Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • सोम, 10 ऑगस्ट 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • IND vs SL |
  • Politics |
  • NEET Exam |
  • maharashtra |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

FCRA Bill 2026: ‘एफसीआरए कायदा कोणत्याही धर्माविरोधात नाही!’; भारतीय राजदूतांनी पुराव्यांसह केले अमेरिकेच्या प्रचाराचे खंडन

भारताच्या प्रस्तावित एफसीआरए दुरुस्ती विधेयकामुळे अमेरिकेतील ख्रिश्चन संघटना चिंतेत आहेत. परदेशी धर्मादाय संस्था आणि विशेषतः ख्रिश्चन समुदायाला लक्ष्य करण्यासाठी हे विधेयक आणण्यात आल्याचे त्यांचे म्हणणे आहे. यावर भारतीय राजदूतांनी प्रतिक्रिया दिली आहे.

  • By हर्षदा पाटोळे
Updated On: Aug 10, 2026 | 12:03 PM
FCRA Amendment Bill 2026 Vinay Mohan Kwatra

FCRA Amendment Bill 2026 Vinay Mohan Kwatra

Follow Us
Follow Us:
  • ‘एफसीआरए’ दुरुस्ती विधेयक कोणत्याही धर्माला लक्ष्य करत नाही
  • अमेरिकन खासदाराचे दावे आणि गैरसमज मोडून काढले
  • अमेरिका आणि इतर देशांमध्येही असाच कायदा

भारताच्या प्रस्तावित परकीय योगदान (नियमन) सुधारणा विधेयक, २०२६ (Foreign Contribution Regulation Amendment Bill 2026) वरून आंतरराष्ट्रीय स्तरावर विशेषतः अमेरिकेत राजकीय आणि सामाजिक चर्चांना उधाण आले आहे. अमेरिकेतील काही ख्रिश्चन संघटना आणि एका खासदाराने असा आरोप केला होता की, हे विधेयक भारतातील ख्रिश्चन धर्मप्रसारक, चर्च आणि धार्मिक धर्मादाय संस्थांना लक्ष्य करण्यासाठी आणले गेले आहे. मात्र, अमेरिकेतील भारताचे राजदूत विनय मोहन क्वात्रा यांनी सोशल मीडिया प्लॅटफॉर्म ‘एक्स’ (X) वर एकापाठोपाठ एक पोस्ट करत या सर्व आरोपांचे आणि अफवांचे पुराव्यांसह जोरदार खंडन केले आहे. क्वात्रा यांनी स्पष्ट केले की, हा कायदा कोणत्याही धर्माला, नागरी समाजाला वा स्वयंसेवी संस्थांना (NGOs) त्रास देण्यासाठी नसून, परदेशी निधीमध्ये पारदर्शकता, उत्तरदायित्व आणि राष्ट्रीय सुरक्षा सुनिश्चित करण्यासाठी आहे.

भारतीय राजदूतांनी ‘मीथ व्हर्सेस रिअॅलिटी’ (गैरसमज विरुद्ध वस्तुस्थिती) मांडत ५ प्रमुख मुद्द्यांवर सविस्तर स्पष्टीकरण दिले. पहिला गैरसमज असा पसरवला जात होता की, भारत नागरी समाजाला मिळणारी परदेशी मदत रोखण्याचा प्रयत्न करत आहे. यावर क्वात्रा यांनी स्पष्ट केले की, कोणत्याही लोकशाही देशात सार्वजनिक आणि राजकीय क्षेत्रात येणाऱ्या परदेशी पैशांच्या प्रवाहावर नियंत्रण ठेवणे हे राष्ट्रीय सुरक्षेशी संबंधित सार्वभौम कार्य आहे. भारतामध्ये एफसीआरए कायदा सर्वप्रथम १९७६ मध्ये आला आणि २०१०, २०१६, २०१८ व २०२० मध्ये त्यात सुधारणा करण्यात आल्या. २०२६ चे विधेयक याच दिशेने उचललेले एक पारदर्शक पाऊल आहे. भारतात आरोग्य, शिक्षण, आपत्ती निवारण आणि मानवी कल्याणासाठी काम करणाऱ्या हजारो संस्थांना नियमितपणे कायदेशीर परदेशी निधी मिळत आहे.

जागतिक घडामोडी संबंधित बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा : EODExercise2026 : सागरी सुरक्षा होणार भक्कम! India-US Navyचा कोचीमध्ये 5 दिवसीय ‘ईओडी’ सराव; जाणून घ्या सविस्तर अपडेट

परदेशी निधी कमी झाला नाही तर वाढला; ३० लाख संस्थांपैकी केवळ १४,४५० एफसीआरएमध्ये

दुसरा गैरसमज असा निर्माण केला गेला की, एफसीआरए नियमांमुळे स्वयंसेवी संस्था आणि धर्मादाय संस्थांचे काम ठप्प झाले आहे. याचे खंडन करताना राजदूतांनी आकडेवारी सादर केली. भारतात येणारा परदेशी निधी कमी झालेला नसून तो २०१०-११ मधील १.२ अब्ज डॉलर्सवरून २०२४-२५ मध्ये २.६७ अब्ज डॉलर्सवर पोहोचला आहे. याशिवाय, भारतात एकूण ३० लाखांहून अधिक स्वयंसेवी संस्था कार्यरत आहेत, ज्यांपैकी केवळ १४,४५० संस्थांकडे एफसीआरए नोंदणी आहे. याचा अर्थ बहुतांश नागरी समाज संस्था या कायद्याच्या कचाट्यात किंवा कक्षेबाहेरच आहेत. एफसीआरए कोणत्याही संस्थेला परदेशी अनुदान घेण्यापासून रोखत नाही; ते फक्त तीन गोष्टी मागते – नोंदणी करा, योग्य मार्गाने पैसे घ्या आणि त्या पैशांचा हिशोब द्या.

