Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • सोम, 17 ऑगस्ट 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • IND vs SL |
  • Politics |
  • NEET Exam |
  • maharashtra |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Maharashtra Breaking News Today 2026: राज्यात ऊन-पावसाचा खेळ; ५ जिल्ह्यांना मुसळधार पावसाचा यलो अलर्ट

राज्यातील उर्वरित जिल्ह्यांमध्ये तुरळक श्रावण सरी बरसण्याची शक्यता आहे. तर, काही भागांत ढगाळ वातावरण, तर काही ठिकाणी ऊन असे चित्र पाहायला मिळणार आहे. एकीकडे काही जिल्ह्यांत मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला असला, तरी अनेक भागांत पावसाचा जोर कमी असल्याने शेतकऱ्यांना दमदार पावसाची प्रतीक्षा कायम आहे.

  • By anuradha sagar
Updated On: Aug 17, 2026 | 09:24 AM
LIVE
Maharashtra Breaking News LIVE Updates Today:

Maharashtra Breaking News LIVE Updates Today:

Follow Us
Follow Us:
  • 17 Aug 2026 09:24 AM (IST)

    17 Aug 2026 09:24 AM (IST)

    Sunetra Pawar Emotional Pune Speech: सुनेत्रा वहिनी I Love You...; नेमकं घडलं काय?

    Sunetra Pawar Emotional Pune Speech:   पुण्यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने महिलांसाठी विशेष असलेल्या 'दादा उद्योजिनी अ‍ॅप'चे भव्य लोकार्पण करण्यात आले. मात्र, या कार्यक्रमात अ‍ॅपच्या लाँचिंगपेक्षाही सर्वाधिक चर्चा रंगली ती उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार आणि कार्यकर्त्यांमधील अत्यंत भावनिक संवादाची. उपस्थितांना संबोधित करताना सुनेत्रा पवार अजित पवारांच्या आठवणींनी चांगल्याच भावुक झाल्याचे पाहायला मिळाले.

    सुनेत्रा पवार यांच्या भाषणानंतर सभागृहातील वातावरण अतिशय संवेदनशील झाले होते., महिला कार्यकर्त्यांनी दिलेल्या "वहिनी आय लव्ह यू" या हाकेवर सुनेत्रा पवारांनीही हसत "आय लव्ह यू टू" म्हणत कार्यकर्त्यांना मोलाचा आधार दिला.  "माझ्या, तुमच्या आणि संपूर्ण महाराष्ट्राच्या मनात जी पोकळी निर्माण झालेली आहे, ती कोणीच कधीच भरून काढू शकत नाही. एका क्षणामध्ये आपण सर्वच पोरके झालो," अशा शब्दांत त्यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या.

  • 17 Aug 2026 09:18 AM (IST)

    17 Aug 2026 09:18 AM (IST)

    Mumbai High Court Clerk Exam Issue: लिपिक परीक्षेतील घोळावरून उच्च न्यायालयाकडून मध्यरात्री नोटीस

    Mumbai High Court Clerk Exam Issue:  मुंबई उच्च न्यायालयाच्या लिपिक (Clerk) भरतीसाठी आयोजित करण्यात आलेल्या ऑनलाईन परीक्षेत मोठ्या प्रमाणावर तांत्रिक त्रुटी आणि गोंधळ समोर आल्याने राज्यभरात परीक्षार्थी विद्यार्थ्यांनी आक्रमक पवित्रा घेतला आहे. अनेक परीक्षा केंद्रांवर सर्व्हर डाऊन होणे, संगणकांचे किबोर्ड नादुरुस्त असणे आणि अवघ्या १० मिनिटांत विद्यार्थी आपोआप 'लॉग आऊट' होऊन अपात्र ठरल्याच्या प्रकारांमुळे संतापलेल्या विद्यार्थ्यांनी विविध ठिकाणी ठिय्या आंदोलन सुरू केले आहे.विद्यार्थ्यांच्या या आंदोलनाला 'सेंटर फॉर जस्टिस अँड पीस'चे (CJP) अध्यक्ष अभिजित दीपके यांनी सक्रिय पाठिंबा दर्शवला आहे. दरम्यान, या संपूर्ण प्रकरणाची गंभीर दखल घेत मुंबई उच्च न्यायालयाने मध्यरात्री तातडीने नोटीस जारी केली आहे.

  • 17 Aug 2026 09:12 AM (IST)

    17 Aug 2026 09:12 AM (IST)

    West Asia Crisis Impact: पश्चिम आशियातील तणावामुळे एलपीजी तुटवडा 

    West Asia Crisis Impact: पश्चिम आशियामध्ये (West Asia) सुरू असलेल्या लष्करी आणि भू-राजकीय संघर्षामुळे परदेशातून आयात होणाऱ्या स्वयंपाकाच्या गॅसच्या (LPG) पुरवठ्यात अडथळे निर्माण झाले आहेत. त्यामुळे आता देशांतर्गत एलपीजीचे उत्पादन वाढवण्यासाठी केंद्र सरकारने एक ऐतिहासिक निर्णय घेतला आहे. सरकारने पहिल्यांदाच देशातील प्रत्येक रिफायनरी तसेच तेल आणि नैसर्गिक वायू उत्पादक कंपन्यांसाठी एलपीजी उत्पादनाचे कमाल दररोजचे लक्ष्य निश्चित केले आहे.

