Greenland Controversy : ग्रीनलँडसाठी ट्रम्पची पुन्हा दादागिरी! विरोध करणाऱ्यांवर टॅरिफची तलवार
ट्रम्प यांनी असा युक्तिवाद केला आहे की, नाटोची लष्करी ताकद अमेरिकेवर अवलंबून आहे. ट्रम्प यांच्या कार्यकाळातच नाटो अधिक शक्तिशाली झाला असून ग्रीनलँड अमेरिकेकडे असल्यास ही ताकद आणखी वाढेल असा दावा ट्रम्प यांनी केला आहे. ट्रम्प यांनी एका परिषेदत राष्ट्रीय सुरक्षेचा हवाला देत ग्रीनलँड अमेरिकेसाठी महत्त्वाचा असल्याचेही म्हटले आहे. त्यांनी ग्रीनलँडवर अमेरिकेच्या नियंत्रणाला विरोध करणाऱ्या देशांवर टॅरिफचा पर्याय असल्याची धमकी दिली आहे.
याशिवाय वॉशिंग्टनमधील व्हाईट हाउसमधून ग्रीनलँडवर लष्करी कारवाईचेही संकेत मिळेल आहे. व्हाइट हाउसच्या मते, ट्रम्प आर्क्टिक प्रदेशात रशिया आणि चीनची वाढती उपस्थिती टाळण्याचा प्रयत्न करत आहे. यासाठी ते अमेरिकेच्या नियंत्रणाखाली असणे महत्त्वाचे असल्याचे ट्रम्प यांचे मत आहे. येथून रशिया आणि चीनच्या लष्करी हालचालींवर सहज लक्ष ठेवता येईल असे त्यांनी म्हटले आहे. यासाठी ट्रम्प यांचे विशेष दूत डेन्मार्कला भेट देण्याची शक्यता आहे.
ट्रम्प यांच्या या धमकीवर युरोपमधून तीव्र प्रतिक्रीय उमटत आहेत. फ्रान्सचे राष्ट्राध्यक्ष इमॅन्युएल मॅक्रॉन यांनी ग्रीनलँडवर हल्ल्याचा विचारचही करु नका असा इशारा दिला आहे. तसेच इतर युरोपीय देशांनी ग्रीनलँडच्या सुरक्षा आणि प्रादेशिक सार्वभौमत्वावर कोणतीही तडजोड केली जाणार नाही असा इशाराही दिला आहे. सध्या ग्रीनलँडवरुन अमेरिका आणि युरोपीय देशांमधील वाद अधिक तीव्र होताना दिसत आहे.
याच पार्श्वभूमीवर डेन्मार्कच्या विनंतीवरुन नाटो देशांनी मोठे पाऊल उचचले आहे. नाटो देशांनी ग्रीनलँडमध्ये आपले सैन्य तैनात केले आहे. यामध्ये सहा देशांचा समावेश आहे. डेन्मार्कच्या विनंतीवरुन स्वीडन, नॉर्वे, जर्मनी, फ्रान्स, नीदरलँड्स, आणि कॅनडाने ग्रीनलँडमध्ये आपले लष्कर पाठवले आहे. नाटो देशांची ही तैनाती डोनाल्ड ट्रम्प यांच्या ग्रीनलँडवरील ताबा घेण्याच्या निर्णयाला थेट आव्हान मानले जात आहे.
Ans: ग्रीनलँडचे भौगोलिक स्थान आर्क्टिकमधझ्ये धोरणात्मकदृष्ट्या अधिक महत्त्वाचे आहे. येथे लष्करी उपस्थिती वाढल्यास नाटोची ताकद अधिक मजबूत होईल. तसेच येथून चीन-रशियाच्या हालचालींवर नजर ठेवता येईल. यामुळे ग्रीनलँड अमेरिकेसाठी महत्त्वाचे आहे.
Ans: ट्रम्प यांनी त्यांच्या ग्रीनलँडवरील नियंत्रण मिळवण्याच्या योजनेला समर्थन न करणाऱ्या देशांनी ट्रम्प यांनी टॅरिफची धमकी दिली आहे.
Ans: ट्रम्प यांच्या टॅरिफ धमकीवर फ्रान्सचे अध्यक्ष इमॅन्युएल मॅक्रॉन यांनी ग्रीनलँडलवर हल्ला न करण्याचा इशारा दिला आहे. तसेच युरोपीय देशांनी डेन्मार्कच्या समर्थनार्थ लष्करी आणि राजकीय पातळीवर भूमिका घेतली आहे.






