Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • West Bengal Election Result 2026 |
  • IPL 2026 |
  • Marathi News |
  • West Bengal Election Result 2026 |
  • US-Israel Iran War
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

युद्ध नको, संवाद हवा! G-7 देशांचे भारत-पाकिस्तानला तणाव कमी करण्याचे आवाहन; पहलगाम हल्ल्याचा निषेध

India-Pakistan War Live: भारत आणि पाकिस्तानमधील वाढत्या तणावाच्या पार्श्वभूमीवर G-7 देशाचे वक्तव्य समोर आले आहे. G-7 देशांनी भारत आणि पाकिस्तानला संयम बाळगण्याचे आवाहन केले आहे.

  • By स्वराली शहा
Updated On: May 10, 2025 | 12:42 PM
G7 nations call for ‘immediate de-escalation’ in India-Pakistan conflict

G7 nations call for ‘immediate de-escalation’ in India-Pakistan conflict

Follow Us
Close
Follow Us:

नवी दिल्ली: भारत आणि पाकिस्तानमध्ये पहलगाम हल्ल्यानंतर संघर्ष अधिक वाढला आहे. भारताने पाकिस्तान आणि पाकव्याप्त काश्मीरमधील दहशतवाद्यांच्या नऊ ठिकाणांना उद्ध्वस्त केले. त्यानंतर पाकिस्तानची भंबेरी उडाली होती. एवढे होऊनही पाकिस्तानची गुर्मी उतरलेली नाही. पाकिस्तानच्या सीमा नियंत्रण रेषेवर कुरापती सुरुच आहेत. पाकिस्तानने भारताच्या 26 शहरांना लक्ष्य करते ड्रोन हल्ले केले आहेत. परंतु भारताने पाकिस्तानचे हे हल्ले धूडकाऊन लावले आहेत. पाकिस्तानच्या एअरबेसवरही हल्ला चढवला आहे.

G-7 देशांचे भारत आणि पाकिस्तानला तणाव कमी करण्याचे आवाहन

भारत आणि पाकिस्तानमधील वाढत्या तणावाच्या पार्श्वभूमीवर G-7 देशाचे वक्तव्य समोर आले आहे. G-7 देशांनी भारत आणि पाकिस्तानला संयम बाळगण्याचे आवाहन केले आहे. तसेच शांततेच्या मार्गाने संवाद करुन लष्करी संघर्ष कमी करण्याचे आवाहन केले आहे. दोन्ही अणुशक्ती देशातील वाढत्या तणावाच्या पार्श्वभूमीवर G-7 देशांनी निवेदन जारी केले आहे. G-7 मध्ये कॅनडा, फ्रान्स, इटली, जर्मनी, जपान, ब्रिटन, अमेरिका आणि युरोपीय संघाचा समावेश होतो.

पहलगाम हल्ल्याचा G-7 देशांकडून निषेध

जम्मू आणि काश्मीरच्या पहलगाम येथे 22 एप्रिल 2025 रोजी पर्टकांवर दहशतवादी हल्ला झाला. या हल्ल्यात 28 निरापराध नागरिकांचा बळी गेला. दरम्यान G-7 देशांनी जारी केलेल्या निवेदनात म्हटले आहे की, सर्व G-7 देशांचे परराष्ट्र मंत्री आणि युरोपीय संघाचे वरिष्ठ प्रतिनिधी पहलगाम हल्ल्याचा निषेध करतात. आम्ही दोन्ही देशातील परिस्थितीवर लक्ष ठेवून आहोत. भारत आणि पाकिस्तानने शांततेने संवाद साधावा आणि लष्करी तणाव कमी करण्याचा प्रयत्न करावा, ज्यामुळे प्रादेशिक स्थिरतेला धोका निर्माण होणार नाही.

जागतिक घडामोडी संबंधित बातम्या- Fact Check : भारताच्या S-400 डिफेन्स सिस्टिमचं नुकसान केल्याचा पाकिस्तानचा दावा; भारतीय सेनेने केली पोलखोल! काय आहे सत्य?