There are many misunderstandings in the media and in civil society about the proposed Foreign Contribution (Regulation) Amendment Bill(FCRA), 2026.
Here is the Myth vs. Reality check.
— Amb Vinay Mohan Kwatra (@AmbVMKwatra) August 10, 2026

credit – social media and Twitter

तिसरा गैरसमज धार्मिक संस्थांच्या मालमत्ता जप्त करण्याबाबत पसरवला जात होता. त्यावर उत्तर देताना क्वात्रा म्हणाले की, नोंदणी रद्द झाल्यास किंवा सरेंडर केल्यास परदेशी निधीतून निर्माण झालेली मालमत्ता राज्य सरकारच्या नियंत्रणाखाली जाण्याचा नियम २०१० पासूनच लागू आहे, त्यात काहीही नवीन नाही. उलट २०२६ चे विधेयक या मालमत्तेचे संरक्षण करण्यासाठी एका प्राधिकरणाची स्थापना करते आणि जर संस्थेने आपली नोंदणी पुन्हा बहाल केली, तर सर्व मालमत्ता आणि निधी पूर्णपणे परत मिळवण्याची तरतूद करते. प्रार्थनास्थळांचे धार्मिक स्वरूप अबाधित राहावे यासाठी विशेष संरक्षण देण्यात आले आहे.

जागतिक घडामोडी संबंधित बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा : World Biofuel Day: शेंगदाण्याच्या तेलापासून सुरू झालेला रंजक प्रवास; जाणून घ्या ‘जागतिक जैवइंधन दिना’चा इतिहास अन् भारताची भूमिका

अमेरिकेतही FARA अन् FATCA लागू; मग भारतावरच आक्षेप का?

चौथा गैरसमज म्हणजे हा कायदा एका विशिष्ट धर्माला वा ख्रिश्चन समुदायाला लक्ष्य करतो. राजदूतांनी हे पूर्णपणे खोटे असल्याचे सांगत स्पष्ट केले की, हा कायदा जात, धर्म किंवा विचारसरणीचा विचार न करता सर्व संस्थांना समान रीतीने लागू होतो. कोणत्याही धर्माच्या संस्थांचे कल्याणकारी आणि धार्मिक कार्य परदेशी निधीसाठी पात्र राहतात.

पाचवा गैरसमज असा की, फक्त भारतच असा कठोर कायदा आणत आहे. यावर क्वात्रा यांनी पाश्चात्य देशांचा बुरखा फाडला. अमेरिकेत १९३८ पासून ‘FARA’ (Foreign Agents Registration Act) आणि २०१० पासून ‘FATCA’ लागू आहे. ऑस्ट्रेलियाने २०१८ मध्ये, कॅनडाने २०२४ मध्ये आणि युकेने जुलै २०२५ मध्ये असाच कायदा लागू केला आहे, तर युरोपियन युनियनदेखील असा कायदा बनवत आहे. त्यामुळे भारताने आपल्या राष्ट्रीय सुरक्षेसाठी आणि पारदर्शकतेसाठी कायदा सुधारणे हा पूर्णपणे सार्वभौम अधिकार आहे, असे ठाम प्रतिपादन भारतीय राजदूतांनी केले.

Web Title: Fcra amendment bill 2026 indian ambassador vinay mohan kwatra debunks myths marathi news

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Aug 10, 2026 | 12:03 PM

Topics:  

  • America
  • India news
  • World news

संबंधित बातम्या

EODExercise2026 : सागरी सुरक्षा होणार भक्कम! India-US Navyचा कोचीमध्ये 5 दिवसीय ‘ईओडी’ सराव; जाणून घ्या सविस्तर अपडेट
1

EODExercise2026 : सागरी सुरक्षा होणार भक्कम! India-US Navyचा कोचीमध्ये 5 दिवसीय ‘ईओडी’ सराव; जाणून घ्या सविस्तर अपडेट

Russia-India Railway corridor: रशिया ते भारत जमिनीवरून जोडला जाणार व्यापार; पाकिस्तानसह ‘या’ 5 देशांमधून धावणार रेल्वे
2

Russia-India Railway corridor: रशिया ते भारत जमिनीवरून जोडला जाणार व्यापार; पाकिस्तानसह ‘या’ 5 देशांमधून धावणार रेल्वे

Brown University scholarship: १७ वर्षीय प्रणवची कमाल! अमेरिकेत मोफत शिक्षणासाठी मिळवली ३.५५ कोटींची स्कॉलरशिप
3

Brown University scholarship: १७ वर्षीय प्रणवची कमाल! अमेरिकेत मोफत शिक्षणासाठी मिळवली ३.५५ कोटींची स्कॉलरशिप

PoK Protests: आधी दहशतवादी, आता देशभक्त! पीओके मधील हिंसक आंदोलनांपुढे शहबाज शरीफ लाचार; 400 हून अधिक नागरिकांचा मृत्यू
4

PoK Protests: आधी दहशतवादी, आता देशभक्त! पीओके मधील हिंसक आंदोलनांपुढे शहबाज शरीफ लाचार; 400 हून अधिक नागरिकांचा मृत्यू

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.