    पेट्रोलियम आणि नैसर्गिक वायू मंत्रालयाने (Ministry of Petroleum and Natural Gas) १३ ऑगस्ट रोजी जारी केलेल्या अधिकृत आदेशानुसार, देशातील २१ प्रमुख रिफायनरीज आणि अपस्ट्रीम कंपन्यांसाठी दररोज एकूण ६३,८१० टन एलपीजी उत्पादनाची क्षमता निश्चित करण्यात आली आहे. 

  • 17 Aug 2026 09:06 AM (IST)

    17 Aug 2026 09:06 AM (IST)

    CAG Report on Railway Drinking Water: रेल्वे स्थानकांवरील पिण्याच्या पाण्यात 'ई-कोलाय' जीवाणू; 'कॅग'चा अहवाल

    CAG Report on Railway Drinking Water:   रेल्वे स्थानकांवरील खाद्यपदार्थांचा निकृष्ट दर्जा आणि भेसळीचा मुद्दा कायम चर्चेत असतो. पण आता प्रवाशांच्या पिण्याच्या पाण्याच्या शुद्धतेबाबत एक अत्यंत धक्कादायक बाब समोर आली आहे. भारताचे नियंत्रक व महालेखापरीक्षक (CAG) यांनी संसदेत सादर केलेल्या ताज्या अहवालानुसार देशातील प्रमुख रेल्वे स्थानकांवरील 'वॉटर कूलर' आणि नळांच्या पिण्याच्या पाण्याच्या नमुन्यांमध्ये अतिशय घातक मानले जाणारे 'ई-कोलाय' (E. coli) जीवाणू आढळून आले आहेत. रेल्वे प्रशासनाच्या निष्काळजीपणावर कॅगने जोरदार ताशेरे ओढले आहेत. वैद्यकीय तज्ज्ञांनुसार, 'ई-कोलाय'युक्त दूषित पाणी प्यायल्याने अन्नविषबाधा (Food Poisoning), तीव्र अतिसार (Diarrhoea), पोटदुखी आणि गंभीर परिस्थितीत मूत्रपिंड (Kidney) निकामी होण्याचा मोठा धोका असतो.

  • 17 Aug 2026 09:00 AM (IST)

    17 Aug 2026 09:00 AM (IST)

    Chakan & Talegaon MIDC Infrastructure: चाकण, तळेगाव एमआयडीसीतील खड्डयांबाबत  उदय सामंत यांची मोठी घोषणा

    Chakan & Talegaon MIDC Infrastructure:   पुणे शहरालगतच्या चाकण आणि तळेगाव औद्योगिक वसाहतींमधील (MIDC) रस्त्यांची दुरवस्था, खड्डे, जीवघेणी वाहतूक कोंडी, अपुरे पार्किंग  यांसारख्या गंभीर समस्यामुळे  अनेक कंपन्यांनी बाहेरच्या राज्यात जाण्याचा निर्णय घेतला आहे. या मूलभूत समस्यांवर तोडगा काढण्यासाठ राज्य सरकारने अखेर कालबद्ध कृती कार्यक्रम जाहीर केला आहे.

    येत्या १० महिन्यांत उद्योजकांना अपेक्षित असलेल्या सर्व मूलभूत पायाभूत सुविधा पूर्ण केल्या जातील, अशी घोषणा उद्योगमंत्री उदय सामंत यांनी रविवारी  केली. येत्या १० महिन्यात चाकण आणि तळेगाव एमआयडीसी परिसरातील रस्त्यांचे काँक्रिटीकरण, खड्डेमुक्ती आणि वाहतूक कोंडींसारख्या समस्या दूर केल्या जातील, अशी ग्वाही सामंत यांनी दिली.

  • 17 Aug 2026 08:55 AM (IST)

    17 Aug 2026 08:55 AM (IST)

    Share Market Today: अशी होणार आठवड्याची सुरुवात! हे स्टॉक्स बदलू शकतात तुमचं नशिब,

    India Share Market Update: जागतिक बाजारातील संकेतांचा विचार करता, आज १७ ऑगस्ट रोजी भारतीय शेअर बाजाराचे प्रमुख निर्देशांक, सेन्सेक्स आणि निफ्टी ५०, घसरणीसह किंवा नकारात्मक पातळीवर उघडण्याची शक्यता तज्ज्ञांनी वर्तवली आहे. गिफ्ट निफ्टीच्या ट्रेंडनेही भारतीय बेंचमार्क निर्देशांकाची सुरुवात कमजोर असल्याचे संकेत दिले. गिफ्ट निफ्टी, निफ्टी फ्युचर्सच्या मागील बंद भावापेक्षा ५६.१ अंकांनी कमी होऊन, सुमारे २४,३९३.५ अंकांवर व्यवहार करत होता.

