Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Bigg Boss 19 |
  • Navratri |
  • Bihar Election 2025 |
  • Asia cup 2025 |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

India-Pakistan Ceasefire: भारत-पाकिस्तान युद्धबंदीवर जगातील प्रमुख देशांची प्रतिक्रिया; जाणून घ्या कोण काय म्हणाले?

भारत आणि पाकिस्तानमध्ये शनिवारी युद्धबंदीचा करार करण्यात आला. यानंतर दोन्ही देशांनी शस्त्रसंधीची घोषणा केली. दरम्यान शस्त्रसंधी लागू केल्यानंतर काही तासांतच पाकिस्तानने उल्लंघन केले.

  • By स्वराली शहा
Updated On: May 11, 2025 | 11:22 AM
India-Pakistan Ceasefire Reaction of major countries on the India-Pakistan ceasefire

India-Pakistan Ceasefire Reaction of major countries on the India-Pakistan ceasefire

Follow Us
Close
Follow Us:

नवी दिल्ली: पहलगाच्या हल्ल्यानंतर भारत आणि पाकिस्तानमध्ये तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. दोन्ही देशांनी एकमेकांवर हल्ले करण्यास सुरुवात केली होती. याच दरम्यान अमेरिकेच्या मध्यस्थीने भारत आणि पाकिस्तानमध्ये शनिवारी (10 मे) युद्धबंदीचा करार झाला. याअंतर्गत दोन्ही देशांनी सर्व प्रकारची लष्करी कारवाई थांबवण्याचे मान्य केले. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी सोशल मीडियावरुन भारत आणि पाकिस्तानच्या युद्धबंदीची घोषणा केली.

दरम्यान या युद्धबंदीनंतर ब्रिटन, जर्मनी, सौदी अरेबिया, युरोपियन युनियन यांसारख्या देशांनी आपल्या प्रतिक्रिया दिल्या आहेत. सर्व देशांनी भारत आणि पाकिस्तानमधील युद्धबंदी कराराचे स्वागत केले आहे. आपण जाणून घेऊयात कोणता देश काय म्हणला.

जागतिक घडामोडी संबंधित बातम्या- India-Pakistan Ceasefire: भारत-पाकिस्तान यूद्धविरामावर बांगलादेशची पहिली प्रतिक्रिया; युनूस यांनी कौतुक केले पण…

भारत पाकिस्तान युद्धबंदीवर जर्मनीची प्रतिक्रिया

भारत आणि पाकिस्तानच्या युद्धबंदीला जर्मनीने एक महत्वाचे आणि सकारात्मक पाऊल म्हटले आहे. जर्मनीने म्हटले की, दोन्ही देशांतील तणाव शिगेला पोहोचला होता. आता दोन्ही देशांनी युद्धबंदीला सहमती दर्शवली आहे. ही युद्धबंदी तणाव कमी करण्यासाठी महत्वाची ठरेल.

The ceasefire agreed between #India and #Pakistan is a first, important step out of the escalation spiral. Dialogue is key. The German government has been in contact with both sides in the past days. — GermanForeignOffice (@GermanyDiplo) May 10, 2025

युरोपियन युनियन

युरोपियन युनियनच्या परराष्ट्र व्यवहार आणि सुरक्षा धोरणाचे अधिकारी काजा कल्लास यांनी म्हटले की, भारत आणि पाकिस्तानने तमाव कमी करण्याच्या दिशेने एक महत्त्वपूर्ण पाऊल उचलले आहे. तसेच त्यांनी यासंबंधी पाकिस्तानचे परराष्ट्र मंत्री इशाक दार आणि भारताचे परराष्ट्र मंत्री एस. जयशंकर यांच्याशी चर्चा केल्याचेही म्हटले.

Just spoke again with @DrSJaishankar and @MIshaqDar50. The announced ceasefire between India and Pakistan is a vital step toward de-escalation. All efforts must be made to ensure it is respected. The EU remains committed to peace, stability, and counter-terrorism in the region. — Kaja Kallas (@kajakallas) May 10, 2025

सौदी अरेबियाने केले भारत आणि पाकिस्तानच्या निर्णयाचे स्वागत

सौदी अरेबियाने भारत आणि पाकिस्तानच्या युद्धबंदीच्या निर्णयाचे स्वागत केले आहे. तसेच दोन्ही देशांमधील शांतत प्रस्थापित होईल अशी आशा व्यक्त केली आहे.

