Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • मंगळ, 15 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Hawaii Forest: हवाईमध्ये निसर्गाचा अद्भूत चमत्कार; दीड लाख झाडे लावली अन् 20 वर्षांनंतर घनदाट जंगलात परतले अत्यंत दुर्मिळ पक्षी

Hawaii Forest : कोआ हे हवाईमधील एक स्थानिक झाड असून, ते जंगलातील एक प्रमुख प्रजाती मानले जाते. ते नापीक जमिनीत वेगाने वाढते. हवाईच्या जंगलांचे पुनरुज्जीवन करण्यासाठी शास्त्रज्ञांनी दीड लाखांहून अधिक कोआची झाडे लावली आहेत.

  • By हर्षदा पाटोळे
Updated On: Sep 15, 2026 | 01:13 PM
Hakalau Forest National Wildlife Refuge Hawaii Forest Restoration

Hakalau Forest National Wildlife Refuge Hawaii Forest Restoration

Follow Us
Follow Us:
  • १.५ लाख देशी झाडांचे रोपण
  • २० वर्षांनंतर घडला अद्भूत चमत्कार
  • संकटग्रस्त पक्ष्यांचे पुनरागमन

Hawaii Forest Restoration : अमेरिकेच्या हवाई बेटावरील (Hawaii Forest) नैसर्गिक परिसंस्थेसाठी एक अत्यंत दिलासादायक आणि जगभरातील पर्यावरणप्रेमींना प्रेरणा देणारी बातमी समोर आली आहे. विसाव्या शतकाच्या उत्तरार्धात हवाईमधील शेकडो एकर घनदाट जंगल नष्ट होऊन ते एका ओसाड गवताळ प्रदेशात रूपांतरित होत असल्याचे समोर आले होते. हवाईच्या ‘बिग आयलंड’वर असलेल्या हकालौ वन वन्यजीव अभयारण्याची (Hakalau Forest National Wildlife Refuge) जमीन वेगाने नापीक होत चालली होती. वाढत्या मानवी हस्तक्षेपामुळे आणि नैसर्गिक संकटांमुळे हा हिरवागार प्रदेश ओसाड पडत चालला होता, ज्यामुळे तेथील दुर्मीळ पक्षी आणि वन्यजीवांचे अस्तित्व धोक्यात आले होते.

ही गंभीर परिस्थिती ओळखून १९९० च्या दशकात जगभरातील पर्यावरणवादी आणि वैज्ञानिकांनी या जंगलाचे पुनरुज्जीवन करण्याचा एक धाडसी निश्चय केला. १९९२ मध्ये प्रत्यक्ष वृक्षारोपणाच्या मोठ्या मोहिमेला सुरुवात झाली. पुढील पाच वर्षांच्या कालावधीत ‘यूएस फॉरेस्ट सर्व्हिस’ने (US Forest Service) या ओसाड गवताळ जमिनीवर १,५०,६५० देशी ‘कोआ’ (Koa Tree) झाडांची लागवड केली. या महाकाय मोहिमेचा मूळ उद्देश केवळ कागदावर झाडे लावणे हा नव्हता, तर हवाईमध्ये नष्ट होत चाललेल्या अतिशय दुर्मिळ पक्ष्यांसाठी त्यांचे नैसर्गिक अधिवास आणि घरट्यांची सुरक्षित जागा पुन्हा निर्माण करणे हा होता.

जागतिक घडामोडी संबंधित बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा : Saudi Pipeline Shutdown : 90 मिनिटांत खेळ खल्लास! सौदीने केली मुख्य तेल पाइपलाइन बंद; आंतरराष्ट्रीय बाजारात क्रूड 107 डॉलर पार

/┆\ On the road to recovery Yesterday, Hawaiʻi National Guard soldiers worked alongside state park crews to clear fallen trees along Kōkeʻe Road, helping restore access to isolated cabins in Kōkeʻe State Park, following Hurricane Lowell’s widespread impacts. It’s teamwork… pic.twitter.com/mmhaIPnZ60 — Stephen F. Logan (@HawaiiTAG) September 12, 2026

credit – social media and Twitter

‘कोआ’ वृक्षाची निवड आणि त्याचा विशेष गुणधर्म

वृक्षारोपणासाठी ‘कोआ’ झाडाचीच निवड का करण्यात आली, यामागे एक महत्त्वाचे वैज्ञानिक कारण होते. ‘कोआ’ हे हवाईमधील एक स्थानिक (Native) झाड असून, ते तेथील जंगलांमधील एक प्रमुख आणि आधारभूत प्रजाती (Keystone Species) मानले जाते. या झाडाचे मुख्य वैशिष्ट्य म्हणजे ते अत्यंत नापीक, ओसाड आणि खडकाळ जमिनीतही अतिशय वेगाने वाढू शकते. जमिनीतील पोषक तत्त्वे पुनर्निर्मित करण्याची क्षमता या झाडामध्ये असते. त्यामुळेच जंगलाच्या पुनरुज्जीवनासाठी शास्त्रज्ञांनी इतर कोणत्याही परदेशी प्रजातीऐवजी स्थानिक कोआ वृक्षावर पूर्ण विश्वास दाखवला.

