नोबेल पुरस्कार पाकिस्तानच्या पंतप्रधानांना मिळाला पाहिजे ; 'या' वरिष्ठ अधिकाऱ्याच्या वक्तव्याने उडाली खळबळ (फोटो सौजन्य: सोशल मीडिया)
जम्मू-काश्मीरचे माजी पोलिस महासंचालक (DGP) एस.पी. वैद यांनी पाकिस्तानच्या पंतप्रधान शाहबाज शरीफला चांगलेच फटकारले. तसेच त्यांनी म्हटले आहे की, नोबेल पुरस्कार हा पाकिस्तानला मिळाला पाहिजे. वैद यांच्या मते, पाकिस्तान सतत खोटे बोलणारा देश असून यासाठी ते पुरस्कारास पात्र आहेत, अशी चपलख टिप्पीणी त्यांनी केली आहे.
त्यांनी म्हटले की, अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प (Donald Trump) यांना हा पुरस्कार देण्यापूर्वी पाकिस्तानचे पंतप्रधान शाहबाज शरीफ आणि लष्करप्रमुख असीम मुनीर (Asim Munir) यांना देण्यात यावा. त्यांना हा पुरस्कार सतत खोटे बोलण्यासाठी आणि भारतावर खोटे आरोप करण्यासाठी दिला पाहिजे.
‘दहशतवादाचा गौरव थांबवा’ ; UN मध्ये पाकिस्तान पंतप्रधानांच्या ‘ढोंगीपणा’वर दिले प्रत्युत्तर
पाकिस्तान नागरिकांवरील बॉम्ब हल्ल्यावर वैद यांची टीका
तसेच वैद यांनी म्हटले की, पाकिस्तान सरकार आणि सैन्याला वेड लागले आहे. ते त्यांच्याच नागरिकांनर हल्ला करत आहेत. त्यांनी म्हटले की, भारत कधीही आपल्या लोकांवर बॉम्ब टाकत नाही.
याशिवाय त्यांनी खैबर पख्तूनख्वा आणि बलुचिस्तानमधील लोकांवर देखील पाकिस्तान अत्यचार करत असल्याचे वेद यांनी म्हटले. पण याला पाकिस्तानने नकार दिला. यामुळे खोटे बोलण्याबद्दल शरीफ असो, किंवा असीम मुनीर त्यांना ट्रन्प यांच्या आधील नोबेल पुरस्कार मिळाला पाहिजे, असे म्हणत वेद यांनी पाकिस्तानची खिल्ली उडवली.
याच वेळी वैद यांनी संयुक्त राष्ट्रातील शाहबाज शरीफ यांच्या भाषावरही तीव्र टीका केली. त्यांनी म्हटले की, हे अत्यंत हास्यास्पद नाटक आहे. पाकिस्तानचे अधिकारी आपली अपयशी धोरणे लपवण्यासाठी भारतविरोधी खोटे प्रचार करत आहे.
जम्मू-काश्मीरचे माजी पोलिस महासंचालक एस.पी. वैद यांना पाकिस्तानवर काय टीका केली?
एस. पी. वैद यांनी पाकिस्तानला खोटे बोलणार देश म्हटले. त्यांनी म्हटले की पाकिस्तानचे अधिकारी आपली अपयशी धोरणे लपवण्यासाठी सतत खोटे बोलत आहे. यामुळे शरीफ आणि मुनीर यांना ट्रम्पच्या आधी नोबेल पुरस्कार दिला पाहिजे, अशी टीका केली.
पाकिस्तानवर एस. पी. वैद यांनी काय आरोप केले?
एस. पी. वैद यांनी पाकिस्तान त्यांच्याच लोकांवर हल्ले करत असल्याचा आणि भारतविरोधी खोटा प्रचार करत असल्याचा आरोप केला.