#Statement | The Foreign Ministry welcomes the ceasefire agreement between the Islamic Republic of #Pakistan and the Republic of #India, optimistic that it will restore security and peace in the region. pic.twitter.com/f6AOefL9d1 — Foreign Ministry 🇸🇦 (@KSAmofaEN) May 10, 2025

भारत-पाक युद्धबंदीवर काय म्हणाला ब्रिटन?

ब्रिटनचे परराष्ट्र सचिव डेव्हिड लॅमी यांनी आपल्या सोशल मीडियावरील पोस्टमध्ये, भारत आणि पाकिस्तानच्या युद्धबंदीच्या निर्णयाचे स्वागत केले आहे. तसेच त्यांनी तणाव कमी करण्यासाठी हे पाऊल सर्वांच्या हिताचे आहे असे म्हटले आहे.

Today’s ceasefire between India and Pakistan is hugely welcome. I urge both parties to sustain this. De-escalation is in everybody’s interest. — David Lammy (@DavidLammy) May 10, 2025

पाकिस्तानने केले युद्धबंदीचे उल्लंघन

दरम्यान भारत आणि पाकिस्तानमध्ये युद्धबंदीची घोषणा झाल्यानंतर दोन्ही देशाच्या डीजीएमओनी चर्चा केली. दोन्ही देशांनी शस्त्रसंधी लागू केली. परंतु त्यानंतर काही तासांतच पाकिस्तानने शस्त्रसंधीचे उल्लंघन केले. पाकिस्तानने जम्मू आणि काश्मीरच्या आंतरराष्ट्रीय सीमेवर हल्ला केला. तसेच गुजरातच्या कच्छमध्येही हल्ला केला. परंतु भारताने या हल्ल्यांना चोख प्रत्युत्तर दिले.

जागतिक घडामोडी संबंधित बातम्या- अमेरिका, इराण, सौदी..; भारत-पाकिस्तान युद्धविरामासाठी ‘या’ देशांनी निभावली मध्यस्थीची भूमिका

Web Title: India pakistan ceasefire reaction of major countries on the india pakistan ceasefire

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: May 11, 2025 | 11:22 AM

Topics:  

  • Operation Sindoor
  • Pahalgam Terror Attack
  • World news

संबंधित बातम्या

नेपाळमध्ये भीषण रस्ता अपघात! चालकाचे नियंत्रण सुटल्याने बस थेट दरीत कोसळली अन्…; २ जणांचा मृत्यू
1

नेपाळमध्ये भीषण रस्ता अपघात! चालकाचे नियंत्रण सुटल्याने बस थेट दरीत कोसळली अन्…; २ जणांचा मृत्यू

बांगलादेशात पुन्हा हिंसाचार! आदिवासी विद्यार्थिनीवरील अत्याचारानंतर तीव्र संघर्ष; 3 ठार, अनेक जखमी
2

बांगलादेशात पुन्हा हिंसाचार! आदिवासी विद्यार्थिनीवरील अत्याचारानंतर तीव्र संघर्ष; 3 ठार, अनेक जखमी

China Aid : पूरग्रस्त पाकिस्तानला चीनकडून मदतीचा हात; रावळपिंडीत उतरली दोन विशेष विमाने
3

China Aid : पूरग्रस्त पाकिस्तानला चीनकडून मदतीचा हात; रावळपिंडीत उतरली दोन विशेष विमाने

आणखी एका देशात नेपाळसारखी परिस्थिती; सरकारच्या भ्रष्टाचाराविरोधी Gen Z तरुण उतरले रस्त्यावर
4

आणखी एका देशात नेपाळसारखी परिस्थिती; सरकारच्या भ्रष्टाचाराविरोधी Gen Z तरुण उतरले रस्त्यावर

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.