Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • सोम, 17 ऑगस्ट 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • IND vs SL |
  • Politics |
  • NEET Exam |
  • maharashtra |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Chenab River : 2030 पर्यंत पाकिस्तान होणार कोरडा; वाचा चिनाब नदीवरून कसा आवळला भारताने पाकड्यांच्या गळा?

India Vs Pakistan : भारत चिनाब नदीवर पाच धरणे बांधत असून, त्यामुळे पाकिस्तानला पाण्याच्या प्रत्येक थेंबासाठी तहानलेले राहावे लागत आहे, असा इशारा शहबाजच्या सल्लागाराने दिला आहे.

  • By हर्षदा पाटोळे
Updated On: May 13, 2026 | 05:30 PM
india pakistan chenab river dams dispute 2030 rana sanaullah threat

india pakistan chenab river dams dispute 2030 rana sanaullah threat

Follow Us
Follow Us:
  • पाकिस्तानचा पाणी टंचाईचा दावा
  • सिंधू पाणी करारावरून तणाव
  • युद्धाची आणि हल्ल्याची धमकी

India Pakistan Water Dispute 2026 : भारत आणि पाकिस्तान यांच्यातील संबंध (India Pakistan Water Dispute 2026) पुन्हा एकदा टोकाला गेले आहेत, पण यावेळी सीमावादापेक्षा ‘पाणी’ हा कळीचा मुद्दा ठरला आहे. पाकिस्तानचे पंतप्रधान शाहबाज शरीफ यांचे सल्लागार राणा सनाउल्ला यांनी नुकताच एक खळबळजनक दावा केला आहे. त्यांच्या मते, भारत चिनाब नदीवर वेगाने पाच मोठी धरणे बांधत असून, २०३० पर्यंत ही धरणे पूर्ण झाल्यावर पाकिस्तानला पाण्यासाठी भारताच्या दयेवर अवलंबून राहावे लागेल. भारताने सिंधू पाणी करार निलंबित केल्याच्या पार्श्वभूमीवर आलेले हे विधान दोन्ही देशांमधील ‘वॉटर वॉर’ची (Water War) नवी ठिणगी टाकणारे ठरले आहे.

पाकिस्तानातील शेतीवर महासंकट?

राणा सनाउल्ला यांनी एका टीव्ही चॅनलला दिलेल्या मुलाखतीत सांगितले की, भारताच्या या नियोजित धरणांमुळे पाकिस्तानची शेती, विशेषतः भातशेती पूर्णपणे उद्ध्वस्त होईल. चिनाब नदीचे पाणी पाकिस्तानच्या पंजाब प्रांतात मोठ्या प्रमाणावर वापरले जाते. भारताकडे आता चिनाब नदीचे पाणी अडवण्याची किंवा हवं तेव्हा अचानक सोडण्याची ताकद असेल. जर भारताने पाणी अडवले तर पाकिस्तानात दुष्काळ पडेल आणि जर अतिरिक्त पाणी सोडले, तर पाकिस्तानी हद्दीत महाभयंकर पूर येईल, अशी भीती त्यांनी व्यक्त केली आहे. भारत पाण्याचा वापर ‘शस्त्र’ म्हणून करत असल्याचा आरोपही त्यांनी यावेळी केला.

जागतिक घडामोडी संबंधित बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा : US-Iran War: इराणचा ‘गुप्त शिकारी’ तैनात! अमेरिकन नौदलाला ‘Narwhal’ धसका; वाचा काय आहेत याची थरारक वैशिष्ट्ये

धरण उडवून देण्याची धमकी आणि पाकिस्तानची रणनीती

पाकिस्तानची हतबलता इतकी वाढली आहे की, राणा सनाउल्ला यांनी थेट भारताचे बागलीहार धरण लक्ष्य करण्याची धमकी दिली आहे. “जर भारताने आमचा पाणीपुरवठा रोखला, तर ते युद्धाचे कृत्य मानले जाईल आणि आम्ही प्रत्युत्तर देऊ,” असे ते म्हणाले. या परिस्थितीला तोंड देण्यासाठी पाकिस्तान आता स्वतः चिनाब नदीच्या उगमस्थानी आणि इतर तीन-चार ठिकाणी भव्य जलाशय बांधण्याची योजना आखत आहे. या जलाशयांचा वापर भारताकडून सोडलेले जास्तीचे पाणी साठवण्यासाठी आणि भारताने पाणी रोखल्यावर पुरवठा करण्यासाठी केला जाईल. राष्ट्राध्यक्ष आसिफ अली झरदारी यांनाही या रणनीतीची माहिती देण्यात आली आहे.

