Trump Greenland Strategy : ट्रम्पचा नवा रिअल इस्टेट जुगार! ग्रीनलँड विकत घेण्यासाठी पेरले शेकडो गुप्तहेर, काय आहे नेमका प्लॅन
मीडिया रिपोर्टनुसार, ट्रम्प ग्रीनलँडमझ्ये एक बुलेटप्रुफ आणि अत्याधुनिक असे भव्य दूतावास उभारणार आहेत. सुमारे ३००० चौरस मीटर क्षेत्रफळाची इमारत ग्रीनलँडमध्ये उभी करण्याची योजना ट्रम्प आखत आहे. हे दूतावास बुलेटप्रुफ, बॉम्बहल्ल्यापासून सुरक्षित असेल. यामध्ये अमेरिकन गुप्तचर संस्थांचे अधिकारी आणि एजंट्स तैनात केले जाणार असल्याचा दावा माध्यमांमध्ये केला जात आहे. या एजंट्सच्या मदतीने ट्रम्प स्थानिक लोकांमध्ये मिसळून अमेरिकेबाबत सकारात्मक वातावरण निर्माण करण्याचा प्रयत्न करणार आहेत. तसेच स्थानिक भाषा बोलणाऱ्यांची देखील या दूतावासामध्ये भरती करण्यात येणार आहे.
अहवालांनुसार, ट्रम्प ग्रीनलँडच्या नागरिकांचे मन जिंकण्याचा प्रयत्न करणार आहे. डेन्मार्कपासूनपर्यंत धोरणात्मक, राजकीय, आणि भावनिकदृष्ट्या अमेरिकेशी जुळवून घेण्याचा हेतू ट्रम्प यांनी ठेवला आहे. सध्या ग्रीनलँडची राजधानी नूक येथे अमेरिकेचे एक लहान दूतावास आहे. परंतु नव्या प्लॅननुसार, दूतावास अधिक महत्त्वाच्या आणि मध्यवर्थी भागात उभारण्यात येईल असे अहवालांमध्ये सांगण्यात आले आहे. अधिकाऱ्यांच्या मते, ट्रम्पचा हेतू केवळ ग्रीनलँडवर ताबा मिळवणे आहे. हा त्यांच्या राजनैतिक आणि गुप्तचर कारवायांचाच एक भाग आहे.
‘ट्रम्प यांच्या मते ग्रीनलँडभोवती आर्क्टिक समुद्री भागाजवळ रशिया आणि चीनची उपस्थिती अधिक वाढत आहे. भविष्यात चीन आणि रशिया ग्रीनलँडवर ताबा मिळवण्याची शक्यता आहे. यामुळे अमेरिकेच्या सुरक्षेला धोका निर्माण होऊ शकतो. याला रोखण्यासाठी ग्रीनलँड अमेरिकेच्या नियंत्रणाखाली असणे महत्वाचे असल्याचे ट्रम्प यांनी म्हटले आहे.
Greenland Controversy : ग्रीनलँडसाठी ट्रम्पची पुन्हा दादागिरी! विरोध करणाऱ्यांवर टॅरिफची तलवार
Ans: ग्रीनलँड मिळवण्यासाठी ट्रम्प तेथे बुलेटफ्रुफ अमेरिकन दूतावास खुले करणार आहेत.
Ans: ग्रीनलँडमध्ये दूतावास खुले करुन ट्रम्प अमेरिकेची राजनैतिक आणि गुप्तचर उपस्थिती ग्रीनलँडमध्ये लाढवण्याचा प्रयत्न करत आहेत. याच्या मदतीने ते तेथील लोकांची मने जिंकून ग्रीनलँड विकत घेणार आहेत.






