Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Dussehra |
  • Navratri |
  • Ind vs Wi test |
  • Bihar Election 2025 |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

अमेरिकेत ‘बर्ड फ्लू’मुळे पहिल्या मानवी मृत्यूची नोंद; व्यक्तीला H5N1 व्हायरसची झाली होती लागण

Bird Flu Death: अमेरिकेत बर्ड फ्लूमुळे पहिला मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे. लुईझियाना राज्यातील आरोग्य विभागाने अमेरिकेत बर्ड फ्लूमुळे (H5N1) पहिल्या मानवी मृत्यूची नोंद केली आहे.

  • By स्वराली शहा
Updated On: Jan 07, 2025 | 12:30 PM
Bird Flu Death: अमेरिकेत बर्ड फ्लूमुळे पहिल्या मानवी मृत्यूची नोंद; व्यक्तीला H5N1 व्हायरसची झाली होती लागण

Bird Flu Death: अमेरिकेत बर्ड फ्लूमुळे पहिल्या मानवी मृत्यूची नोंद; व्यक्तीला H5N1 व्हायरसची झाली होती लागण

Follow Us
Close
Follow Us:

वॉश्गिंटन: अमेरिकेत बर्ड फ्लूमुळे पहिला मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे. लुईझियाना राज्यातील आरोग्य विभागाने अमेरिकेत बर्ड फ्लूमुळे (H5N1) पहिल्या मानवी मृत्यूची नोंद केली आहे. आरोग्य विभागाने दिलेल्या माहितीनुसार, 65 वर्षीय रुग्णाचा बळी गेला असून त्याला आधीच काही गंभीर आरोग्य समस्या होत्या. हा रुग्ण अत्यंत संसर्गजन्य एवियन इन्फ्लुएन्झा (HPAI) किंवा H5N1 व्हायरसच्या संसर्गामुळे ग्रस्त होता असे लुईझियाच्या आरोग्य विभागाने म्हटले.

पंक्ष्यांच्या संपर्कात आल्याने H5N1 ची लागण

ही घटना लुईझियाना तसेच अमेरिकेत बर्ड फ्लूमुळे झालेल्या पहिल्या मानवी मृत्यूची नोंद म्हणून महत्त्वपूर्ण मानली जात आहे. आरोग्य विभागाच्या म्हणण्यानुसार, रुग्ण जंगली पक्ष्यांच्या संपूर्कात आल्यामुळे H5N1 व्हायरसने संक्रमित झाला. नंतर त्याला रुग्णालयात दाखल करण्यात आले.

मात्र, उपचारांदरम्यान त्याचा मृत्यू झाला. तपासादरम्यान असे आढळून आले की, हा संसर्ग मानवी संपर्काद्वारे पसरलेला नाही. आरोग्य विभागाने हेही स्पष्ट केले आहे की, देशातील इतर भागांत कोणत्याही मानवी संसर्गाची नोंद झालेली नाही, आणि ही घटना एकट्या घटनेपुरती मर्यादित आहे.

जागतिक घडामोडी संबंधित बातम्या – ट्रुडोंनी राजीनामा देताच ट्रम्प यांची प्रतिक्रिया; कॅनडाला अमेरिकेचा भाग होण्याच्या ऑफरचा केला पुनरुच्चार

सार्वजनिक आरोग्यावर परिणाम

लुईझियाना आरोग्य विभागाने दिलेल्या माहितीनुसार, बर्ड फ्लूमुळे सर्वसामान्य जनतेला संसर्ग होण्याचा धोका सध्या कमी आहे. तथापि, ज्या लोकांचा पक्षीपालन, कोंबड्यांचे उत्पादन, किंवा इतर संभाव्य संक्रमित प्राण्यांशी संपर्क असतो, त्यांना अधिक धोका असतो. त्यामुळे आरोग्य विभागाने लोकांना सल्ला दिला आहे की, जंगली पक्ष्यांशी किंवा H5N1 व्हायरसने संक्रमित होऊ शकणाऱ्या प्राण्यांशी थेट संपर्क टाळावा.

H5N1 व्हायरसविषयी CDCची माहिती

यूएस सेंटर फॉर डिजीज कंट्रोल अँड प्रिव्हेंशन (CDC) च्या अहवालानुसार, आतापर्यंत अमेरिकेत बर्ड फ्लूमुळे 66 मानवी प्रकरणे नोंदवली गेली आहेत. ज्या राज्यांमध्ये बर्ड फ्लूचे रुग्ण आढळले आहेत, त्यामध्ये कॅलिफोर्निया, कोलोरॅडो, आयोवा, लुईझियाना, मिशिगन, ओरेगन, मिसुरी, वॉशिंग्टन, विस्कॉन्सिन, आणि टेक्सास यांचा समावेश आहे. लुईझियानामधील या प्रकरणाने H5N1 व्हायरसच्या संसर्गामुळे बर्ड फ्लूच्या पहिल्या मानवी मृत्यूची नोंद झाली आहे.

जरी सध्याचा धोका मर्यादित असला तरी सार्वजनिक आरोग्य यंत्रणा सजग आहेत. लोकांनी योग्य खबरदारी घेऊन जंगली प्राण्यांच्या संपर्कापासून स्वत:ला दूर ठेवण्याचा सल्ला मानावा. यासोबतच, कोंबडी उत्पादन क्षेत्रातील कामगारांनी योग्य सुरक्षा उपकरणे वापरणे आणि व्हायरसविरोधी प्रतिबंधक उपाय करणे महत्त्वाचे ठरते. संसर्गजन्य आजारांच्या संभाव्य वाढीवर लक्ष ठेवणे आणि वेळीच उपाययोजना करणे ही सध्याच्या परिस्थितीत काळाची गरज आहे.

जागतिक घडामोडी संबंधित बातम्या- नेपाळ-तिबेटच्या भूकंपात आत्तापर्यंत 53 जणांचा बळी; शोधकार्य अद्यापही सुरुच

Web Title: First human death reported in us due to bird flu nrss

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jan 07, 2025 | 12:28 PM

Topics:  

  • US
  • World news

संबंधित बातम्या

२ लाख घ्या अन् अमेरिका सोडा…; कोणाला दिली ट्रम्प प्रशासनाने ही ऑफर? काय आहे प्रकरण? 
1

२ लाख घ्या अन् अमेरिका सोडा…; कोणाला दिली ट्रम्प प्रशासनाने ही ऑफर? काय आहे प्रकरण? 

Syria News : सीरियाच्या माजी राष्ट्राध्यक्षांची हत्या करण्याचा प्रयत्न; रशियामध्ये विषप्रयोग झाल्याची चर्चा
2

Syria News : सीरियाच्या माजी राष्ट्राध्यक्षांची हत्या करण्याचा प्रयत्न; रशियामध्ये विषप्रयोग झाल्याची चर्चा

ब्रिटनचे पंतप्रधान भारत दौऱ्यावर येणार; दोन्ही देशांच्या विज्ञान आणि तंत्रज्ञान संबंधांना मिळणार नवी दिशा
3

ब्रिटनचे पंतप्रधान भारत दौऱ्यावर येणार; दोन्ही देशांच्या विज्ञान आणि तंत्रज्ञान संबंधांना मिळणार नवी दिशा

नेपाळमध्ये मुसळधार पावसाचा इशारा जारी; भूस्खलनाच्या भीतीने काठमांडूत वाहतूकीवर बंदी
4

नेपाळमध्ये मुसळधार पावसाचा इशारा जारी; भूस्खलनाच्या भीतीने काठमांडूत वाहतूकीवर बंदी

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.