
India and China to start Direct flight services soon
भारत, चीन (China) आणि रशियाने (Russia) या तिन्ही देशांनी ट्रम्प यांच्या टॅरिफला विरोध केला आहे. गेल्या काही काळात या तिन्ही देशांचे राजनैतिक संबंध मजबूत होत असल्याचे दिसून येते आहे. तिन्ही देश एकमेकांच्या संपर्कात आहेत. रशियाशी सुरुवातीपासूनच भारताचे चांगले संबंध आहेत, परंतु चीनशी बिघडलेले संबंध अधिक चांगले होताना स्पष्ट दिसत आहे. चीनने भारतावरील टॅरिफचा विरोध केला आहे.
कुत्र्याचं शेपूट वाकडं ते वाकडंच! ४८ तासांत पाकिस्तानी नेत्यांची तिसऱ्यांदा भारताला पोकळ धमकी
चीनच्या परराष्ट्र मंत्रालयाने यावर टीकाही केली होती. तसेच येत्या काळात भारताचे पंतप्रधान चीनला भेट देण्याची शक्यता आहे. चीनकडून भारताला SCO परिषदेचे खास आमंत्रण मिळाले आहे. ही भेट चीन आणि भारताच्या संबंधांना नवी चालना देऊ शकते. २०२० मध्ये गलवान खोऱ्यात भारत आणि चीनमद्ये हिंसक संघर्ष झाला होता. त्यानंतर दोन्ही देशांचे संबंधांमध्ये कटूता निर्माण झाली होती. मात्र आता दोन्ही देशांतील संबंध सुधारण्याच्या मार्गावर आहेत.
ब्लूमर्ग वृत्तंस्थेने दिलेल्या माहितीनुसार, ऑगस्ट महिन्याच्या अखेरीस भारत आणि चीनमध्ये थेट विमान सेवा सुरु करण्याची घोषणा होईल. चीनच्या शांघाय (SCO) सहकार्य संघटनेच्या परिषेदत याची अधिकृत घोषणा केली जाऊ शकते. गलवान खोऱ्यातील वादानंतर पाच वर्षांनी दोन्ही देशांमधील विमानसेवा सुरु करण्यात येत आहे.
सध्या भारत आणि चीनमधील संबंधांमध्ये सतत सुधारणा होत आहे, अशी माहिती बिजिंगच्या थिंक टॅंक सेंटर फॉर चायना अँड ग्लोबलायझेशनने दिली आहे. याच वेळी ट्रम्प यांच्या टॅरिफमुळे दोन्ही देशांच्या धोरणात्मक स्वायत्तता आणि स्वातंत्र्य राखणे महत्वाचे असल्याचे भारताच्या लक्षात आले आहे.
भारतीयांचे अमेरिकेत राहण्याचे भंगले स्वप्न; मायदेशी परतण्याची मिळाली नोटीस