Flydubai FZ1073: फ्लायदुबई विमान घटनेबाबत नवा खुलासा; ओमानी को-पायलट २०२४ मध्ये झाला होता सस्पेंड, जवळ आढळले अतिरेकी साहित्य ( फोटो सौजन्य : सोशल मीडिया )
दुबईहून इस्रायलमधील तेल अवीवकडे जाणाऱ्या फ्लायदुबईच्या (Flydubai FZ1073) या विमानात घडलेल्या भीषण कॉकपिट हल्ला प्रकरणाला आता एक अत्यंत गंभीर आणि आंतरराष्ट्रीय वळण मिळाले आहे. विमानाचे भारतीय कॅप्टन स्मित मच्छर यांच्यावर प्राणघातक हल्ला करणाऱ्या ओमानच्या सह-वैमानिकाबाबत अत्यंत धक्कादायक माहिती समोर आली आहे. आंतरराष्ट्रीय माध्यमांच्या अहवालानुसार, आरोपी सह-वैमानिकाला पूर्वी काम करत असलेल्या ‘ओमान एअर’ने राष्ट्रीय व विमान वाहतूक सुरक्षेच्या कारणास्तव निलंबित केले होते. या खुलाशामुळे आता संपूर्ण जगातील विमान वाहतूक यंत्रणांच्या सुरक्षा तपासणीवर आणि कर्मचाऱ्यांच्या पार्श्वभूमी पडताळणीवर (Background Verification) मोठे प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.
अहवालानुसार, आरोपी सह-वैमानिक हम्माम अल हमामी हा २०२४ मध्ये ओमान एअरमध्ये प्रशिक्षणार्थी सह-वैमानिक (Trainee Co-pilot) म्हणून कार्यरत होता. त्यादरम्यान सुरक्षा तपासणीत त्याच्या ताब्यात अत्यंत संशयास्पद आणि सुरक्षेसाठी धोकादायक मानले जाणारे अतिरेकी साहित्य सापडले होते. या गंभीर घटनेनंतर ओमान एअरने त्याला उड्डाण कर्तव्यावरून तात्काळ निलंबित केले होते. मात्र, आश्चर्याची बाब म्हणजे त्याला एअरलाइनमधून पूर्णपणे बाहेर न काढता केवळ प्रशासकीय किंवाDesk डेस्क जॉबच्या भूमिकेत ठेवण्यात आले होते. यानंतर असा धोकादायक पार्श्वभूमी असलेला व्यक्ती फ्लायदुबईसारख्या आंतरराष्ट्रीय एअरलाइनमध्ये फर्स्ट ऑफिसर म्हणून कसा रुजू झाला, हा आता तपासाचा मुख्य विषय बनला आहे.
जागतिक घडामोडी संबंधित बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा : Yemen Conflict : मध्यपूर्वेत युद्धाची चाहूल! हुथींवर मोठ्या लष्करी कारवाईची तयारी; सौदीची 1 लाख सैनिकांसह आक्रमक रणनीती
दुबईहून इस्रायलमधील तेल अवीवकडे जाणाऱ्या फ्लायदुबईच्या FZ1073 या विमानात घडलेल्या भीषण कॉकपिट हल्ला प्रकरणाला आता एक अत्यंत गंभीर आणि आंतरराष्ट्रीय वळण मिळाले आहे. विमानाचे भारतीय कॅप्टन स्मित मच्छर यांच्यावर प्राणघातक हल्ला करणाऱ्या ओमानच्या सह-वैमानिकाबाबत अत्यंत धक्कादायक माहिती समोर आली आहे. आंतरराष्ट्रीय माध्यमांच्या अहवालानुसार, आरोपी सह-वैमानिकाला पूर्वी काम करत असलेल्या ‘ओमान एअर’ने राष्ट्रीय व विमान वाहतूक सुरक्षेच्या कारणास्तव निलंबित केले होते. या खुलाशामुळे आता संपूर्ण जगातील विमान वाहतूक यंत्रणांच्या सुरक्षा तपासणीवर आणि कर्मचाऱ्यांच्या पार्श्वभूमी पडताळणीवर (Background Verification) मोठे प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.