नागरिकांच्या सुरक्षेबद्दल चिंता व्यक्त

तसेच G-7 च्या देशांनी भारत आणि पाकिस्तानमधील वाढता लष्करी तणाव कमी करण्याचा आवाहन केले आहे. तसेच नागरिकांच्या सुरक्षेबद्दल चिंताही व्यक्त केली आहे. यामुळे आम्ही शांततेच्या मार्गाने तोडगा काढण्याचे दोन्ही देशांना आवाहन करतो. तसेच G-7 च्या देशांना पाकिस्तानला थेट संवाद साधण्याचे आवाहन केले आहे.

पाकिस्तानी सैन्याचा सीमावर्ती भागांत हल्ला

भारतीय लष्कराने पत्रकार परिषदेत दिलेल्या माहितीनुसार, पाकिस्तान पश्चिम आघाडीवर आक्रमक कारवाया करत आहे. यामध्ये लढाऊ विमाने आणि ड्रोनचा वापर केला जात आहे. तसेच पाकिस्तानने नियत्रंण रेषेवर (LoC) जोरदार हल्ले केले आहेत. श्रीनगरपासून ते नालियापर्यंत 26 ठिकांणांवर हल्ले करण्यात आला आहे. यामध्ये बारामुल्ला, श्रीनगर, अवंतीपोरा, नगरोटा, जम्मू, फिरोजपूर, पठाकोणट, फाजिल्का, लालगड, जट्टा, जैसलमेर, बारमेर, भुज्ज, कुआरबेट आणि लाखी नाला या भागांमध्ये पाकिस्तानी ड्रोन दिसून आले.

जागतिक घडामोडी संबंधित बातम्या- आधीच तणाव अन् आता भूकंपाच्या धक्क्यांनी पुन्हा हादरला पाकिस्तान; लोकं झोपेत असतानाच…

Web Title: G7 nations call for immediate de escalation in india pakistan conflict

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: May 10, 2025 | 12:42 PM

Topics:  

  • Operation Sindoor
  • Pahalgam Terror Attack
  • World news

संबंधित बातम्या

Missile Technology : चीनच्या हाती लागला ‘विनाशकारी’ खजिना; जमिनीखालून निघाले क्षेपणास्त्र बनवणारे 17 गूढ दुर्मिळ धातू
1

Missile Technology : चीनच्या हाती लागला ‘विनाशकारी’ खजिना; जमिनीखालून निघाले क्षेपणास्त्र बनवणारे 17 गूढ दुर्मिळ धातू

Russia Ukraine युद्धाचा भडका! मॉस्कोवर युक्रेनचा भीषण ड्रोन हल्ला; एका भारतीय नागरिकाचा मृत्यू
2

Russia Ukraine युद्धाचा भडका! मॉस्कोवर युक्रेनचा भीषण ड्रोन हल्ला; एका भारतीय नागरिकाचा मृत्यू

China Earthquake : चीनमध्ये लोक गाढ झोपेत असतानाच भूकंपाचा महाभयंकर प्रहार; हाँगकाँगही हादरले, युद्धपातळीवर बचावकार्य सुरू
3

China Earthquake : चीनमध्ये लोक गाढ झोपेत असतानाच भूकंपाचा महाभयंकर प्रहार; हाँगकाँगही हादरले, युद्धपातळीवर बचावकार्य सुरू

US Iran Conflict : जगाच्या नकाशावरुन गायब होणार इराण? ट्रम्प यांच्या ‘त्या’ पोस्टने हादरलं जग; आखातात युद्धाचे ढग गडद
4

US Iran Conflict : जगाच्या नकाशावरुन गायब होणार इराण? ट्रम्प यांच्या ‘त्या’ पोस्टने हादरलं जग; आखातात युद्धाचे ढग गडद

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.