  • 17 Aug 2026 08:50 AM (IST)

    17 Aug 2026 08:50 AM (IST)

    Bombay High Court लिपिक टायपिंग परीक्षेत गोंधळ; संभाजीनगरात विद्यार्थ्यांचे ठिय्या आंदोलन

    Bombay High Court लिपिक पदाच्या टायपिंग परीक्षेदरम्यान राज्यभरात गोंधळाचे चित्र पाहायला मिळाले. 16 ऑगस्ट रोजी महाराष्ट्रातील विविध केंद्रांवर ही परीक्षा आयोजित करण्यात आली होती. मात्र, अनेक ठिकाणी तांत्रिक अडचणी आणि परीक्षा व्यवस्थेबाबत विद्यार्थ्यांकडून प्रश्न उपस्थित करण्यात आले. परीक्षेदरम्यान आलेल्या अडचणींमुळे विद्यार्थ्यांचे मोठे नुकसान झाल्याचा आरोप करण्यात आला. काही केंद्रांवर परीक्षा सुरळीत पार पडली नसल्याचे विद्यार्थ्यांचे म्हणणे असून, संबंधित यंत्रणेने या प्रकाराची चौकशी करून परीक्षा पुन्हा घ्यावी, अशी मागणी करण्यात येत आहे.

Maharashtra to National And International Breaking News:

Maharashtra Weather Alert: राज्यात सध्या काही भागांत पावसाने विश्रांती घेतली असली तरी, काही ठिकाणी पावसाचा जोर अद्याप कायम आहे. खास बाब म्हणाजे श्रावण मास सुरू झाल्यामुळे राज्यात ऊन-पावसाचा खेळ सुरू झाला आहे. गेल्या आठवडाभरात पावसाचा खंड पडल्याने शेतकऱ्यांची चिंता वाढली होती. पण आता पुन्हा एकदा हवामान विभागाने आज राज्यातील पाच जिल्ह्यांना मुसळधार पावसाचा यलो अलर्ट जारी केला आहे.

हवामान विभागाच्या अंदाजानुसार, आज पुणे, सातारा, कोल्हापूर, रायगड, रत्नागिरी या जिल्ह्यांमध्ये मुसळधार पावसाची शक्यता वर्तवली आहे. विशेषतः या जिल्ह्यांच्या घाटमाथ्यावर मुसळधार पाऊस कोसळण्याचा अंदाज आहे. त्यामुळे नागरिकांनी आवश्यक ती खबरदारी घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

Web Title: 17 august 2026 live breaking news marathi maharashtra politics sports crime national weather monsoon share market

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Aug 17, 2026 | 08:42 AM

Topics:  

  • India news
  • Maharashtra Politics
  • Mumbai News
  • navarashtra breaking news
  • pune news

संबंधित बातम्या

प्रदूषण रोखण्यासाठी महापालिकेचे ‘एआय’ अस्त्र! एअरवाईज प्रणालीद्वारे ७५ ठिकाणी हायपरलोकल सेन्सर्स; प्रशासनाचे सूक्ष्म नियोजन
1

प्रदूषण रोखण्यासाठी महापालिकेचे ‘एआय’ अस्त्र! एअरवाईज प्रणालीद्वारे ७५ ठिकाणी हायपरलोकल सेन्सर्स; प्रशासनाचे सूक्ष्म नियोजन

मुंबई हायकोर्ट लिपिक टायपिंग टेस्टमध्ये कल्याण केंद्रावर गोंधळ; विद्यार्थ्यांचे आंदोलन, पुनर्परीक्षेची मागणी
2

मुंबई हायकोर्ट लिपिक टायपिंग टेस्टमध्ये कल्याण केंद्रावर गोंधळ; विद्यार्थ्यांचे आंदोलन, पुनर्परीक्षेची मागणी

मुंबईसह छोट्या शहरांनाही वाहतूककोंडीचा विळखा; गर्दीच्या वेळी वाहनांचा वेग १५ किमीपर्यंत घटला
3

मुंबईसह छोट्या शहरांनाही वाहतूककोंडीचा विळखा; गर्दीच्या वेळी वाहनांचा वेग १५ किमीपर्यंत घटला

भाजप नेत्यांच्या नावाने खड्ड्यात कमळ सोडून निषेध; खड्डेमुक्त पुण्यासाठी शरद पवारांची राष्ट्रवादी आक्रमक
4

भाजप नेत्यांच्या नावाने खड्ड्यात कमळ सोडून निषेध; खड्डेमुक्त पुण्यासाठी शरद पवारांची राष्ट्रवादी आक्रमक

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.