Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • सोम, 6 जुलै 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Fifa World Cup |
  • Lifestyles |
  • ICC Women's T20 World Cup |
  • ind vs ire |
  • political news
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

GauravSrivastava: CIA एजंट सांगून थेट राष्ट्राध्यक्षांनाच गंडवले; भारतीय वंशाच्या व्यक्तीचा इंडोनेशियात अब्जावधींचा संरक्षण घोटाळा

इंडोनेशियातील एका भारतीय वंशाच्या व्यावसायिकाने सीआयए एजंट असल्याचे भासवून विद्यमान राष्ट्राध्यक्ष प्रबोवो सुबियांतो यांची फसवणूक केली. या व्यावसायिकाचे नाव गौरव श्रीवास्तव आहे.

  • By हर्षदा पाटोळे
Updated On: Jul 06, 2026 | 07:10 PM
gaurav srivastava fake cia agent scam indonesia president prabowo subianto defense deals occrp tempo

gaurav srivastava fake cia agent scam indonesia president prabowo subianto defense deals occrp tempo

Follow Us
Follow Us:
  • महाठगाचा आंतरराष्ट्रीय कारनामा
  • अब्जावधी डॉलर्सचे संरक्षण करार
  • ‘मिस्टर जी’ टोपणनाव आणि जवळचे संबंध

Gaurav Srivastava CIA agent fraud Indonesia : आंतरराष्ट्रीय गुप्तचर यंत्रणा, राजकारण आणि अब्जावधी डॉलर्सच्या संरक्षण करारांभोवती फिरणारी एक अशी थरारक कथा समोर आली आहे, ज्याने हॉलिवूडच्या चित्रपटालाही मागे टाकले आहे. इंडोनेशियामध्ये (Indonesia) एका भारतीय वंशाच्या व्यावसायिकाने अमेरिकेची सर्वात बलाढ्य गुप्तचर संस्था ‘सीआयए’ (CIA – Central Intelligence Agency) चा गुप्तहेर असल्याचे भासवून थेट देशाचे विद्यमान राष्ट्राध्यक्ष प्रबोवो सुबियांतो (Prabowo Subianto) आणि संपूर्ण इंडोनेशियन सरकारला कोट्यवधी रुपयांचा गंडा घातल्याचा आरोप झाला आहे. या हायप्रोफाइल महाठगाचे नाव गौरव श्रीवास्तव (Gaurav Srivastava) असून, त्याने आपल्या खोट्या ओळखीच्या जोरावर इंडोनेशियाच्या लष्करासाठी अत्याधुनिक शस्त्रे आणि लढाऊ विमाने पुरवण्याचे अब्जावधी डॉलर्सचे कंत्राट मिळवले होते.

‘ऑर्गनाइज्ड क्राइम अँड करप्शन रिपोर्टिंग प्रोजेक्ट’ (OCCRP) आणि इंडोनेशियातील नामांकित प्रकाशन ‘टेम्पो’ (Tempo) यांनी संयुक्तपणे केलेल्या एका मोठ्या शोधपत्रकारितेच्या तपासातून हा आंतरराष्ट्रीय घोटाळा जगासमोर आला आहे. मूळचा उत्तर प्रदेशातील लखनऊचा असलेला आणि सध्या अमेरिकेत स्थायिक असलेल्या गौरव श्रीवास्तवने इंडोनेशियातील वरिष्ठ सरकारी अधिकारी आणि बड्या उद्योगपतींसमोर आपण सीआयएचे अत्यंत उच्चपदस्थ अधिकारी असल्याचे भासवले होते. हा प्रभाव इतका मजबूत होता की, जेव्हा प्रबोवो सुबियांतो इंडोनेशियाचे संरक्षण मंत्री होते, तेव्हा गौरवने त्यांच्याशी अत्यंत घनिष्ठ संबंध निर्माण केले होते. प्रबोवो त्याला प्रेमाने “मिस्टर जी” (Mr. G) या टोपणनावाने हाक मारत असत.

