
FATF Greylist 2025 south, africa, nigeria, mosambic exit from FATA list
FATF Black List 2025 : नवी दिल्ली : जागतिक दहशतवाद आणि मनी लॉंडरिंग विरोधी संस्था FATF ने एक मोठी कारवाई केली आहे. दहशतवादाला पाठिंबा देणाऱ्या देशांना ग्रे लिस्टमध्ये टाकले आहे. यामध्ये उत्तर कोरियात, इराण, म्यानमार हे देश ग्रे लिस्टमध्येच आहेत. तर काही देशांना या ग्रे लिस्टमधून काढून टाकण्यात आले आहे. या देशांना FATA ने गंभीर इशारा देखील दिला आहे.
FATF च्या ग्रे लिस्टमधील देशांना आंतरराष्ट्रीय आर्थिक संस्थांसोबचे व्यवहार आणि संसाधनांचा वापर मार्यादित राहणार आहे. यामुळे हे देश दहशतवादा विरोधी सुधारणा करतील. FATF ने सर्व देशांना आवाहन करत म्हटले आहे की, दहशतवादाला पाठिंबा देणाऱ्या देशांनी आंतरराष्ट्रीय आर्थिक व्यवहारांकडे गांभीर्याने लक्ष द्यावे. तसेच या देशांनी जागतिक आर्थिक सुरक्षितता सुनिश्चित करावी. याशिवाय दहशतवाद विरोधी कारवाई करण्याचेही आवाहन FATF ने केले आहे.
इराण, म्यानमार, उत्तर कोरिया, हे देश ब्लॅक लिस्टमध्येच राहतील असे म्हटले आहे. FATF च्या मते, हे देश केवळ दहशतवाद आणि मनी लॉंडरिंग विरोधी कायदे लागू करण्यात अपयशी ठरले आहेत. तसेच जागतिक आर्थिक व्यवस्थेलाही या देशांमुळे मोठा धोका निर्माण झाला आहे.
FATF ने २०२५ मध्ये अनेक देशांच्या प्रगतीचा आणि इतर काही पैलूंचा अभ्यास केला. यावरुन त्यांनी, अल्जेरिया, अंगोला, बल्गेरिया, बुर्किना फासो, कॅमेरुन, कोट’डी आयव्होअर, डेमोक्रॅटिक रिपब्लिक ऑफ द काँगो, केनिया, लाओ पीडीआर, मोनाको, मोझांबिक, नामिबिया, नेपाळ, नायजेरिया, दक्षिण आफ्रिका, दक्षिण सुदान, सीरिया, व्हेनेझुएला आणि व्हिएतनाम यासह अनेक देशांच्या प्रगतीचा आढावा घेतला. हे देश देखील अद्यापही ग्रे लिस्टमध्ये आहेत.
या ब्लॅक लिस्टमधून, बुर्किना फासो, मोझांबिक, नायजेरिया आणि दक्षिण आफ्रिका यांना काढून टाकण्यात आले आहे. FATF ने या देशांना म्हटले आहे की, ब्लॅक लिस्टमधून काढून टाकण्यात आले याचा अर्थ तुम्हाला दहशतवादाला कोणत्याही प्रकारचा निधी देण्याची, मदत करण्याची मुभा नाही. हा इशारा केवळ पाकिस्तानलाच नव्हे, तर ब्लॅक लिस्टमधील दहशतवादाला पाठिंबा देणाऱ्या देशांनाही देण्यात आला आहे.
पाकिस्तानला FATF चा इशारा
दरम्यान या ग्रे लिस्टमधून पाकिस्तानला २०२२ मध्ये काढून टाकण्यात आले होते. परंतु पाकिस्तानमधील अलीकडच्या घटना पाहता, तसेच भारताच्या पहलगामवरील हल्ल यावरुन पाकिस्तानला FATF ने कडक इशारा दिला आहे. FATF च्या अध्यक्ष एलिसा डी अँडा माद्रोझो यांनी म्हटेल आहे की, पाकिस्तानला ग्रे लिस्टमधून बाहेर काढल्या अर्थ त्यांना दहशतवादी कारवाया किंवा त्यांना पाठिंबा देण्याची मुभा नाही. त्यांच्यावर आणि जगभरातील दहशतवादी नेटवर्कवर FATF ची नजर असल्याचे त्यांनी म्हटले आहे.
प्रश्न १. FATF च्या ग्रे लिस्टमधून कोणत्या देशांना काढून टाकण्यात आले आहे?
बुर्किना फासो, मोझांबिक, नायजेरिया आणि दक्षिण आफ्रिका या देशांना, तसेच २०२२ मध्ये पाकिस्तानला ग्रे लिस्टमधून काढून टाकण्यात आले आहे.
प्रश्न २. FATF ने पाकिस्तानला काय इशारा दिला आहे?
FATF ने पाकिस्तानला म्हटले आहे की, त्यांना ग्रे लिस्टमधून काढून टाकल्याचा अर्थ असा नाही की, ते दहशतवादाला किंवा दहशतवाद्यांना कोणत्याही प्रकारचा पाठिंबा देतील. त्यांच्यावर FATF बारकाईने लक्ष ठेवून आहे.