अमेरिकेतील कॅलिफोर्नियामध्ये मंदिराच्या तोडफोडीची (Hindu Temple Vandalism in USA)आणखी एक घटना समोर आली आहे. कॅलिफोर्नियातील हावर्ड येथील एका हिंदू मंदिरावर भारतविरोधी भित्तिचित्र लावण्यात आले आहे. खलिस्तानी समर्थकांनी देवीच्या मंदिराबाहेर भारतविरोधी भित्तीचित्रे लावली आहेत. कॅलिफोर्नियातील स्वामीनारायण मंदिराच्या तोडफोडीच्या घटनेच्या दोन आठवड्यांनंतर खलिस्तानींचे हे कृत्य केले आहे. यापुर्वी याच परिसरातील शिवदुर्गा मंदिरातही चोरी झाली होती.
[read_also content=”हरियाणात माजी आमदारच्या घरावर ईडीचा छापा! 5 कोटी रुपये रोख, 5 किलो सोने आणि 300 काडतुसे जप्त https://www.navarashtra.com/india/ed-raids-on-haryana-former-mla-dilbag-singh-rs-5-crore-cash-5-kg-bullions-and-300-cartridges-recovered-nrps-495186.html”]
हिंदू अमेरिकन फाउंडेशनने (एचएएफ) मंदिरातील घटनेची माहिती दिली. या घटनेचा भारताने तीव्र निषेध केला आहे. गेल्या महिन्यात, कॅलिफोर्नियातील एका हिंदू मंदिराच्या बाहेरील भिंतींवर भारतविरोधी आणि खलिस्तान समर्थक भित्तिचित्रे रंगवण्यात आली होती. गेल्या महिन्यात 23 डिसेंबर रोजी नेवार्कमधील श्री स्वामीनारायण मंदिराच्या बाहेर इतर आक्षेपार्ह भित्तिचित्रांसह साइनपोस्टवर ‘खलिस्तान’ हा शब्द स्प्रे-पेंट करण्यात आला होता. ताज्या तोडफोडीच्या घटनेतही मंदिराबाहेरील साईन बोर्डवर खलिस्तान आणि भारताचे पंतप्रधान यांच्याबद्दल अपमानास्पद गोष्टी लिहिण्यात आल्या आहेत.
यापूर्वी डिसेंबरमध्ये परराष्ट्र मंत्री एस जयशंकर यांनी नेवार्क मंदिरातील तोडफोडीवर चिंता व्यक्त केली होती. भारताबाहेरील अतिरेकी आणि फुटीरतावादी शक्तींना जागा देऊ नये, असे ते म्हणाले होते. आमल्या वाणिज्य दूतावासाने या प्रकरणी (अमेरिकन) सरकार आणि तेथील पोलिसांकडे तक्रार केली आहे. त्या घटनेवर अमेरिकन सरकारनेही चिंता व्यक्त केली होती.






