Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • मंगळ, 8 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • Politics |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

India-Bangladesh: सीमेवर लष्करी हालचाली वाढल्या; BSF आणि BGB आमनेसामने; ‘पुश-इन’वरून बांगलादेशचे गंभीर आरोप

भारत आणि बांगलादेश यांच्या सीमेवर तणाव वाढतच आहे. भारताने कथित बेकायदेशीर स्थलांतरितांना देशाबाहेर काढल्याने बांगलादेशी नागरिक संतप्त झाले आहेत. ढाकाने पुन्हा एकदा आरोप केले आहेत.

  • By हर्षदा पाटोळे
Updated On: Jul 24, 2026 | 05:20 PM
india bangladesh border tension bsf bgb confrontation chuadanga pushback

india bangladesh border tension bsf bgb confrontation chuadanga pushback

Follow Us
Follow Us:
  • चुआडांगा सीमेवर आमने-सामने
  • बांगलादेशचा गंभीर आरोप
  • भारताची कडक भूमिका

भारत आणि बांगलादेश (Bangladesh) यांच्यातील ४,०९६ किलोमीटर लांबीच्या आंतरराष्ट्रीय सीमेवर गेल्या काही दिवसांपासून परिस्थिती अत्यंत संवेदनशील बनली आहे. भारताने आपल्या हद्दीत बेकायदेशीरपणे राहणाऱ्या बांगलादेशी नागरिकांविरुद्ध शोधमोहीम तीव्र केल्यानंतर ढाका (बांगलादेश सरकार) आणि भारतीय सीमा सुरक्षा बल (BSF) यांच्यात थेट वाद पेटला आहे. पूर्व सीमेवरील चुआडांगा आणि कुश्तिया जिल्ह्यांच्या हद्दीत भारतीय सीमा सुरक्षा दलाने बेकायदेशीर स्थलांतरितांना बांगलादेशी हद्दीत ढकलण्याचा (Push-in) प्रयत्न केल्याचा आरोप बॉर्डर गार्ड बांगलादेशने (BGB) केला आहे. या घटनेनंतर दोन्ही बाजूंचे जवान सीमेवर अलर्ट मोडवर आले असून तणाव कमालीचा वाढला आहे.

मिळालेल्या सविस्तर माहितीनुसार, चुआडांगा बटालियनच्या (६ BGB) अंतर्गत येणाऱ्या दर्शन बॉर्डर आउटपोस्टजवळ (BOP) सीमा स्तंभ ७६/४-एस जवळ ही घटना घडली. बीजीबीच्या दाव्यानुसार, मंगळवारी पहाटेच्या सुमारास बीएसएफच्या ३२ व्या बटालियनच्या गेडे कॅम्पमधील जवानांनी ५ अज्ञात नागरिकांना (ज्यात १ पुरुष, ३ महिला आणि १ लहान मूल होते) बांगलादेशच्या हद्दीत ढकलण्याचा प्रयत्न केला. बीजीबीच्या गस्ती पथकाने आणि स्थानिक ग्रामस्थांनी त्वरित रोखल्यामुळे या लोकांना कुंपणाजवळच थांबण्यास भाग पाडले गेले. अशाच प्रकारची दुसरी घटना कुश्तिया सीमेवरही घडल्याचा दावा बीजीबीने केला आहे.

जागतिक घडामोडी संबंधित बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा : Ukraine Russia War: 100 अब्ज रुबलची राख! युक्रेनियन ड्रोन्सचा थरार; रशियाचे लॉजिस्टिक्स नेटवर्क उध्वस्त, 50 उड्डाणे विमान रद्द

ढाकाकडून भारताला जबाबदार धरण्याचा प्रयत्न

या संपूर्ण प्रकरणावर बांगलादेशचे गृहमंत्री सलाहुद्दीन अहमद यांनी तीव्र प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. भारताकडून वारंवार सीमा नियमांचे उल्लंघन करून लोकांना बांगलादेशात ढकलले जात असल्याचा पुनरुच्चार त्यांनी केला आहे. बीजीबीचे कार्यवाहक कमांडर मेजर तवासिन हबीब हसन यांनी सांगितले की, सीमेवर बीजीबीच्या जवानांना अतिदक्षतेचा (High Alert) इशारा देण्यात आला असून घुसखोरीचा कोणताही प्रयत्न मोडून काढण्यासाठी गस्त वाढवण्यात आली आहे. बांगलादेशातील राजकीय वर्तुळात या घटनेचे तीव्र पडसाद उमटत असून भारतविरोधी भावना भडकावण्याचा प्रयत्न केला जात आहे.

