(Photo - Social media)
उजनीतील ऊर्जा प्रकल्पांविरोधात जनक्षोभ! महामार्गावर रास्ता रोको; Rohit Pawar आक्रमक, म्हणाले…
‘माझं गाव, आरोग्यसंपन्न गाव’ या अभियानाशी यात्रेची सांगड घालून सार्वजनिक स्वच्छता, शुद्ध पाणीपुरवठा, पोषण, सांडपाणी व्यवस्थापन, आजारांचे नियंत्रण आणि आरोग्यदायी जीवनशैलीबाबत जनजागृती केली जाणार आहे. प्रतिबंधात्मक आरोग्य उपायांमध्ये ग्रामपातळीवरील सहभाग वाढविण्यावरही भर राहणार आहे.
आरोग्य संवाद यात्रा ही केवळ आरोग्य योजनांची माहिती देणारी मोहीम राहणार नसून, नागरिकांच्या अनुभवातून आरोग्य व्यवस्थेतील सुधारणा निश्चित करण्याचा प्रयत्न आहे. आरोग्य समित्या, लोकप्रतिनिधी, आरोग्य कर्मचारी, वैद्यकीय व्यावसायिक आणि सर्वसामान्य नागरिक यांच्यात समन्वय वाढवून आरोग्य सेवांबाबत उत्तरदायित्व मजबूत करण्यावर भर राहणार आहे.
या आरोग्य संवाद यात्रेत १२५ नवीन संस्थांचे लोकार्पण करण्यात येणार आहे. सोबतच जिल्हा एकात्मिक आरोग्यवर्धिनी समिती, विधानसभा मतदारसंघ समिती, रुग्ण कल्याण समिती, जन आरोग्य समिती, ग्राम आरोग्य, पोषण स्वच्छता समिती यापैकी एका समितीसोबत बैठक व चर्चा करण्यात येईल. शासकीय आरोग्य संस्थांच्या कामकाजाची प्रत्यक्ष पाहणी व आढावा घेण्यात येईल.
राष्ट्रीय बाल आरोग्य कार्यक्रमांतर्गत तपासणी करण्यात आलेल्या शाळा व अंगणवाडी यांना भेट देऊन या योजनेचा आढावा घेतील. याशिवाय महात्मा फुले जनआरोग्य योजना व प्रधानमंत्री आयुष्यमान भारत जनआरोग्य योजनेत अंगिकृत रुग्णालयांना भेट देऊन खासगी डॉक्टर व रुग्णांशी संवाद साधला जाणार आहे.
पॅलिएटिव्ह केअर, सिकलसेल, संस्थात्मक प्रसूती झालेल्या माता, राष्ट्रीय बाल स्वास्थ्य कार्यक्रमांतर्गत शस्त्रक्रिया झालेली बालके, क्षयरोग, कुष्ठरोग, जननी सुरक्षा योजना लाभार्थी, कर्करोग तपासणीतील रुग्ण, महात्मा फुले जनआरोग्य योजनेचा लाभ घेतलेले रुग्ण यांच्याशी संवाद साधण्यात येईल.
आरोग्य योजनांचा प्रत्यक्ष लाभ नागरिकांपर्यंत किती प्रमाणात पोहोचतो. आरोग्य संस्थांमध्ये कोणत्या सुविधा उपलब्ध आहेत आणि रुग्णसेवेत कोणत्या अडचणी येतात, याचा आढावा यात्रेत घेतला जाणार आहे. प्रत्येक जिल्ह्यातील पाच प्राथमिक आरोग्य केंद्रे आणि दोन ग्रामीण रुग्णालयांच्या कामकाजाची वस्तुस्थिती जाणून घेतली जाणार आहे. आरोग्य उपकेंद्रांपासून जिल्हा, महानगरपालिका, स्त्री मनोरुग्ण आणि विशेष रुग्णालयांपर्यंतच्या सेवांचाही आढावा घेतला जाणार आहे.
नागरिकांच्या गरजा समजून घेणे, आरोग्य सेवांमधील त्रुटी ओळखणे आणि प्राप्त सूचनांच्या आधारे सुधारणा घडवून आणणे, या उद्देशाने आयोजित करण्यात येणारी आरोग्य संवाद यात्रा राज्यातील सार्वजनिक आरोग्य व्यवस्था अधिक सक्षम आणि लोकाभिमुख करण्यासाठी महत्त्वपूर्ण ठरणार आहे.या यात्रेत सार्वजनिक आरोग्य विभागाचे सचिव, आयुक्त, संचालक, सहसंचालक, उपसंचालक, जिल्हा आरोग्य अधिकारी, जिल्हा शल्यचिकित्सक आणि विविध आरोग्य योजनांचे प्रमुख अधिकारी सहभागी होणार आहेत.
Pune Water: विरोधात असताना आंदोलन, आता सत्तेत मौन; पुणेकरांवर एक दिवसाआड पाणीपुरवठ्याचे संकट?
Ans: आरोग्य संवाद यात्रा १ नोव्हेंबर २०२६ पासून सुरू होणार असून, ५ डिसेंबर २०२६ पर्यंत चालणार आहे.
Ans: या राज्यव्यापी यात्रेची सुरुवात नांदेड येथून होणार आहे.
Ans: या यात्रेचा मुख्य उद्देश राज्यातील सार्वजनिक आरोग्य व्यवस्था सक्षम करणे, आरोग्यसेवांतील त्रुटी दूर करणे आणि नागरिकांच्या सूचना जाणून घेणे हा आहे.






