India-Pakistan Ceasefire: भारत-पाकिस्तान यूद्धविरामावर बांगलादेशची पहिली प्रतिक्रिया; युनूस यांनी कौतुक केले पण... (फोटो सौजन्य: सोशल मीडिया)
ढाका: भारत आणि पाकिस्तानमध्ये काही तासांपूर्वीच अमेरिकेच्या मध्यस्थीने युद्धविराम घडवून आणण्यात आला होता. भारताच्या परराष्ट्र मंत्रालयाचे सचिव विक्रम मिस्त्री यांनी भारत-पाकिस्तानमधील युद्धबंदी कराराची घोषणा केली होती. परंतु पाकिस्तानने युद्धविरामाचे उल्लंघन करत राजौरीमध्ये गोळीबार केला आहे. संपूर्ण राजौरीत ब्लॅकआऊट करण्यात आले आहे. आता भारत यावर काय प्रतिक्रिया देईल हे पाहणे अत्यंत महत्वाचे ठरणार आहे. पहलगाम हल्ल्यानंतर दोन्ही देशांत तीव्र तणाव निर्माण झाला होता.
याच दरम्यान युद्धविरामानंतर भारताचा शेजारी मित्र देश बांगलादेशची पहिली प्रतिक्रिया समोर आली. बांगलादेशच्या अंतरिम सरकारचे मुख्य सल्लागार मोहम्मद युनूस यांनी सोशल मीडिया प्लॅटफॉर्म एक्सवर ही प्रतिक्रिया दिली. युनूस यांनी आपल्या पोस्टमध्ये म्हटले की, “भारतीय पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि पाकिस्तानचे पंतप्रधान नरेंद्र मोदी शाहबाज शरीफ यांनी तात्काळ युद्धबंदीवर सहमती दर्शवली. चर्चेत सामील झाल्याबद्दल मी त्यांचे मनापासून कौतुक करतो.” तसेच युनूस यांनी डोनाल्ड ट्रम्प यांचेही कौतुक केले आहे. त्यांनी म्हटले आहे की, भारत आणि पाकिस्तानमध्ये प्रभावीपणे मध्यस्थीबद्दल मी अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प आणि परराष्ट्र मंत्री मार्को रुबियो यांचे कौतुक करतो.
I most sincerely commend Prime Minister Shri Narendra Modi of India and Prime Minister Shehbaz Sharif of Pakistan for agreeing to a ceasefire with immediate effect and to engage in talks. I would also like to express my deep appreciation to President Trump and Secretary of State…
— Chief Adviser of the Government of Bangladesh (@ChiefAdviserGoB) May 10, 2025
भारताच्या जम्मू आणि काश्मीरच्या पहलगाम येथे २२ एप्रिल २०२५ रोजी दहशतवाद्यांनी गोळीबार केली. या भयावह हल्ल्यात २८ निरापराध नागरिकांचा बळी गेला. या हल्ल्यानंतर भारताने दहशतवाद आणि त्यांना पोसणाऱ्या पाकिस्तानविरोधात आक्रमक भूमिका घेतली होती. दरम्यान भारताने ऑपरेशन सिंदूर अंतर्गत कारवाई करत पाकिस्तान आणि पाकव्याप्त काश्मीरमधील दहशतवाद्यांची ठिकाणे उद्ध्वस्त केली होती. या कारवाईने पाकिस्तान बिथरला होता. यानंतर पाकिस्तानने भारतावर हल्ले करण्यास सुरुवात केली होती. पाकिस्तान नियंत्रण रेषेवर गोळीबार (L0C) केला. तसे सीमावर्तीत प्रदेशांमध्ये ड्रोन हल्ले केले. परंतु भारताने हे हल्ले हाणून पाडले.
दरम्यान अमेरिकेच्या मध्यस्थीने भारत आणि पाकिस्तानमध्ये युद्धविराम करार करण्यात आला. त्यानंतर भारत आणि पाकिस्तान सरकारने याची पुष्टी केली. सायंकाळी पाच वाजल्यापासून शस्त्रसंधी लागू करण्यात आली होती. परंतु पाकिस्तनाने नुकत्याचा झालेल्या युद्धविराम कराराचे उलल्लंघन केले. पाकिस्तानने जम्मू आणि काश्मीरच्या आंतरराष्ट्रीय सीमेजवळ हल्ला केला आहे.