
Defence Ministers of India and Japan meet in Delhi Know the key agenda of the meeting between Rajnath Singh and Shinjiro Koizumi
इंडो-पॅसिफिक प्रदेशातील वेगाने बदलणाऱ्या भू-राजकीय घडामोडींच्या (Geopolitical Developments) आणि वाढत्या लष्करी आव्हानांच्या पार्श्वभूमीवर भारत आणि जपानमधील धोरणात्मक आणि संरक्षण संबंधांना एक नवी दिशा मिळाली आहे. जपानचे संरक्षण मंत्री शिंजीरो कोइझुमी (Shinjiro Koizumi) आपल्या पहिल्याच अधिकृत भारत दौऱ्यादरम्यान दिल्लीत पोहोचले असून, त्यांनी भारताचे संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांची भेट घेऊन दोन्ही देशांतील द्विपक्षीय संरक्षण सहकार्यावर सखोल चर्चा केली आहे. दोन्ही देशांचे मुख्य उद्दिष्ट एक मुक्त, खुला, सुरक्षित, लवचिक आणि समृद्ध इंडो-पॅसिफिक प्रदेश उभारणे हेच आहे.
जपानचे संरक्षण मंत्री कोइझुमी यांचा हा दौरा अतिशय व्यस्त आणि सामरिकदृष्ट्या महत्त्वाचा आहे. दिल्लीत दाखल होताच आर्मी पॅव्हेलियन आणि नॅशनल वॉर मेमोरियल येथे पुष्पहार अर्पण करून शूर सैनिकांना मानवंदना देण्यात आली. यानंतर संरक्षण मंत्री राजनाथ सिंह आणि शिंजीरो कोइझुमी यांच्यात दोन्ही देशांच्या तिन्ही सैन्यांमधील (थलसेना, नौदल, हवाई दल) परस्पर समन्वय वाढवण्याबाबत बैठक पार पडली. विशेष भोजनानंतर जपानचे संरक्षण मंत्री संध्याकाळी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचीही विशेष भेट घेणार आहेत.
जागतिक घडामोडी संबंधित बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा : Strait Of Hormuz: होर्मुझ सामुद्रधुनीत अमेरिकेचा ‘गुप्त मार्ग’; इराणी सैन्याला चकवून दररोज लाखो बॅरल तेलाची जागतिक बाजारात निर्यात
नवी दिल्लीतील बैठकीच्या एक दिवस आधी, जपानचे संरक्षण मंत्री मुंबईतील पश्चिम नौदल कमांडच्या (Western Naval Command) दौऱ्यावर होते. तिथे त्यांनी भारतीय नौदलाची परिचालन क्षमता, प्रादेशिक जबाबदाऱ्या आणि वाढत्या शक्तीची जवळून पाहणी केली. मुंबई दौऱ्यादरम्यान कोइझुमी यांनी नौदल प्रमुख ॲडमिरल कृष्ण स्वामिनाथन आणि पश्चिम नौदल कमांडच्या अधिकाऱ्यांशी महत्त्वपूर्ण चर्चा केली. त्यांनी नौदल गोदीतील ‘गौरव स्तंभा’वर पुष्पचक्र अर्पण केले तसेच भारताची स्वदेशी युद्धनौका ‘आयएनएस चेन्नई’ला (INS Chennai) भेट देऊन भारताच्या सागरी क्षमतेचे कौतुक केले.
Konichiwa Koizumi San! Happy to welcome my Japanese counterpart on his maiden visit to India. pic.twitter.com/x0WYK8Wu5d — Rajnath Singh (@rajnathsingh) August 20, 2026
credit – social media and Twitter
राजनाथ सिंह आणि शिंजीरो कोइझुमी यांच्यातील या महत्त्वपूर्ण संवादात प्रामुख्याने तीन मोठ्या मुद्द्यांवर लक्ष केंद्रित करण्यात आले:
१. सागरी सुरक्षा सहकार्य (Maritime Security): इंडो-पॅसिफिक क्षेत्रातील प्रमुख सागरी मार्गांची सुरक्षा सुनिश्चित करणे, अवैध हालचालींवर लक्ष ठेवणे आणि दोन्ही देशांच्या नौदलांमधील सराव व संयुक्त गस्त वाढवणे.
Welcome to India, Minister Koizumi @shinjirokoiz, Defense Minister of Japan! The 2-day program began yesterday with a visit to the Western Naval Command in Mumbai. Had fruitful discussions on advancing 🇯🇵🇮🇳 maritime cooperation. pic.twitter.com/g5TR95fNPa — ONO Keiichi, Ambassador of Japan (@JapanAmbIndia) August 20, 2026
credit – social media and Twitter
२. तंत्रज्ञान आणि ‘मेक इन इंडिया’: जपानने आपल्या ‘थ्री प्रिन्सिपल्स ऑन ट्रान्सफर ऑफ डिफेन्स इक्विपमेंट अँड टेक्नॉलॉजी’ या नियमांमध्ये सुधारणा केल्यामुळे आता भारताच्या ‘मेक इन इंडिया’ उपक्रमांतर्गत दोन्ही देश एकत्र येऊन संयुक्त संरक्षण उत्पादन (Joint Defence Production), हाय-टेक ड्रोन्स, सॅटेलाईट कम्युनिऑकेशन्स (UNICORN प्रणाली) आणि प्रगत लष्करी उपकरणांची निर्मिती करू शकतील.
जागतिक घडामोडी संबंधित बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा : Evergrande: चीनमधील सर्वात मोठ्या रिअल इस्टेट घोटाळ्यात ऐतिहासिक निकाल; एव्हरग्रांडे कंपनीवर 24,000 कोटींचा दंड; फाउंडरना जन्मठेप
३. भविष्यातील रोडमॅप: भारत आणि जपानमधील संरक्षण व सुरक्षा सहकार्याला कायदेशीर व संस्थात्मक स्वरूप देण्यासाठी एक स्पष्ट आणि दीर्घकालीन रोडमॅप तयार केला जात आहे.
जपानच्या पंतप्रधान सानो ताकेइची यांच्या नुकत्याच झालेल्या भारत दौऱ्यापाठोपाठ लगेचच जपानच्या संरक्षण मंत्र्यांचा हा भारत भेट दौरा होत आहे. यामुळे भारत आणि जपानमधील ‘विशेष धोरणात्मक आणि जागतिक भागीदारी’ (Special Strategic and Global Partnership) अधिक मजबूत होत असल्याचे स्पष्ट दिसत आहे.