वृक्षारोपणांनंतरच्या दोन दशकांनंतर म्हणजेच तब्बल २० वर्षांहून अधिक काळाच्या सततच्या निरीक्षणानंतर संशोधकांच्या हाती जे निष्कर्ष आले, त्याने संपूर्ण वैज्ञानिक जगाला अवाक केले. ज्या गवताळ जमिनीवर कधी एका पक्ष्याचा आवाजही ऐकू येत नव्हता, तेथे आज हजारो पक्ष्यांचे किलबिलाट ऐकायला मिळत आहेत. दोन दशकांत या १.५ लाख झाडांचे रूपांतर एका नयनरम्य, घनदाट आणि समृद्ध जंगलात झाले आहे. ‘हाकालौ प्रकल्प’ हा आज हवाईमध्ये राबवल्या गेलेल्या सर्वात यशस्वी वन पुनर्संचयन उपक्रमांपैकी एक म्हणून जागतिक स्तरावर गणला जात आहे.

जागतिक घडामोडी संबंधित बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा : IPLN : जागतिक राजकारणात भारत आघाडीवर; BRICS नंतर QUADच्या नव्या रणनीतीचा बोलबाला; टोकियोत घेतला ‘हा’ मोठा निर्णय

‘अकियापोलौ’ सारख्या संकटग्रस्त पक्ष्यांची संख्या वाढली

हवाई बेटाचे एक वैशिष्ट्य म्हणजे तेथील स्थानिक पक्षी आणि प्रजाती जगात इतरत्र कुठेही आढळत नाहीत. त्यामुळे येथील जंगल नष्ट होणे म्हणजे या प्रजाती पृथ्वीवरून कायमच्या नामशेष होणे ठरले असते. हकालौ अभ्यासाने हे सिद्ध केले आहे की मानवाने प्रामाणिक प्रयत्न केल्यास निसर्ग पुन्हा बहरू शकतो. जंगलाची पुनर्वाढ झाल्यानंतर सुरुवातीला काही स्थानिक पक्ष्यांनी तातडीने तेथे वस्ती केली, तर इतर लाजाळू प्रजातींना परत येण्यासाठी थोडा अधिक वेळ लागला.

सर्वात उल्लेखनीय बाब म्हणजे, हवाईमधील अत्यंत संकटग्रस्त आणि नामशेष होण्याच्या उंबरठ्यावर असलेला ‘अकियापोलौ’ (Akiapolaau) हा वैशिष्ट्यपूर्ण पक्षी या पुनर्संचयित जंगलात परतल्याचे स्पष्ट निरीक्षण करण्यात आले आहे. अभ्यासादरम्यान या पक्ष्यांची संख्या सातत्याने वाढत असल्याचे दिसून आले आहे. या अभूतपूर्व यशामुळे जगभरातील नष्ट होणाऱ्या जंगलांना वाचवण्यासाठी आणि वन्यजीवांचे अधिवास पुन्हा उभारण्यासाठी एक नवा आशादायक मार्ग मिळाला आहे.

Web Title: Hawaii forest restoration koa trees endangered birds return

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Sep 15, 2026 | 01:13 PM

Topics:  

  • America
  • Jungle
  • World news

संबंधित बातम्या

IPLN : जागतिक राजकारणात भारत आघाडीवर; BRICS नंतर QUADच्या नव्या रणनीतीचा बोलबाला; टोकियोत घेतला ‘हा’ मोठा निर्णय
1

IPLN : जागतिक राजकारणात भारत आघाडीवर; BRICS नंतर QUADच्या नव्या रणनीतीचा बोलबाला; टोकियोत घेतला ‘हा’ मोठा निर्णय

Saudi Pipeline Shutdown : 90 मिनिटांत खेळ खल्लास! सौदीने केली मुख्य तेल पाइपलाइन बंद; आंतरराष्ट्रीय बाजारात क्रूड 107 डॉलर पार
2

Saudi Pipeline Shutdown : 90 मिनिटांत खेळ खल्लास! सौदीने केली मुख्य तेल पाइपलाइन बंद; आंतरराष्ट्रीय बाजारात क्रूड 107 डॉलर पार

Google Finland : गुगल अन् ट्रम्प आमनेसामने! जेमिनी, यूट्यूब चालवण्यासाठी गुगलची मोठी आखणी; फिनलंडमध्ये 15 अब्ज डॉलर्सचा प्लॅन
3

Google Finland : गुगल अन् ट्रम्प आमनेसामने! जेमिनी, यूट्यूब चालवण्यासाठी गुगलची मोठी आखणी; फिनलंडमध्ये 15 अब्ज डॉलर्सचा प्लॅन

AI Risks : ‘येत्या 5 वर्षांत एआय मानवांसाठी ठरेल अत्यंत घातक…’; गुगलच्या वरिष्ठ संशोधकाचा गंभीर इशारा देऊन राजीनामा
4

AI Risks : ‘येत्या 5 वर्षांत एआय मानवांसाठी ठरेल अत्यंत घातक…’; गुगलच्या वरिष्ठ संशोधकाचा गंभीर इशारा देऊन राजीनामा

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.