Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शनि, 5 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • Politics |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Oil Crisis 2026: पुन्हा कापली जगाची ‘लाईफलाईन’! होर्मुझ नाकेबंदीने जपान ते सिंगापूरपर्यंत खळबळ; भारताच्या पेट्रोल-डिझेलवर संकट

Hormuz Blockade Update: शांतता चर्चा अयशस्वी झाल्यानंतर, ट्रम्प यांनी होर्मुझवर नाकेबंदी लादली आहे. या संकटामुळे जगातील २० टक्के तेल व्यापाराला धोका निर्माण झाला असून, भारताच्या ऊर्जा सुरक्षेला मोठे आव्हान निर्माण झालेय.

  • By हर्षदा पाटोळे
Updated On: Apr 15, 2026 | 12:56 PM
hormuz strait blockade donald trump order india oil price impact 2026

hormuz strait blockade donald trump order india oil price impact 2026

Follow Us
Follow Us:
  • ट्रम्प यांचा ‘नाकेबंदी’ आदेश
  • जागतिक ऊर्जेला धोका
  • भारतावर दुहेरी टांगती तलवार

Hormuz Strait blockade update 2026 : जागतिक राजकारणात एकामागून एक धक्कादायक घडामोडी घडत असतानाच, अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प (Donald Trump) यांनी घेतलेल्या एका निर्णयाने जागतिक अर्थव्यवस्थेचा पाया हादरवून टाकला आहे. इस्लामाबादमधील शांतता चर्चा अपयशी ठरताच, ट्रम्प यांनी होर्मुझच्या सामुद्रधुनीवर (Strait of Hormuz) लष्करी नाकेबंदी करण्याचा ऐतिहासिक आणि धोकादायक आदेश दिला आहे. ज्या नाकेबंदीला ट्रम्प यांनी एकेकाळी विरोध केला होता, तीच शस्त्र त्यांनी आता इराणला आर्थिकदृष्ट्या संपवण्यासाठी उपसले आहे.

CENTCOM ची मोठी कारवाई: समुद्रात अमेरिकन नौदलाचा पहारा

ट्रम्प यांच्या आदेशानुसार, अमेरिकेच्या सेंट्रल कमांडने (CENTCOM) पर्शियन आखात आणि ओमानच्या आखातात कडक पहारा सुरू केला आहे. इराणशी संबंधित कोणत्याही तेलवाहू किंवा मालवाहू जहाजाला या मार्गातून जाण्यास मज्जाव केला जात आहे. विशेष म्हणजे, चीन हा इराणकडून सर्वात जास्त तेल आयात करणारा देश असल्याने, अमेरिकन नौदल चिनी जहाजांना अडवणार का? या प्रश्नावर जगाचे लक्ष लागले आहे. जर तसे झाले, तर हे संकट केवळ इराण-अमेरिका मर्यादित न राहता जागतिक महासत्तांमधील संघर्षात रूपांतरित होऊ शकते.

जागतिक घडामोडी संबंधित बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा : Baloch Freedom: BLAचा पहिला सागरी हल्ला; जिवानीजवळ पाकिस्तानी तटरक्षक दलाच्या बोटीवर गोळीबार, 3 जवान ठार, VIDEO VIRAL

आशियाई अर्थव्यवस्थांची दमछाक: जपान, सिंगापूर संकटात

जपानची गुंतवणूक बँक ‘नोमुरा’ने आपल्या ताज्या अहवालात इशारा दिला आहे की, या नाकेबंदीचा सर्वात मोठा फटका आशियाई देशांना बसेल. जपान, थायलंड, फिलीपिन्स आणि सिंगापूर यांसारखे देश आपल्या तेलाच्या गरजांसाठी पूर्णपणे मध्य-पूर्वेवर अवलंबून आहेत. होर्मुझ हा मार्ग बंद झाल्याने या देशांमध्ये इंधनाचा तुटवडा निर्माण होऊ शकतो, ज्यामुळे महागाई गगनाला भिडण्याची शक्यता आहे. सिंगापूरसारख्या जागतिक व्यापारी केंद्रासाठी ही नाकेबंदी म्हणजे गळा आवळण्यासारखे आहे.

Over six weeks of conflict, Iran has halted virtually all traffic in the Strait of Hormuz. Even under a U.S. blockade, these factors allow Iran to continue exerting influence over who crosses it. Here’s what makes the strait so critical: https://t.co/pMf3fC927Q — The Washington Post (@washingtonpost) April 14, 2026

credit – social media and Twitter

भारताची डोकेदुखी वाढली: ६०% गॅस पुरवठा धोक्यात

भारतासाठी ही परिस्थिती अत्यंत चिंताजनक आहे. आपण आपल्या गरजेचा सुमारे ८५% कच्चा माल आयात करतो आणि त्यातील मोठा वाटा होर्मुझमार्गे येतो. विशेषतः भारताचा ६०% एलएनजी (LNG) पुरवठा याच प्रदेशातून येतो. इराणने भारताला पुरवठ्याचे आश्वासन दिले असले तरी, अमेरिकन नौदलाच्या नाकेबंदीमुळे भारतीय जहाजे सुरक्षितपणे बाहेर पडू शकतील का, यावर प्रश्नचिन्ह आहे. जर हा मार्ग दीर्घकाळ बंद राहिला, तर भारतात पेट्रोल-डिझेलच्या किमतीत प्रति लिटर १० ते १५ रुपयांची वाढ होण्याची शक्यता तज्ज्ञांनी वर्तवली आहे.

