Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • बुध, 30 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ind vs WI |
  • asian games 2026 |
  • entertainment |
  • bigg boss 20 |
  • crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

France Heatwave : फ्रान्समध्ये विक्रमी तापमानाचा कहर! हीटवेव्हमुळे हजारो नागरिकांचा बळी, जेष्ठ नागरिकांना सर्वाधिक फटका

France Heatwave Update : सध्या संपूर्ण युरोप होरपळून निघत आहे. वाढत्या तापमानामुळे परिस्थिती गंभीर झाली असून फ्रान्समध्ये हजारो लोकांचा बळी गेला आहे. याचा सर्वाधिक फटका वृद्धांना बसला आहे. या हीटवेव्हमुळे मृतांचा आकडा वाढण्याची शक्यता आहे.

  • By स्वराली शहा
Updated On: Jun 28, 2026 | 03:56 PM
France Heatwave

France Heatwave

Follow Us
Follow Us:
  • फ्रान्समध्ये उष्णतेचा कहर
  • हीटवेव्हमुळे हजारहून अधिक लोकांचा मृत्यू
  • जेष्ठ नागरिकांना सर्वाधिक फटका
France Heatwave news in Marathi :पॅरिस : फ्रान्समध्ये जून महिन्यांत विक्रमी उष्णतेच्या लाटेने हजारो लोकांचा बळी घेतला आहे. फ्रान्सच्या सार्वजनिक आरोग्य संस्थेने दिलेल्या माहितीनुसार,  २४ जूननंतर तपमानात प्रचंड वाढ झाली होती. यामुळे १,००० हून अधिक लोकांचा मृत्यू झाल्याचे सांगितले जात आहे. याचा सर्वाधिक फटका वृद्धांना बसला आहे. संस्थेने दिलेल्या माहितीनुसार, ८५ टक्क्यांहून अधिक मृत्यू ६५ वर्षावरील नागरिकांचे आहेत. यामुळे फ्रान्समध्ये वाढत्या उष्णतेच्या धोका पुन्हा चिंतेचे कारण बनत आहे.

बाप रे! पॅरिसच्या Eiffel Tower वर वीजेचा कडकडाट; थरारक दृश्य कॅमेरात कैद, VIDEO VIRAL

जेष्ठ नागरिकांना सर्वाधिक फटका

मीडिया रिपोर्टनुसार, फ्रान्सच्या अनेक भागांमध्ये तापमान ४० ते ४५ अंश सेल्सियसपर्यंत पोहोचले आहे. राजधानी पॅरिससह इल-द-फ्रान्स, नुव्हेल-अकितेन, ब्रेटनी, नॉर्मंडी आणि इतर काही भागांमध्ये रेड अलर्ट जारी करण्यात आला आहे. रुग्णालयांपेक्षा घरामध्ये लोकांचा मृत्यू होत आहे. यामध्ये एकटे राहणारे वृद्ध आणि दाट लोकवस्तीमधील नागरिकांचा सर्वाधिक समावेश आहे. फ्रेंच आरोग्य अधिकाऱ्यांनी हे आकडे प्राथमिक असल्याचे स्पष्ट केले आहे. सध्या वृद्धाश्रम आणि इतर संस्थांमधील माहिती आल्यावर मृतांचा आकडा स्पष्ट होईल असे अधिकाऱ्यांनी सांगितले.

इतिहासाची पुनरावृत्ती

२००३ मध्ये फ्रान्समध्ये भीषण उष्णतेची लाट आली होती. अशाच लाटीची पुनरावृत्ती होण्याची भीती व्यक्त केली जात आहे. २००३ साली या उष्णतेने जवळपास १५ हजार नागरिकांचा मृत्यू झाला होता. यामुळे यावेळी वृद्धाश्रम, नागरि वस्त्या, बेघर नागरिकांवर विशेष लक्ष ठेवले जात आहे. नागरिकांना दुपारच्या वेळी घराबाहेर न पडण्याचे आदेश फ्रेंच सरकारने दिले आहेत.

या युरोपीय देशांमध्येही उष्णतेचा कहर

केवळ फ्रान्सच नव्हे, तर संपूर्ण युरोप उष्णतेच्या विळख्यात आहे. स्वित्झर्लंड, जर्मनी, इटली, स्पेन, डेन्मार्क, झेक प्रजासत्ताक आणि ब्रिटनमध्येही उष्णतेने विक्रम मोडला आहे. जर्मनीच्या उष्णतेमुळे महामार्गांचे नुकसान झाले आहे. अनेक ठिकाणी रेल्वे वाहतूक विस्कळीत झाले आहे. इटलीच्या रोम आणि व्हेनिससारख्या शहरांमध्येही रेड अलर्ट जारी करण्यात आला आहे. स्पेनमध्येही हीटवेवमुळे मृत्यूंची नोंद वाढू शकते. यामुळे रुग्णालयांमध्ये ताण निर्माण झाला आहे.

हवामान तज्ज्ञांनी दिलेल्या माहितीनुसार, युरोमध्ये तीव्र आणि दीर्घकालीन उष्णतेच्या लाटा हवामान बदलामुळे अधिक तीव्र होतात. यामुळे वृद्ध, लहान मुले आणि दीर्घकालीन आजार असलेल्या नागरिकांवर याचा परिणाम होतो. यामुळे आसपासच्या जंगलातही आग लागण्याची शक्यता अधिक असते.

Venezuela Earthquake : मलब्यात अडकले जीव, सरकारी अधिकारी मात्र सेल्फी काढण्यात मग्न? धक्कादायक दाव्यामुळे खळबळ

Web Title: France heatwave thousands dead record breaking temperatures

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jun 28, 2026 | 03:54 PM

Topics:  

  • France
  • heatwave
  • World news

संबंधित बातम्या

World News : स्वीडनने माफी मागावी ;सामी लोकांवरील अन्यायाची कबुली
1

World News : स्वीडनने माफी मागावी ;सामी लोकांवरील अन्यायाची कबुली

Airplane Fight :हवेत चाकू हल्ला ;विमान इस्रायलचे ,पायलेट रशिया ,युक्रेनचे मग हल्ला तर होणारच
2

Airplane Fight :हवेत चाकू हल्ला ;विमान इस्रायलचे ,पायलेट रशिया ,युक्रेनचे मग हल्ला तर होणारच

Bikini Atoll: जिथे अमेरिकेने केल्या होत्या 23 अणुचाचण्या तिथे उगवली जीवसृष्टीची नवी पहाट; सागरी जीवशास्त्रज्ञांच्या शोधाने जग थक्क
3

Bikini Atoll: जिथे अमेरिकेने केल्या होत्या 23 अणुचाचण्या तिथे उगवली जीवसृष्टीची नवी पहाट; सागरी जीवशास्त्रज्ञांच्या शोधाने जग थक्क

Sheikh Hasina: बांगलादेशच्या राजकारणात पुन्हा खळबळ; माजी पंतप्रधान शेख हसीना म्हणाल्या, ‘मी मायदेशी परतण्यास तयार’
4

Sheikh Hasina: बांगलादेशच्या राजकारणात पुन्हा खळबळ; माजी पंतप्रधान शेख हसीना म्हणाल्या, ‘मी मायदेशी परतण्यास तयार’

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.