
Greenland controversy
ट्रम्प यांनी आपल्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्म ट्रुथवरुन याची माहिती दिली. ट्रम्प यांनी फ्रान्सह, डेन्मार्क, जर्मनी, यूके, नॉर्वे, स्वीडन, नेदरलँडस आणि फिनलँड या देशांवर टॅरिफ लादला आहे. ट्रम्प यांनी या देशांवर अमेरिकेच्या राष्ट्रीय सुरक्षेला धोका निर्माण केल्याचा आरोप केला आहे. या देशांनी अमेरिकेच्या ग्रीनलँडवर नियंत्रणाला विरोध केला आहे. तसेच ट्रम्प यांनी असाही आरोप केला की, युरोपीय देशांवर आतापर्यंत कोणताही टॅरिफ लावला नव्हता. अमेरिकेने कमी शुल्क आकारुन त्यांनी व्यापारात सवलती दिल्या होत्या. पण आता याची किंमत मोजण्याची वेळ आली असल्याचे ट्रम्प यांनी म्हटले आहे.
ग्रीनलँड (Greenland) हा भौगोलिकदृष्ट्या आणि धोरणात्मकदृष्ट्या अत्यंत महत्वाचा आर्क्टित प्रदेश आहे. ट्रम्प यांच्या मते रशिया आणि चीन यावर ताबा मिळवण्याचा प्रयत्न करत आहे. ट्रम्प यांना या दोन वाढत्या महासत्ता देशांचे प्रभुत्व कमी करायचे आहे, ज्यामुळे त्यांनी ग्रीनलँड अमेरिकेच्या नियंत्रणाखाली असणे महत्त्वाच असल्याचे म्हटले आहे.
ट्रम्पच्या म्हणण्यानुसार, ग्रीनलँड रशिया आणि चीनच्या हाती लागले तर यामुळे जागतिक अशांतता पसरु शकते. यामुळे केवळ अमेरिकाच ग्रीनलँडचे संरक्षण करु शकतो असे ट्रम्प यांनी म्हटले आहे. तसेच हे जागतिक सुरक्षेच्या दृष्टीकोनातून महत्त्वाचे असल्याचे त्यांनी म्हटले आहे. परंतु डेन्मार्कसह काही युरोपीय देशांनी ट्रम्प यांच्या या प्रस्तावाला तीव्र विरोध केला आहे. ग्रीनलँड सध्या केवळ भौगोलिकच नव्हे, तर राजकीयदृष्ट्या देखील महत्त्वाचा आणि व्यापारयुद्धाचा केंद्रबिंदू बनत चालला आहे.
Greenland Controversy : ग्रीनलँडसाठी ट्रम्पची पुन्हा दादागिरी! विरोध करणाऱ्यांवर टॅरिफची तलवार
Ans: ट्रम्प यांनी ग्रीनलँड अमेरिकेच्या नियंत्रणाखाली हवे आहे, परंतु युरोपीय देशांनी याला तीव्र विरोध केला असल्याने ट्रम्प यांनी त्या देशांवर टॅरिफ लादला आहे.
Ans: ट्रम्प यांनी युरोपीय देशांवर १० टक्के टॅरिफ लागू केले आहे. परंतु ग्रीनलँडसोबत करार न झाल्यास ट्रम्प यांनी १ जून २०२६ पासून युरोपीय देशांवर २५ टक्के टॅरिफ लादण्याची घोषणा केली आहे.
Ans: ट्रम्प यांनी ग्रीनलँडवर अमेरिकेच्या नियंत्रणाला विरोध करणाऱ्या युरोपीय देशांवर टॅरिफ लादला आहे. यामध्ये डेन्मार्क, फ्रान्स, जर्मनी, यूके, नॉर्वे, स्वीडन, नेदरलँडस आणि फिनलँड या देशांवर टॅरिफ लादला आहे.
Ans: ग्रीनलँडचे भौगोलिक स्थान आर्क्टिकमध्ये धोरणात्मकदृष्ट्या अधिक महत्त्वाचे आहे. येथे लष्करी उपस्थिती वाढल्यास नाटोची ताकद अधिक मजबूत होईल. तसेच येथून चीन-रशियाच्या हालचालींवर नजर ठेवता येईल. यामुळे ग्रीनलँड अमेरिकेसाठी महत्त्वाचे आहे.