Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • गुरु, 24 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Oil Politics : चीनला मोठा दणका! होर्मुझ संकटात इराणशी व्यापारामुळे अमेरिकेची थेट ॲक्शन; ‘या’ तेल कंपनीवर लादले निर्बंध

US Sactions on China Oil Terminal : इराणशी मैत्री चीनला चांगलीच भोवली आहे. इराणकडून कोट्यवधी रुपयांचे तेल खरेदी केल्याच्या आरोखाली अमेरिकेने एका तेल टर्मिनल कंपनीवर निर्बंध लादले आहेत. यामुळे मोठी खळबळ उडाली आहे.

  • By स्वराली शहा
Updated On: May 02, 2026 | 11:51 AM
US Sanctions on China Oil Terminal

US Sanctions on China Oil Terminal

Follow Us
Follow Us:
  • अमेरिकेची चीनवर थेट ॲक्शन
  • इराणकडून तेल खरेदीमुळे कंपनीवर लादले निर्बंध
  • अमेरिका-चीनमध्ये वादाची ठिणगी?
US China Oil Terminal Sanctions : वॉशिंग्टन/बीजिंग : सध्या जागतिक राजकारणात होर्मुझची सामुद्रधुनी चर्चेच्या केंद्रस्थानी आहे. अमेरिकेचा इराणी जहाजांच्या नाकेबंदीमुळे आणि त्यांच्यावरील आर्थिक निर्बंधामुळे आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत इंधन आणि उर्जा संकट निर्माण झाले आहे. याच पार्श्वभूमीवर अमेरिकेने आणखी एक मोठा निर्णय घेतला आहे. अमेरिकेने इराणशी व्यापारामुळे चीनविरोधात मोठी कारवाई केली आहे. चीन(China) च्या एका मोठ्या तेल टर्मिनलवर निर्बंध लादण्यात आले आहेत. यामुळे दोन्ही देशांत तणाव निर्माण होण्याची शक्यता आहे.

US China Tension : इराणशी मैत्री चीनला भोवणार? इंडो-पॅसिफिक क्षेत्रात ट्रम्प यांचा ‘तो’ मास्टरप्लॅन अन् ड्रॅगनची उडाली झोप

अमेरिकेची चीनविरोधात मोठी कारवाई

अमेरिकेच्या परराष्ट्र विभागाने दिलेल्या माहितीनुसार, चीनमधील किंगदाओ हैये या पेट्रोलियम टर्मिनल ऑपरेटवर बंदी घातली आहे. या निर्णयामुळे जगभरात मोठी खळबळ उडाली आहे. अमेरिकेचा आरोप आहे की, चीनच्या या कंपनीने गेल्या वर्षी फेब्रुवारीपासून इराणकडून कोट्यावधी बॅरल प्रतिबंधित कच्चे तेल आयात केले आहे. यामुळे हा निर्णय घेण्यात आला आहे.

याशिवाय ब्रिटनमधील थ्राइविंग टाइम्स इंटरनॅशनल आणि हॉंगकॉंगची ऑनबोर्ड शिप मॅनेजमेंट लिमिटेड या दोन जहाज व्यवस्थापन कंपन्यांवरही बंदी घालण्यात आली आहे.

टॅक्स दिला नाही तर… – अमेरिका (America)

अमेरिकेने, इराणशी व्यापार करणाऱ्या इतर देशांनाही कडक इशारा दिला आहे. होर्मुझ (Hormuz) सामुद्रधुनी पार करण्यासाठी कोणत्याही देशाने इराणला टोल दिल्यास त्यांच्यावरही कठोर निर्बंध लादले जातील, असे म्हटले आहे. इराण (Iran) होर्मुझचा वापर बेकायदेशीरपणे करत असल्याचा आरोप अमेरिकेने केला आहे.

या मार्गावर इराणचा अवैध तेल व्यापार सुरु असून त्यातून मिळणाऱ्या पैशाचा वापर दहशतवाद पसरवण्यासाठी केला जातो असे अमेरिकेचे म्हणणे आहे. यासाठीच हे निर्णायक पाऊल उचलण्यात आले असल्याचे अमेरिकेने म्हटले आहे. या निर्बंधात केवळ तेल कंपन्याच नव्हे, तर इराणला परकीय चलन व्यवहारात मदत करणाऱ्या कंपन्यांचाही समावेश आहे.

