Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • रवि, 5 जुलै 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Fifa World Cup |
  • Lifestyles |
  • ICC Women's T20 World Cup |
  • ind vs ire |
  • political news
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

India-Israel Investment Deal : भारत-इस्रायल गुंतवणूक करार अखेर लागू; आर्थिक आणि व्यापारी संबंधांना मिळणार गती

India-Israel Investment Deal : भारत आणि इस्रायल संबंधांना आता नवी दिशा मिळणार आहे. दोन्ही देशांतील गुंतवणूक करार अंमलात आला आहे. या कारारामुळे दोन्ही देशाच्या आर्थिक आणि व्यापारी संबंधांना चालना मिळेल.

  • By स्वराली शहा
Updated On: Jul 05, 2026 | 02:00 PM
India-Israel bilateral Investment Deal

India-Israel bilateral Investment Deal

Follow Us
Follow Us:
  • भारत-इस्रायल गुंतवणूक करार अखेर लागू
  • आर्थिक आणि व्यापारी संबंधांना मिळणार गती
  • उद्योगांंसाठी नव्या खुल्या संधी
India-Israel Investment Deal : नवी दिल्ली/जेरुसलेम : भारत आणि इस्रायल यांच्यात ८ सप्टेंबर २०२५ रोजी स्वाक्षरी झालेला ऐतिहासिक द्विपक्षीय गुंतवणूक करार शनिवारी अधिकृतपणे अंमलात आला. हा करार दोन्ही देशांमधील आर्थिक संबंध अधिक दृढ करण्याच्या आणि गुंतवणूकदारांसाठी सुरक्षित, पारदर्शक व विश्वासार्ह गुंतवणूक वातावरण निर्माण करण्याच्या दिशेने एक महत्त्वाचे पाऊल मानले जात आहे.

PM Modi Indonesia Visit : चीनची खैर नाही! भारत-इंडोनेशिया ब्रह्मोस करार अंतिम टप्प्यात; PM मोदींच्या दौऱ्यात करारावर शिक्कोमोर्तब?

गुंतवणूकदारांना संरक्षण

अर्थ मंत्रालयाने एका निवेदनात म्हटले, हा करार गुंतवणूक आणि गुंतवणूकदारांना भक्कम संरक्षण प्रदान करतो, तसेच सरकारांना जनहितासाठी धोरणात्मक निर्णय घेण्यासाठी पुरेसा अधिकार आणि लवचिकता देतो. या करारामध्ये गुंतवणुकीच्या अधिग्रहणापासून संरक्षण, पारदर्शकता सुनिश्चित करणे, गुंतवणूक निधीचे सुरळीत हस्तांतरण आणि नुकसान झाल्यास योग्य भरपाई यांसारख्या महत्त्वाच्या तरतुदींचा समावेश आहे.

गुंतवणूकदारांच्या हिताचे संरक्षण आणि सरकारचे नियामक अधिकार यांच्यात संतुलन राखण्यावरही विशेष लक्ष दिले गेले आहे, जेणेकरून सार्वभौम धोरणात्मक निर्णयांवर परिणाम होणार नाही. सरकारच्या मते, या करारामुळे दोन्ही देशांमधील द्विपक्षीय गुंतवणुकीत लक्षणीय वाढ होण्याची शक्यता आहे.

दोन्ही देशांतील आर्थिक सहकार्य अधिक दृढ होण्याची अपेक्षा

द्विपक्षीय गुंतवणूक ८०० दशलक्ष डॉलर्सवर सध्या, भारत आणि इस्रायलमधील एकूण द्विपक्षीय गुंतवणूक अंदाजे ८०० दशलक्ष डॉलर्स आहे. या करारामुळे येत्या काही वर्षांत या क्षेत्राला आणखी चालना मिळण्याची अपेक्षा आहे. याचा फायदा दोन्ही देशांतील कंपन्या आणि अर्थव्यवस्थांना होईल. करारावर स्वाक्षरी करताना, अर्थमंत्री निर्मला सीतारामण यांनी सांगितले की, नवीन गुंतवणुकीच्या संधींचा फायदा घेण्यासाठी दोन्ही देशांच्या उद्योगांनी आपले व्यावसायिक संबंध अधिक दृढ केले पाहिजेत.

