Photo Credit- Social Media भारत-चीन वाद मिटवण्यासाठी डोनाल्ड ट्रम्प यांची नवी ऑफर; भारत म्हणाला...
India-China border Dispute: भारतीय वेळेनुसार गुरुवारी संध्याकाळी (शुक्रवारी पहाटे 5 वाजता) अमेरिकेचे माजी अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यात संयुक्त पत्रकार परिषद झाली. यावेळी ट्रम्प यांनी भारत-चीन सीमेवरील तणाव मिटवण्यासाठी मध्यस्थी करण्याची इच्छा व्यक्त केली. त्यांनी सांगितले की, “भारत आणि चीन यांच्यातील संघर्ष क्रूर आहे. जर मी हे थांबवण्यासाठी काही मदत करू शकलो, तर मला आनंद होईल.”
भारताचे थेट उत्तर
भारताने ट्रम्प यांच्या या प्रस्तावाला विनम्र पण ठाम नकार दिला आहे. भारतीय परराष्ट्र मंत्रालयाचे सचिव विक्रम मिस्त्री यांनी सांगितले की, “भारत आपल्या कोणत्याही शेजारी देशासोबतचे प्रश्न द्विपक्षीय चर्चेतून सोडवतो. भारत-चीन सीमेचा मुद्दाही आम्ही कोणत्याही बाह्य हस्तक्षेपाशिवाय सोडवण्यास प्राधान्य देतो.”
US Deportation: अमेरिकेतून पुन्हा भारतीयांना केले हद्दपार; ट्रम्प प्रशासनाची कारवाई सुरूच
चीनशी संबंधित प्रश्नावर ट्रम्प यांनी म्हटले की, “चीनसोबत आमचे संबंध चांगले राहतील. कोविडच्या आधीपर्यंत चीनचे अध्यक्ष शी जिनपिंग आणि माझ्यात चांगले संबंध होते. चीन हा जागतिक स्तरावर महत्त्वाचा खेळाडू आहे. तसेच, मला वाटते की चीन रशिया-युक्रेन युद्ध थांबवण्यासाठी मदत करू शकतो.”
ट्रम्प यांनी पुढे सांगितले की, “अमेरिका दरवर्षी 900 अब्ज डॉलर संरक्षणावर खर्च करतो, तर चीन 450 अब्ज डॉलर खर्च करतो. हा पैसा परस्परांशी संघर्ष करण्यासाठी वापरण्याऐवजी चांगल्या उद्देशांसाठी वापरायला हवा.”
भारताने यापूर्वीही कधीही कोणत्याही तिसऱ्या देशाच्या हस्तक्षेपाला संमती दिली नाही. विशेषतः चीन, पाकिस्तान किंवा इतर शेजारी देशांसोबतच्या तणावाच्या बाबतीत भारताने स्वत:च्या धोरणानुसार द्विपक्षीय चर्चा आणि राजनैतिक मार्गानेच प्रश्न सोडवण्यावर भर दिला आहे. ट्रम्प यांनी मध्यस्थीचा प्रस्ताव दिला असला तरी, भारताने आपल्या परराष्ट्र धोरणाच्या अनुषंगाने स्वतंत्र आणि सक्षम राष्ट्र म्हणून कोणत्याही तिसऱ्या पक्षाच्या हस्तक्षेपाशिवाय प्रश्न सोडवण्याचे धोरण कायम ठेवले आहे.






