'दहशतवादाचा गौरव थांबवा' ; UN मध्ये पाकिस्तान पंतप्रधानांच्या 'ढोंगीपणा'वर दिले प्रत्युत्तर (फोटो सौजन्य: सोशल मीडिया)
India slams Pakistan PM in UN : नवी दिल्ली : न्यूयॉर्कमध्ये संयुक्त राष्ट्र महासभेचे ८० वे अधिवेशन सुरु आहे. दरम्यान या महासभेत पाकिस्तान (Pakistan) पंतप्रधान शाहबाज शरीफ (Shahbaz Sharif) यांनी भारत विरोधी विधाने केले. त्यांनी काश्मीरचा मुद्दा उपस्थित केला. दरम्यान यावर भारताने तीव्र प्रतिक्रिया दिली आहे. भारताने शहाबाज यांच्या वक्तव्याला खोटेपणा म्हटले आहे.
भारताच्या प्रतिनिधी पेटल गहलोत यांनी पाकिस्तानच्या अजेंडाचा खुलासा केला आहे. त्यांनी सांगितले की, पाकिस्तान
केवळ दहशतवला आश्रय देण्याच आणि शेजापी देशांमध्ये अस्थिरता पसरवण्याचा प्रयत्न करत आहे.
भारताच्या प्रतिनिधी पुढे काय म्हणाल्या?
गहलोत यांनी महासभेत सांगितले की, पाकिस्तान गेल्या अनेक काळापासून दहशतवादाला आश्रय देत आहे. त्यांनी उहादरण देत सांगितले की, ओसामा बिन लादेन (Osama bin Laden) सारख्या आंतरराष्ट्रीय दहशतवाद्याला अनेक काळ लपवलून ठेवण्यात पाकिस्तानचा हात होता. पण पाकिस्तान दहशतवादाला विरोध करत असल्याचे नाटक करत आहे.
गहलोत यांनी हे निदर्शनास आणून दिले की, भारताच्या जम्मू-काश्मीर येथील पहलगाम हल्ल्यात (Pahalgam Attack) पाकिस्तानच्या द रेजिस्टन्स फ्रंट या पाकिस्तानी दहशतवादी संघटनेचा हा होता. या संघटनेला पाकिस्तानची साथ मिळाली होती.
शाहबाज शरीफ यांनी संयुक्तर राष्ट्रातील भाषणात भारतावर गंभीर आरोप केले होते. त्यांनी भारतावर काश्मीरमध्ये अत्याचार केल्याच आरोप केला. तसेच १९६० च्या सिंधू जल कराराला (Indus Water Treaty) भारताने निलंबित करुन कायद्याचे उल्लंघन केल्याचे म्हटले.
तसेच भारत पाकिस्तान संघर्षात त्यांचा विजय झाला असल्याचे आणि पाकिस्तानने ७ विमाने हाणून पाडल्याचा दावा शाहबाज यांनी केला. यावर उत्तर देत भारताने स्पष्ट केले सिंधु जल करार पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतरच स्थगित करण्यात आला. या हल्ल्यात २६ निरापराध लोकांना बळी गेला होता.
भारताने पाकिस्तान ढोंगीपणावर कठोर भाष्य केले. गलहोत यांनी म्हटले की, पाकिस्तान एकीकडे शांततेची भाषा करत आहे, तर दुसरीकडे त्यांच्या लष्करी आणि राजकीय नेत्यांकडून दहशतवाद्यांचा गौरव केला जात आहे. त्यांनी ऑपरेशन सिंदूर मध्ये ठार झालेल्या दहशतवाद्यांना श्रद्धांजली अपर्ण केल्याचे निदर्शनास आणून दिले.
भारताने म्हटले की, पाकिस्तानला खरेच शांतता हवी असेल तर दहशतवादी तळ तात्काळ बंद करावीत. भारताला वॉरंट असलेल्या दहशतवाद्यांना सुपूर्द करावे. भारताने पुन्हा एकदा दहशतवादावर शून्य सहनशीलतेचे धोरण स्पष्ट केले आणि कोणत्याही अणु धमकीला बळी पडणार नाही हेही स्पष्ट केले.
FAQs(संबंधित प्रश्न)
पाकिस्तानने UN मध्ये भारतावर काय आरोप केला?
पाकिस्तानचे पंतप्रधान शाहबाज शरीफ यांनी संयुक्त राष्ट्रात काश्मीरचा उल्लेख करत भारतावर अत्याचाराचा आरोप केला. तसेच सिंधू जल करावरुन आंतरराष्ट्रीय कायद्याचे उल्लंघन केल्याचा आरोप केला.
भारताने पाकिस्तानच्या आरोपांवर काय प्रतिक्रिया दिली?
भारताने पाकिस्तानच्या वक्तव्याला ढोंगीपणा म्हटले. तसेच स्पष्ट केले की, पाकिस्तान चा अजेंडा दहशतवादाचा प्रचार करणे आहे. आंतरराष्ट्रीय दहशतवादी ओसामाबिन लादेनचा उल्लेख करत पाकिस्तानने त्याला लपवून ठेवले होते असे स्पष्ट करण्यात आले.
भारताने पाकिस्तानकडे शांततेसाठी कोणती अट घातली?
भारताने म्हटले की, पाकिस्तानला शांतता हवी असेल तर दहशतवादी तळ तात्काळ बंद करावीत. भारताला वॉरंट असलेल्या दहशतवाद्यांना सुपूर्द करावे.