इस्रायली अर्थमंत्री बेझलेल स्मोट्रिच यांनी सांगितले, सुरक्षेची आव्हाने असूनही दोन्ही देशांनी मजबूत आर्थिक वाढ साधली आहे. ही समान बाब त्यांना अधिक जवळ आणते. दोन्ही देशांच्या अर्थमंत्र्यांनी फिनटेक नवोपक्रम पायाभूत सुविधांचा विकास, वित्तीय नियमन आणि डिजिटल पेमेंट कनेक्टिव्हिटी यांसारख्या क्षेत्रांमध्ये आर्थिक सहकार्य अधिक वाढविण्याच्या आपल्या वचनबद्धतेचा पुनरुच्चार केला.

गुंतवणुकीच्या हालचालींना मिळणार चालना

मंत्रालयाच्या मते, आंतरराष्ट्रीय गुंतवणूक कायद्याची आधुनिक तत्त्वे आणि विकसित होत असलेले न्यायिक दृष्टिकोन लक्षात घेऊन हा करार तयार करण्यात आला आहे. सरकारचा विश्वास असा की, कराराच्या अंमलबजावणीमुळे भारत आणि इस्रायल यांच्यातील सीमापार गुंतवणुकीच्या हालचालींना गती मिळेल आणि दोन्ही देशांमधील आर्थिक भागीदारी अधिक मजबूत होईल.

विशेष म्हणजे, केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामण आणि इस्रायलचे अर्थमंत्री बेझलेल स्मोट्रिच यांच्या उपस्थितीत ८ सप्टेंबर २०२५ रोजी नवी दिल्लीत या करारावर स्वाक्षरी केली. एका अधिकृत निवेदनानुसार, हा करार गुंतवणूकदारांना अधिक सुरक्षा आणि निश्चितता प्रदान करेल. व्यापार आणि परस्पर गुंतवणुकीला प्रोत्साहन देण्यासाठी हा करार गुंतवणुकीला किमान पातळीचे संरक्षण आणि विवाद निराकरणासाठी एक स्वतंत्र लवाद प्रणाली देखील प्रदान करेल.

Pakistan Nuclear Threat : पाकिस्तानची दुहेरी खेळी! एकीकडे अणु युद्धाची धमकी; दुसरीकडे मुनीरचा भारतविरोधी मोठा डाव?

Web Title: India israel investment deal implemented

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jul 05, 2026 | 02:00 PM

Topics:  

  • Israel
  • Trade News
  • World news

संबंधित बातम्या

PM Modi Indonesia Visit : चीनची खैर नाही! भारत-इंडोनेशिया ब्रह्मोस करार अंतिम टप्प्यात; PM मोदींच्या दौऱ्यात करारावर शिक्कोमोर्तब?
1

PM Modi Indonesia Visit : चीनची खैर नाही! भारत-इंडोनेशिया ब्रह्मोस करार अंतिम टप्प्यात; PM मोदींच्या दौऱ्यात करारावर शिक्कोमोर्तब?

Khamenei Funeral : खामेनेईंना अंत्यदर्शनासाठी इराणी नागरिकांची गर्दी; ‘अमेरिका मुर्दाबाद’ आणि ‘Kill Trump चे नारे 
2

Khamenei Funeral : खामेनेईंना अंत्यदर्शनासाठी इराणी नागरिकांची गर्दी; ‘अमेरिका मुर्दाबाद’ आणि ‘Kill Trump चे नारे 

Trump-Netanyahu Meet : ‘त्यांना माहितीय, Boss कोण आहे’ ; नेतन्यांहूशी भेटीपूर्वी ट्रम्प यांचे खळबळजनक विधान 
3

Trump-Netanyahu Meet : ‘त्यांना माहितीय, Boss कोण आहे’ ; नेतन्यांहूशी भेटीपूर्वी ट्रम्प यांचे खळबळजनक विधान 

PM Modi Threat : ऑस्ट्रेलिया दौऱ्यापूर्वी PM मोदींना जीवे मारण्याची धमकी? मेलबर्नमधील कार्यक्रमात घातपाताची शक्यता, तपास सुरु
4

PM Modi Threat : ऑस्ट्रेलिया दौऱ्यापूर्वी PM मोदींना जीवे मारण्याची धमकी? मेलबर्नमधील कार्यक्रमात घातपाताची शक्यता, तपास सुरु

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.