दुसऱ्या बाजूला, भारतीय सुरक्षा यंत्रणा आणि केंद्र सरकारने आपली भूमिका अत्यंत स्पष्ट ठेवली आहे. भारताच्या मते, जे लोक बेकायदेशीरपणे, कोणत्याही वैध कागदपत्रांशिवाय भारताच्या हद्दीत प्रवेश करतात किंवा राहत आहेत, त्यांना योग्य कायदेशीर प्रक्रियेचा अवलंब करून आणि ओळख पटवूनच सीमेपलीकडे पाठवले जाते. पश्चिम बंगाल आणि ईशान्येकडील राज्यांमध्ये घुसखोरी रोखण्यासाठी आणि घुसखोरांना हुडकून काढण्यासाठी भारतीय यंत्रणांनी कडक पावले उचलली आहेत, ज्याला बांगलादेशी प्रशासनाकडून विरोध दर्शवला जात आहे.

जागतिक घडामोडी संबंधित बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा : Elon Musk: ‘माझी जोडीदार अर्धी भारतीय’; वंशवादाच्या आरोपांवर एलॉन मस्क यांचे प्रत्युत्तर; मुलाच्या नावामागील भारतीय कनेक्शनही उघड

४,०९६ किमी सीमेवरील सुरक्षा आव्हान आणि अपूर्ण कुंपण

भारत आणि बांगलादेश दरम्यानची सीमा भौगोलिकदृष्ट्या अत्यंत गुंतागुंतीची आहे. सुमारे ४,०९६ किमी लांबीच्या या सीमेपैकी तब्बल ८६० किमीपेक्षा जास्त भागावर अजूनही काटेरी कुंपण घालणे शक्य झालेले नाही किंवा ते अपूर्ण आहे. नद्या, दलदलीचा भाग आणि सखल जमिनीमुळे या भागातून मानवी तस्करी, जनावरांची तस्करी आणि बेकायदेशीर घुसखोरी मोठ्या प्रमाणावर होते.

जून महिन्यात नवी दिल्ली येथे BSF आणि BGB यांच्यात ५७ वी महासंचालक स्तराची (DG-Level) द्विपक्षीय परिषद पार पडली होती. या बैठकीत ‘पुश-इन’, सीमावर्ती गुन्हेगारी आणि सीमेवरील गोळीबाराच्या घटनांवर चर्चा झाली होती. परंतु, जमिनीवर मात्र परिस्थिती जैसे थे असून दररोज नवीन वादाचे प्रसंग उद्भवत आहेत. भारताने बांगलादेशला आपल्या नागरिकांची ओळख पटवण्याची प्रक्रिया जलद करण्याची विनंती केली आहे, जेणेकरून बेकायदेशीर स्थलांतरितांचे कायदेशीर हस्तांतरण सुरळीतपणे होऊ शकेल.

Web Title: India bangladesh border tension bsf bgb confrontation chuadanga pushback

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jul 24, 2026 | 05:20 PM

Topics:  

  • Bangladesh
  • India border
  • World news

संबंधित बातम्या

Falcon Auction: भाचीच्या आवडीसाठी काकाने मोजले 3.85 कोटी; अबू धाबीत विकला गेला जगातील सर्वात महागडा पांढरा ससाणा
1

Falcon Auction: भाचीच्या आवडीसाठी काकाने मोजले 3.85 कोटी; अबू धाबीत विकला गेला जगातील सर्वात महागडा पांढरा ससाणा

USS Abraham Lincoln: इराण युद्धावरून परतणाऱ्या 5 हजार अमेरिकन सैनिकांचा थायलंडमध्ये मुक्काम; अखेर अब्राहम लिंकन मायदेशी परतले
2

USS Abraham Lincoln: इराण युद्धावरून परतणाऱ्या 5 हजार अमेरिकन सैनिकांचा थायलंडमध्ये मुक्काम; अखेर अब्राहम लिंकन मायदेशी परतले

US Plane Crash: मियामी विमानतळावर मोठा अपघात; मालवाहू विमान धावपट्टीवरून घसरले, 5 जणांचा मृत्यू,पाहा VIDEO
3

US Plane Crash: मियामी विमानतळावर मोठा अपघात; मालवाहू विमान धावपट्टीवरून घसरले, 5 जणांचा मृत्यू,पाहा VIDEO

Strait of Hormuz: इराणचा US ला मोठा दणका! होर्मुझ सामुद्रधुनीत नवीन ‘प्रतिबंधित क्षेत्र’ घोषित; जागतिक तेलाच्या पुरवठ्यावर संकट
4

Strait of Hormuz: इराणचा US ला मोठा दणका! होर्मुझ सामुद्रधुनीत नवीन ‘प्रतिबंधित क्षेत्र’ घोषित; जागतिक तेलाच्या पुरवठ्यावर संकट

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.