अहवालानुसार, आरोपी सह-वैमानिक हम्माम अल हमामी हा २०२४ मध्ये ओमान एअरमध्ये प्रशिक्षणार्थी सह-वैमानिक (Trainee Co-pilot) म्हणून कार्यरत होता. त्यादरम्यान सुरक्षा तपासणीत त्याच्या ताब्यात अत्यंत संशयास्पद आणि सुरक्षेसाठी धोकादायक मानले जाणारे अतिरेकी साहित्य सापडले होते. या गंभीर घटनेनंतर ओमान एअरने त्याला उड्डाण कर्तव्यावरून तात्काळ निलंबित केले होते. मात्र, आश्चर्याची बाब म्हणजे त्याला एअरलाइनमधून पूर्णपणे बाहेर न काढता केवळ प्रशासकीय किंवाDesk डेस्क जॉबच्या भूमिकेत ठेवण्यात आले होते. यानंतर असा धोकादायक पार्श्वभूमी असलेला व्यक्ती फ्लायदुबईसारख्या आंतरराष्ट्रीय एअरलाइनमध्ये फर्स्ट ऑफिसर म्हणून कसा रुजू झाला, हा आता तपासाचा मुख्य विषय बनला आहे.
जागतिक घडामोडी संबंधित बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा : US Visa Policy 2026 : अमेरिकेचा व्हिसा हवाय? तर सोशल मीडिया प्रोफाइल ठेवावे लागणार ‘पब्लिक’; ट्रम्प प्रशासनाचा नवा आदेश
बुधवारी, ३० सप्टेंबर रोजी फ्लायदुबईचे FZ1073 हे विमान १८२ प्रवासी आणि कर्मचाऱ्यांना घेऊन दुबईहून तेल अवीवच्या दिशेने उड्डाण करत होते. विमान हवेत असतानाच कॉकपिटमध्ये सह-वैमानिक हम्माम अल हमामी याने अचानक मुख्य कॅप्टन स्मित मच्छर यांच्यावर चाकूने प्राणघातक हल्ला केला. या हल्ल्यात भारतीय कॅप्टन गंभीर जखमी झाले आणि अचानक झालेल्या या गदारोळामुळे विमानाचे नियंत्रण सुटून ते वेगाने जमिनीच्या दिशेने खाली जाऊ लागले. कॉकपिटमधील दृश्य अत्यंत भयावह होते आणि विमानातील प्रवाशांमध्ये घबराट पसरली होती.
अत्यंत गंभीर दुखापत झाली असताना आणि रक्तस्त्राव होत असतानाही कॅप्टन स्मित मच्छर यांनी हार मानली नाही. विमान कोसळणार असल्याची जाणीव होताच त्यांनी आपल्या प्राणाची पर्वा न करता कॉकपिटचा दरवाजा उघडला. कॉकपिटचा दरवाजा उघडताच विमानात असलेल्या सतर्क प्रवाशांनी आणि केबिन क्रूने तातडीने आत प्रवेश केला आणि हिंसक बनलेल्या संशयित सह-वैमानिकाला पकडून बांधून ठेवले. कॅप्टन मच्छर यांच्या या अभूतपूर्व शौर्यामुळे आणि प्रसंगावधानामुळे विमानावरील नियंत्रण पुन्हा मिळवणे शक्य झाले.
कॉकपिटमधील आपत्कालीन परिस्थितीनंतर विमानाची दिशा तात्काळ सौदी अरेबियाच्या तबूक (Tabuk) विमानतळाकडे वळवण्यात आली. तिथे विमानाचे सुरक्षित आपत्कालीन लँडिंग (Emergency Landing) करण्यात आले. विमानावरील सर्व १८२ प्रवासी आणि कर्मचारी सुरक्षित राहिल्याने मोठा अनर्थ टळला. जखमी कॅप्टन मच्छर यांच्यावर तात्काळ वैद्यकीय उपचार करण्यात आले. या घटनेनंतर भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही कॅप्टन मच्छर यांच्याशी फोनवरून संवाद साधून त्यांच्या प्रकृतीची विचारपूस केली आणि त्यांच्या असीम धैर्याचे कौतुक केले.
दुसरीकडे, गुरुवारी सौदी अरेबियाच्या प्रशासनाने आरोपी हमामी याला संयुक्त अरब अमिराती (UAE) च्या पोलिसांच्या स्वाधीन केले आहे. सध्या युएईचे सरकारी वकील आणि आंतरराष्ट्रीय तपास यंत्रणा या घटनेचा सखोल तपास करत आहेत. हा केवळ एका माथेफेरूकडून झालेला हल्ला होता की यामागे एखादी आंतरराष्ट्रीय दहशतवादी संघटना किंवा पूर्वनियोजित कट होता, याचा कसून शोध घेतला जात आहे. सुरक्षा यंत्रणा आता ओमान एअरपासून ते फ्लायदुबईपर्यंतच्या सर्व टप्प्यांवरील कागदपत्रांची आणि सुरक्षेतील त्रुटींची चौकशी करत आहेत.