जागतिक घडामोडी संबंधित बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा : Super Typhoon Bavi: ताशी 333 किमी वेगाने धडकले महाचक्रीवादळ ‘बावी’; अमेरिकेच्या पॅसिफिक भागात मोठ्या विध्वंसाचा इशारा, VIDEO VIRAL

बेडरुमपर्यंत प्रवेश, अंधश्रद्धांचा फायदा आणि ‘बाली’ बॉम्बस्फोटाचा खोटा दावा

‘टेम्पो’ मासिकाने प्रसिद्ध केलेल्या अहवालानुसार, डच तेल व्यापारी नील्स ट्रुस्ट (Niels Troost) यांनी या संपूर्ण प्रकरणाचे अनेक धक्कादायक खुलासे केले आहेत. २०२२ च्या सुमारास नील्स हे स्वतः गौरव श्रीवास्तवसोबत पश्चिम जावामधील हंबलंग येथील गरुडा यक्ष एस्टेटमधील प्रबोवो सुबियांतो यांच्या खाजगी निवासस्थानी गेले होते. गौरव हा प्रबोवो यांच्या घरात केवळ वारंवार जातच नव्हता, तर तिथे अनेक दिवस मुक्काम ठोकून राहायचा.

प्रबोवो यांच्यावर आपली पकड मजबूत करण्यासाठी गौरवने त्यांच्या अत्यंत खाजगी सवयी आणि अंधश्रद्धांचाही अभ्यास केला होता. प्रबोवो यांचा असा विश्वास होता की घरातील कोळ्याची जाळी (Spider Webs) कधीही काढू नयेत, कारण ती निसर्गाचाच एक भाग आहेत. गौरवने घरामध्ये प्रवेश करण्यापूर्वीच बाहेरील लोकांना प्रबोवो यांच्या या सवयी सांगून आपल्या घनिष्ठतेचा आव आणला होता. इतकेच नव्हे तर, २००२ मध्ये इंडोनेशियात झालेल्या भीषण ‘बाली बॉम्बस्फोटां’च्या मास्टरमाईंडला पकडण्यात आपण सीआयए एजंट म्हणून अमेरिकेला मदत केली होती, असा धादांत खोटा दावाही त्याने केला होता. मानवी हक्कांच्या उल्लंघनाच्या आरोपावरून अमेरिकेने प्रबोवो सुबियांतो यांच्यावर २० वर्षे व्हिसा बंदी (Blacklist) घातली होती, ती बंदी आपल्या सीआयएच्या प्रभावामुळेच उठली, असे सांगून गौरवने प्रबोवो यांचा संपूर्ण विश्वास संपादन केला होता.

Gaurav Srivastava “menyusup” ke keluarga Prabowo Subianto dan elite di Indonesia untuk mendapatkan kontrak pertahanan. Pura-pura menjadi agen Central Intelligence Agency (CIA).#TempoPlus pic.twitter.com/KxdixeuMeu — tempo.co (@tempodotco) June 30, 2026

credit – social media and Twitter

कागदावरच्या शेल कंपन्या आणि लढाऊ विमानांचे बनावट करार

OCCRP च्या तपासानुसार, २०२० ते २०२२ दरम्यान गौरव श्रीवास्तवच्या नियंत्रणाखालील काही कंपन्यांनी इंडोनेशियाच्या संरक्षण मंत्रालयाकडून आणि एका सरकारी मालकीच्या संरक्षण कंपनीकडून तब्बल ५ प्राथमिक कंत्राटे (Letters of Intent & MoU) मिळवली होती. या करारांमध्ये ३६ अत्याधुनिक एफ-१५ (F-15) लढाऊ विमाने, यूएच-६० ब्लॅक हॉक (Black Hawk) हेलिकॉप्टर्स, सी-१३० (C-130) लष्करी वाहतूक विमाने आणि इंडोनेशियाच्या संरक्षण मंत्रालयासाठी एक मध्यवर्ती संयुक्त संचालन कमांड आणि नियंत्रण केंद्र (Command & Control Centre) उभारण्याचा समावेश होता.

या करारांच्या स्वाक्षरी समारंभाचे फोटो आणि व्हिडिओ देखील समोर आले आहेत, ज्यामध्ये गौरव श्रीवास्तव हा थेट संरक्षण मंत्री प्रबोवो यांच्या शेजारी बसून अधिकृत करारांवर सह्या करताना दिसत आहे. मात्र, नंतर जेव्हा अमेरिकन आणि इंडोनेशियन सुरक्षा यंत्रणांनी तपास केला, तेव्हा उघड झाले की गौरवच्या ज्या चार कंपन्यांना हे अब्जावधींचे कंत्राट मिळाले होते, त्या प्रत्यक्षात केवळ कागदावर अस्तित्वात असलेल्या ‘शेल कंपन्या’ (Shell Companies) होत्या. त्यांना संरक्षण क्षेत्रातील खरेदीचा कोणताही पूर्वअनुभव नव्हता आणि नंतर कर न भरल्यामुळे त्या कंपन्यांची नोंदणीही रद्द करण्यात आली होती. सुदैवाने, इंडोनेशिया सरकारने या प्रस्तावित खरेदीसाठी पुढील आर्थिक व्यवहार केले नाहीत, ज्यामुळे देशाचे अब्जावधी डॉलर्सचे नुकसान टळले.

