Venezuela Earthquake : मलब्यात अडकले जीव, सरकारी अधिकारी मात्र सेल्फी काढण्यात मग्न? धक्कादायक दाव्यामुळे खळबळ (फोटो सौजन्य: सोशल मीडिया)
Venezuela Earthquake : व्हेनेझुएला भूकंपाचा भारताला फटका? तेलपुरवठ्यावर संकटाचे ढग
भूकंपानंतर पहिल्या ७२ तासांत बचाव कार्य वेगाने झाले पाहिजे. परंतु यानंतरही अनेक लोक ढिगाऱ्याखाली अडकून असून त्यांच्यापर्यंत मदत पोहोचणे कठीण जात आहे. बचाव साम्रगी आणि यंत्रणा अपुऱ्या पडत आहेत. यामुळे अनेकांचा जव धोक्यात असून मृतांचा आकडा वाढण्याची भीती व्यक्त केली जात आहे. सध्या जिवंत व्यक्तींना बाहेर काढण्याऐवजी मृतदेह बाहेर काढले जात आहेत. उष्ण हवामानामुळे मृतदेह सडत असून सर्वत दुर्गंधी पसरली आहे.
मात्र, या गंभीर परिस्थितीदरम्यान सरकारी यंत्रणा अधिकारी मृदेहांसोबत सेल्फी काढत असल्याचा दावा केला जात आहे. यामुळे नागरिकांमध्ये नाराजीचे वातावरण आहे. सोशल मीडियावर केला जात असलेल्या दाव्यानुसार, आपत्तीग्रस्त भागांच्या पाहणीसाठी आलेले अधिकारी उद्ध्वस्त इमारतींसमोर उभे राहून फोटो आणि व्हिडिओ काढत आहेत. या प्रकारमुळे व्हेनेझुएलाच्या नागरिकांनी तीव्र संताप व्यक्त केला आहे.
अनेक नागरिकांनी सरकारच्या मदतकार्यावर नाराजी व्यक्त केली आहे. एका स्थानिक रहिवाशाने म्हटले की, ढिगाऱ्याखाली लोक जिवंत असल्याचे आवाज येत होते, परंतु त्यांना वाचवण्यासाठी सरकार वेळेत पोहोचले नसल्याचा आरोप केला. तर दुसऱ्या एका महिला नागरिकांने आपल्या मुलगी आणि जावयाचा मृतदेह स्वत: बाहेर काढावे लागल्याची व्यथा मांडली.
दरम्यान अमेरिका, भारत, ब्राझील यांसाह २१ देशांनी व्हेनेझुएलाला आर्थिक, वैद्यकीय, बचाव आणि शोध पथके पाठवली आहे. संयुक्त राष्ट्रांनी दिलेल्या माहितीनुसार, या भूकंपाचा फटका ६७ लाख व्हेनेझुएला नागरिकांना बसला आहे. परंतु बचाव कार्य मंद गतीने होत असल्याने नागरिकांमध्ये संतापाची लाट उसळत आहे.






