फोटो सौजन्य सोशल मीडिया
या सगळ्या प्रकारामुळे इटलीमध्ये बालविवाह , धार्मिक शिकवण आणि स्थलांतरितांच्या कायदेशीर जबाबदाऱ्यांवर नव्याने चर्चा सुरु झाली आहे . गेल्याच महिन्यात इटलीमध्ये सार्वजनिक ठिकाणी बुरखा वापरावर बंदी घालण्यात आली आहे . यामुळे इटलीमध्ये मुस्लिम आणि बिगर मुस्लिम यांच्यात वाद निर्माण होण्याचे संकेत मिळत आहेत .
या प्रकरणाची सुरवात २५ जानेवारी २०२६ रोजी प्रसारित झालेल्या Fuori dal Coro या इटालियन दूरचित्रवाणी कार्यक्रमातून झाली . या कार्यक्रमातील पत्रकाराने स्वतःला इस्लाम धर्माबद्दल माहिती घेण्यास इच्छुक विद्यार्थी असल्याचे भासवले होते . त्यानंतर ब्रेशियामधील दोन इस्लामिक केंद्रामध्ये गुप्त कॅमेऱ्याद्वारे चित्रीकरण करण्यात आले .
या वेळी दोघेही चर्चा करत असताना काशीफने मुलगी पहिल्या मासिक पाळीनंतर प्रौढ मनाली जाऊ शकते आणि तिचे लग्न होऊ शकते . अशी भूमिका मांडली नऊ वर्षाच्या मुलीसोबत लग्नाचे समर्थन करणारी त्याची विधाने सगळीकडे प्रसारित झाल्यानंतर इटलीमध्ये खूपच तीव्र प्रतिक्रिया उमटल्या . सगळीकडे चर्चा जोरदार सुरु झाल्या . तेव्हा या प्रकरणाची दखल स्थानिक पोलिसांनी घेतली .
अली काशिफ हा गेल्या सहा वर्षांपासून इटलीमध्ये राहत होता . ब्रेशिया शहरातील दोन इस्लामिक केंद्रामध्ये तो अधूनमधून इमाम म्हणून धार्मिक मार्गदर्शन करत होता . दूरचित्रवाणीवरील स्टिंग ऑपरेशननंतर त्याच्या विधानांची चौकशी सुरु करण्यात आली . ब्रेशियाचे पोलीस प्रमुख पाओलो सार्तोरी यांनी या प्रकरणाची गंभीर दखल घेतली .काशिफच्या वाक्यांचा त्याच्या वैचारिकतेचा सामाजिक सुरक्षितता या दृष्टीने विचार करण्यात आला . त्याच्या घराच्या परवानगीला रद्द करण्यात आले . आणि त्याची हद्दपारीची प्रक्रिया सुरु करण्यात आली .
इटालियन अधिकाऱ्यांनी अली काशिफला ताब्यात घेऊन मिलानमधील मालपेन्सा विमातळावर नेले . तेथून त्याला बँकॉक मार्गे पाकिस्तानची राजधानी इस्लामाबाद येथे जाणाऱ्या विमानात बसवण्यात आले . या कारवाईनंतर त्याला इटलीतून हद्दपार करण्यात आले . या घटनेमुळे बालविवाहाच्या मुद्यावर इटलीमध्ये पुन्हा एकदा चर्चा सुरु झाल्या आहेत . अल्पवयीन मुलांचे संरक्षण आणि देशातील कायद्यांचे पालन या मुद्द्यांवर इटालियन प्रशासनाने कठोर भूमिका घेतल्याचे या कारवाईतून दिसून आले .