जागतिक घडामोडी संबंधित बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा : Prambanan: सर्वात मोठ्या मुस्लिम देशात हिंदू देवांचे भव्य धाम; 1000 वर्षे जुन्या ऐतिहासिक मंदिराचा भारत करणार जीर्णोद्धार

५१ दशलक्ष डॉलर्सचे कर्ज आणि लॉस एंजेलिसमधील आलिशान महाल

गौरव श्रीवास्तवच्या फसवणुकीची साखळी केवळ सरकारपर्यंत मर्यादित नव्हती. त्याने प्रबोवो यांचे सख्खे लहान भाऊ आणि ‘आर्सारी ग्रुप’चे अध्यक्ष हाशिम जोजोहाडिकुसुमो यांच्याशीही व्यावसायिक संबंध जोडले होते. गौरवचा माजी व्यावसायिक भागीदार नील्स ट्रुस्ट याने न्यायालयात दाखल केलेल्या दाव्यानुसार, गौरव खरोखरच सीआयएचा एजंट आहे या विश्वासाने ट्रुस्टने आपल्या कंपनीतील ५०% शेअर्स गौरवच्या नावावर केले होते.

त्यानंतर गौरवने अमेरिकन सरकारच्या एका ‘गुप्त मोहिमेसाठी’ (Covert Operation) निधीची गरज असल्याचे सांगून त्यांच्या संयुक्त कंपनीमधून आर्सारी ग्रुपला ५१ दशलक्ष डॉलर्सचे (सुमारे ४२५ कोटी रुपये) कर्ज मंजूर करून दिले. धक्कादायक बाब म्हणजे, या कर्जातील निम्मा निधी (सुमारे २५ दशलक्ष डॉलर्स) गौरवने स्वतःच्या खात्यावर वळवून घेतला आणि अमेरिकेतील लॉस एंजेलिस (Los Angeles) येथे स्वतःसाठी एक अत्यंत आलिशान महाल (Mansion) खरेदी केला. सध्या अमेरिकेच्या आणि इंडोनेशियाच्या न्यायालयात गौरव श्रीवास्तवविरुद्ध फसवणूक, खंडणी आणि खोट्या ओळखीचा वापर केल्याबद्दल अनेक दिवाणी आणि फौजदारी खटले दाखल करण्यात आले आहेत.

Web Title: Gaurav srivastava fake cia agent scam indonesia president prabowo subianto defense deals occrp tempo

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jul 06, 2026 | 07:10 PM

Topics:  

  • America
  • Indian
  • Indonesia
  • intelligence agency

संबंधित बातम्या

PM Modi Indonesia visit : प्रथेचे उल्लंघन करत राष्ट्रपती विमानतळावर धावले; पंतप्रधान मोदींचे इंडोनेशियात भव्य स्वागत
1

PM Modi Indonesia visit : प्रथेचे उल्लंघन करत राष्ट्रपती विमानतळावर धावले; पंतप्रधान मोदींचे इंडोनेशियात भव्य स्वागत

Super Typhoon Bavi: ताशी 333 किमी वेगाने धडकले महाचक्रीवादळ ‘बावी’; अमेरिकेच्या पॅसिफिक भागात मोठ्या विध्वंसाचा इशारा, VIDEO VIRAL
2

Super Typhoon Bavi: ताशी 333 किमी वेगाने धडकले महाचक्रीवादळ ‘बावी’; अमेरिकेच्या पॅसिफिक भागात मोठ्या विध्वंसाचा इशारा, VIDEO VIRAL

Prambanan: सर्वात मोठ्या मुस्लिम देशात हिंदू देवांचे भव्य धाम; 1000 वर्षे जुन्या ऐतिहासिक मंदिराचा भारत करणार जीर्णोद्धार
3

Prambanan: सर्वात मोठ्या मुस्लिम देशात हिंदू देवांचे भव्य धाम; 1000 वर्षे जुन्या ऐतिहासिक मंदिराचा भारत करणार जीर्णोद्धार

पुन्हा तोच थरार! अमेरिकन झेंडा घेऊन हवेत उडाला, पण लँडिंगच्या वेळी स्कायडायव्हरचा घात झाला ; VIDEO पाहून उडेल थरकाप
4

पुन्हा तोच थरार! अमेरिकन झेंडा घेऊन हवेत उडाला, पण लँडिंगच्या वेळी स्कायडायव्हरचा घात झाला ; VIDEO पाहून उडेल थरकाप

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.