जागतिक परिणाम

सध्या अमेरिकेच्या या निर्णयामुळे आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत खळबळ उडाली आहे. यामुळे अमेरिका आणि चीनमध्ये व्यापारी तणाव वाढण्याची शक्यता आहे. ज्याच्या जागतिक अर्थव्यवस्थेला फटका बसू शकतो. इराणवरील निर्बंधामुळे आधीच जागतिक बाजारपेठेत इंधन दर गगनाला भिडले आहेत. अशा परिस्थिती चीनविरोधात केलेली कारवाई काय वळण घेईल याकडे सर्वांचे लक्ष्य लागले आहे.

US Tariffs : ट्रम्प यांचा युरोपवर ‘टॅरिफ वॉर’! ‘या’ वस्तूंवर २५% टॅरिफ लादल्याने EU संतप्त, व्यापार युद्ध भडकणार?

💡

Frequently Asked Questions

  • Que: अमेरिकेने चीनच्या कंपनीवर काय कारवाई केली आणि का?

    Ans: अमेरिकेने चीनवर गंभीर आरोप केले आहेत. चीनची कंपनी किंगदाओ हैये इराणकडून मोठ्या प्रमाणात प्रतिबंधित कच्चे तेल आयात करत आहे. यातून मिळणाऱ्या पैशातून इराण दहशतवादी कायवाया आणि प्रादेशिक अस्थिरता निर्माण करत असल्याचे अमेरिकेचे म्हणणे आहे. यामुळे अमेरिकेने चीनच्या कंपनीवर निर्बंध लादले आहेत.

  • Que: होर्मुझबद्दल अमेरिकेने काय इशारा दिला आहे?

    Ans: अमेरिकेने म्हटले आहे की, होर्मुझमधून जाणाऱ्या कोणत्याही देशांच्या जहाजांनी इराणला टोल दिल्यास त्यांनाही गंभीर परिणामांना सामोरे जावे लागेल.

Web Title: Hormuz crisis america sanctions on china based oil terminal over iran trade

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: May 02, 2026 | 11:32 AM

Topics:  

  • America
  • China
  • Iran News
  • World news

संबंधित बातम्या

Israel Elections 2026 : इस्रायलमध्ये मुस्लिमांना मतदार यादी आणि निवडणुकीतून वगळण्याची तयारी; नेतान्याहूंचा सत्तेसाठी मोठा डाव?
1

Israel Elections 2026 : इस्रायलमध्ये मुस्लिमांना मतदार यादी आणि निवडणुकीतून वगळण्याची तयारी; नेतान्याहूंचा सत्तेसाठी मोठा डाव?

Trump-Xi Meet : रेड कार्पेट, 21 तोफांची सलामी अन् B-1 बॉम्बरची गर्जना; जिनपिंग यांचे USमध्ये जंगी स्वागत, चर्चेत 4 मोठे मुद्दे
2

Trump-Xi Meet : रेड कार्पेट, 21 तोफांची सलामी अन् B-1 बॉम्बरची गर्जना; जिनपिंग यांचे USमध्ये जंगी स्वागत, चर्चेत 4 मोठे मुद्दे

MV Cape Dao: ओमानजवळ व्यापारी जहाजावर टॉर्पेडो हल्ला; 20 पैकी 1 भारतीय खलाशाचा मृत्यू, 19 जणांना वाचवण्यात यश
3

MV Cape Dao: ओमानजवळ व्यापारी जहाजावर टॉर्पेडो हल्ला; 20 पैकी 1 भारतीय खलाशाचा मृत्यू, 19 जणांना वाचवण्यात यश

World News : रोममध्ये गाझासाठी आक्रोश! ३०० मुलांची नावे लिहिलेले दफनवस्त्र घेऊन पुजाऱ्यांचे आंदोलन
4

World News : रोममध्ये गाझासाठी आक्रोश! ३०० मुलांची नावे लिहिलेले दफनवस्त्र घेऊन पुजाऱ्यांचे आंदोलन

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.