تو اس میں کیا ھے سندھ طاس معاہدے کے تحت ، راوی ، ستلج اور بیاس کے پانی پر مکمل انڈیا کا حق ھے ڈیم بنائے یا اس کا رخ موڑے ، پاکستان کو اس سے کیا نا پاکستان کی زراعت ان دریاؤں کے پانی پر انحصار کرتی ھے ان دریاؤں کے پانی کی کمی سندھ ، جہلم اور چناب سے رابطہ نہریں نکال کر پوری کی… https://t.co/4fNDr66q99 — Aamir Hussain (@AAMIRHUSSAIN79) May 13, 2026

credit – social media and Twitter

सिंधू पाणी करार आणि भारताचा अधिकार

सिंधू पाणी कराराचा विचार केला तर, चिनाब नदीचे पाणी मुख्यत्वे पाकिस्तानला वाटप करण्यात आले आहे. मात्र, करारातील तरतुदींनुसार भारताला या नदीवर जलविद्युत प्रकल्प (Hydroelectric projects) उभारण्याचा आणि मर्यादित शेतीकामासाठी पाण्याचा वापर करण्याचा कायदेशीर अधिकार आहे. सध्या भारत बागलीहार आणि राटले सारखी मोठी धरणे बांधत आहे. भारताने करार निलंबित केल्यामुळे पाकिस्तानची कायदेशीर बाजू कमकुवत झाली आहे, ज्यामुळे शरीफ सरकारमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे.

जागतिक घडामोडी संबंधित बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा : Dirty Bomb: युद्धाचा नवा आणि सर्वात धोकादायक अंक; इराणचा ‘डर्टी बॉम्ब’ प्लॅन काय? 440 किलो युरेनियम आणि अमेरिकेची लष्करी तयारी

चिनाब नदी: पाकिस्तानची जीवनवाहिनी

९७४ किलोमीटर लांब असलेली चिनाब नदी हिमाचल प्रदेशात उगम पावते आणि जम्मू-काश्मीरमार्गे पाकिस्तानात प्रवेश करते. ही नदी सिंधू नदी प्रणालीचा कणा मानली जाते. पाकिस्तानच्या अर्थव्यवस्थेत आणि अन्नसुरक्षेत या नदीचा वाटा अत्यंत महत्त्वाचा आहे. जर भारताने खरोखरच २०३० पर्यंत ही पाचही धरणे पूर्ण केली, तर पाकिस्तानच्या जलसुरक्षेसमोर मोठे आव्हान उभे ठाकेल, यात शंका नाही.

Web Title: India pakistan chenab river dams dispute 2030 rana sanaullah threat

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: May 13, 2026 | 05:30 PM

Topics:  

  • India-Pakistan Conflicts
  • World news

संबंधित बातम्या

Ahoo Daryaei: ‘अन् तिने स्वतःच काढले कपडे…’; 2 वर्षांनंतर मैत्रिणीने केला इराणमधील आहू दराईबाबत अत्यंत धक्कादायक खुलासा
1

Ahoo Daryaei: ‘अन् तिने स्वतःच काढले कपडे…’; 2 वर्षांनंतर मैत्रिणीने केला इराणमधील आहू दराईबाबत अत्यंत धक्कादायक खुलासा

Indonesia Earthquake: इंडोनेशियामध्ये 24 तासांत 3 भूकंप, 2 देश हाय अलर्टवर; जाणून घ्या ‘या’ नैसर्गिक आपत्तीमागील वैज्ञानिक कारण
2

Indonesia Earthquake: इंडोनेशियामध्ये 24 तासांत 3 भूकंप, 2 देश हाय अलर्टवर; जाणून घ्या ‘या’ नैसर्गिक आपत्तीमागील वैज्ञानिक कारण

Belgium Gold Treasure: घराची भिंत फोडताच चमकले नशीब; बेल्जियममध्ये कामगारांना सापडला 99 कोटींचा सोन्याचा खजिना
3

Belgium Gold Treasure: घराची भिंत फोडताच चमकले नशीब; बेल्जियममध्ये कामगारांना सापडला 99 कोटींचा सोन्याचा खजिना

Africa Delivery Apps: आफ्रिकेत बिना-पत्त्याच्या डिलिव्हरीचा गोंधळ; भारतीय स्टार्टअप्सकडून ‘लोकेशन मॉडेल’ शिकण्याचा अहवालात सल्ला
4

Africa Delivery Apps: आफ्रिकेत बिना-पत्त्याच्या डिलिव्हरीचा गोंधळ; भारतीय स्टार्टअप्सकडून ‘लोकेशन मॉडेल’ शिकण्याचा अहवालात सल्ला

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.