जागतिक घडामोडी संबंधित बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा : Lebanon Crisis: युगांतराची नांदी! इस्रायल-लेबनॉन दशकांनंतर पहिल्यांदाच एका टेबलवर; मार्को रुबियो यांनी चर्चेला म्हटले ऐतिहासिक

रशिया ठरणार का भारताचा तारणहार?

या गडद संकटात भारतासाठी एकच आशेचा किरण आहे, तो म्हणजे रशिया. युक्रेन युद्धानंतर भारताने रशियाकडून कच्च्या तेलाची आयात मोठ्या प्रमाणावर वाढवली आहे. रशियाचे तेल होर्मुझमार्गे येत नसल्याने, भारताचा किमान काही टक्के पुरवठा सुरक्षित राहू शकतो. मात्र, खते आणि रसायनांच्या कच्च्या मालासाठी आपण आजही आखाती देशांवर अवलंबून आहोत, ज्यामुळे शेती आणि उद्योगांवर याचा अप्रत्यक्ष परिणाम होणारच आहे.

💡

Frequently Asked Questions

  • Que: होर्मुझची सामुद्रधुनी भारतासाठी का महत्त्वाची आहे?

    Ans: भारताचा सुमारे ६०% एलएनजी आणि कच्च्या तेलाचा मोठा भाग याच मार्गातून येतो, त्यामुळे ऊर्जा सुरक्षेसाठी हा मार्ग अत्यंत महत्त्वाचा आहे.

  • Que: डोनाल्ड ट्रम्प यांनी नाकेबंदी का लादली?

    Ans: इस्लामाबादमधील शांतता चर्चा फिसकटल्यानंतर इराणवर आर्थिक दबाव आणण्यासाठी आणि त्यांचा तेल व्यापार रोखण्यासाठी ट्रम्प यांनी ही कारवाई केली आहे.

  • Que: या नाकेबंदीमुळे पेट्रोलच्या किमतींवर काय परिणाम होईल?

    Ans: जागतिक तेल पुरवठा विस्कळीत झाल्यामुळे कच्च्या तेलाच्या किमती वाढतील, ज्याचा थेट परिणाम भारतात पेट्रोल आणि डिझेल महाग होण्यावर होईल.

Web Title: Hormuz strait blockade donald trump order india oil price impact 2026

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Apr 15, 2026 | 12:56 PM

Topics:  

  • Donald Trump
  • international news
  • Strait of Hormuz

संबंधित बातम्या

US-Iran War : 100 मीटर खोल बोगदे अन् हजारो सेंट्रीफ्यूज; इराणच्या नतान्झजवळील ‘त्या’ रहस्यमय पर्वतावर आता अमेरिकेचा डोळा
1

US-Iran War : 100 मीटर खोल बोगदे अन् हजारो सेंट्रीफ्यूज; इराणच्या नतान्झजवळील ‘त्या’ रहस्यमय पर्वतावर आता अमेरिकेचा डोळा

US-Iran war: युद्धाचा भडका! अमेरिकन नौदलाने Red Sea मधून 86 जहाजे वळवली; हुथींचे क्षेपणास्त्र हल्ले, जागतिक तेलाचे संकट गहिरे
2

US-Iran war: युद्धाचा भडका! अमेरिकन नौदलाने Red Sea मधून 86 जहाजे वळवली; हुथींचे क्षेपणास्त्र हल्ले, जागतिक तेलाचे संकट गहिरे

Iran News : आखातात इंधन तस्करीचा पर्दाफाश; ३.८२ लाख लिटर इंधन जप्त, ११ जण अटकेत
3

Iran News : आखातात इंधन तस्करीचा पर्दाफाश; ३.८२ लाख लिटर इंधन जप्त, ११ जण अटकेत

US-Israel Iran War: अमेरिकेचे इराणवर भीषण हवाई हल्ले! चाबहार अन् बंदर अब्बासमध्ये महाभयंकर स्फोट; ट्रम्प यांच्या इशाऱ्याने खळबळ
4

US-Israel Iran War: अमेरिकेचे इराणवर भीषण हवाई हल्ले! चाबहार अन् बंदर अब्बासमध्ये महाभयंकर स्फोट; ट्रम्प यांच्या इशाऱ्याने खळबळ

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.