इस्रायलच्या हवाई दलाने केलेल्या हवाई हल्ल्यात हमासचा कमांडर इब्राहिम बियारी ठार!

हमासच्या सेंट्रल जबलिया बटालियनचा कमांडर इब्राहिम बियारी याला लढाऊ विमानांनी हल्ला करून ठार केले आहे

    तेल अवीव: पॅलेस्टिनी दहशतवादी संघटना हमास आणि इस्रायल यांच्यात सुरू असलेल्या युद्धाचा आज 25 वा दिवस आहे. गाझामध्ये इस्रायली लष्कराचे जमिनीवरील हल्ले वाढत आहेत. दरम्यान, इस्रायलच्या हवाई दलाने हवाई हल्ल्यात हमास कमांडर इब्राहिम बियारी याचा खात्मा  (Hamas commander Ibrahim Biari) केला आहे. गाझाच्या पश्चिम जबलियामधील हमासच्या लष्करी गडाची कमांड आयडीएफकडे गेली आहे. 

    IDF (इस्रायल डिफेन्स फोर्स) ने म्हटले आहे की गाझामध्ये हल्ला करून हमासच्या कमांड आणि नियंत्रणाचे नुकसान केले आहे. मोठ्या प्रमाणात दहशतवादी मारले गेले आहेत. हमासच्या सेंट्रल जबलिया बटालियनचा कमांडर इब्राहिम बियारी याला लढाऊ विमानांनी हल्ला करून ठार केले आहे. बियारी हा ७ ऑक्टोबरला झालेल्या दहशतवादी हल्ल्याला जबाबदार असलेल्या नेत्यांपैकी एक होता. हवाई हल्ल्यात हमासच्या भूमिगत पायाभूत सुविधा नष्ट झाल्या. IDF ने उत्तर गाझामधील लोकांना त्यांच्या स्वतःच्या सुरक्षिततेसाठी दक्षिणेकडे जाण्याचे आवाहन केले आहे.