्याचा आरोप होता.

पण कॅनडाने त्याच्यावर कोणतीही कारवाई केली नव्हती. यामुळे दोन्ही देशांमध्ये तणाव निर्माण झाला होता. त्यानंतर कॅनडाचे माजी पंतप्रधान जस्टिन ट्रुडो (Justin Trudeau)  यांच्या निज्जरच्या हत्येत भारताचा सहभागाच्या आरोपामुळे हे संबंध अधिक बिघडले.  परंतु कॅनडाचे नवे पंतप्रधान मार्क कार्नी यांच्या दोन्ही देशांतील संबंध सुधारण्याच्या सकारात्मक दृष्टीकोनाने भारताला परिषेदसाठी आमंत्रण मिळाले आहे.

External Affairs Minister Jaishankar to visit Canada next week (file pic) pic.twitter.com/yG66JR8Jv5 — ANI (@ANI) November 5, 2025

भारत कॅनडा संबंधावर खलिस्तानी नाराज

कॅनडाचे नवे पंतप्रधान मार्क कार्नी यांनी भारतासोबत मैत्री सुधारण्याची भूमिका स्वीकारली आहे. मात्र यामुळे कॅनडातील खलिस्तानी नाराज झाल्याचे दिसून येत आहे. कट्टर खलिस्तानी समर्थक संस्था शीख फॉर जस्टिस (SFJ) ने भारताविरोधात युद्ध पुकारले आहे. त्यांनी व्हॅंकुव्हरमधील भारतीय दूतावास ताब्यात घेण्याची धमकीही दिली होती.

FAQs(संबंधित प्रश्न)

भारत आणि कॅनडातील संबंध का बिघडले होते?

खलिस्तानी समर्थक हरदीप सिंग निज्जर यांची २०२३ मध्ये हत्या करण्यात आली होती. त्याच्या हत्येचा आरोप कॅनडाचे माजी पंतप्रधान जस्टिनी ट्रुडो यांनी भारतावर केला होता. यामुळे भारत कॅनडा संबंध ताणले गेले.

खलिस्तानी समर्थकांनी भारताला काय धमकी दिली?

खलिस्तानी समर्थकांनी भारताला कॅनडातील वाणिज्य दूतावास ताब्यात घेण्याची धमकी दिली आहे.

Amercia Shutdown : ट्रम्पमुळे अर्थव्यवस्थेचे वाजले बारा! शटडाऊनमुळे तब्बल ‘इतक्या’ ट्रिलियन डॉलर्सचे नुकसान

Web Title: External affairs minister jaishankar to visit canada next week

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Nov 05, 2025 | 08:51 PM

Topics:  

  • Canada
  • Justin Trudeau
  • S. Jaishankar
  • World news

संबंधित बातम्या

भारत आक्रमक होताच युनूस सरकार झुकले! इस्लामिक धर्मप्रचारक आणि गुन्ह्यांमध्ये मोस्ट वॉन्टेड नाईकच्या दौऱ्यावर घातली बंदी
1

भारत आक्रमक होताच युनूस सरकार झुकले! इस्लामिक धर्मप्रचारक आणि गुन्ह्यांमध्ये मोस्ट वॉन्टेड नाईकच्या दौऱ्यावर घातली बंदी

न्यूयॉर्कच्या महापौरपदी भारतीय वंशाच्या ममदानींची निवड; विजयी भाषणात ‘धूम मचाले’चा दिसला जलवा Video Viral
2

न्यूयॉर्कच्या महापौरपदी भारतीय वंशाच्या ममदानींची निवड; विजयी भाषणात ‘धूम मचाले’चा दिसला जलवा Video Viral

Amercia Shutdown : ट्रम्पमुळे अर्थव्यवस्थेचे वाजले बारा! शटडाऊनमुळे तब्बल ‘इतक्या’ ट्रिलियन डॉलर्सचे नुकसान
3

Amercia Shutdown : ट्रम्पमुळे अर्थव्यवस्थेचे वाजले बारा! शटडाऊनमुळे तब्बल ‘इतक्या’ ट्रिलियन डॉलर्सचे नुकसान

भारतीय वंशाचे ममदानी यांनी न्यूयॉर्कमध्ये उडवला विजयी गुलाल; बनले पहिले मुस्लिम महापौर
4

भारतीय वंशाचे ममदानी यांनी न्यूयॉर्कमध्ये उडवला विजयी गुलाल; बनले पहिले मुस्लिम महापौर

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.