Pakistan's sending goods from another country to India after the ban?
इस्लामाबाद: पहलगामच्या हल्ल्यानंतर भारताने ऑपरेशन सिंदूर मोहीम राबवत पाकिस्तान आणि पाव्याप्त काश्मीरमधील दहशतवाद्यांची ठिकाणाे उद्ध्वस्त केली. तसेच भारताने पाकिस्तानविरोधात इतर काही कारवाया देखील केल्या. भारताने पाकिस्तानसोबत असलेला सिंधू जल करार स्थगित केला आहे. तसेच पाकिस्तानसोबत असलेला व्यापारही रद्द केला आहे. यामुळे पाकिस्तान गोंधळात उडालेला आहे. परंतु एवढ्या कारवाया होऊनही पाकिस्तानच्या कुरापती सुरुच आहे. पाकिस्तानने आपला माल भारतात पाठवण्यासाठी तिसराच मार्ग निवडला आहे.
यामध्ये बाह्य देशाचे संबंध असल्याचे म्हटले जात आहे. मिळालेल्या माहितीनुसार भारताने डीआरआय अंतर्गत पाकिस्तानी व्यापार रोखण्यास सुरुवात केली आहे. याकारवाई दरम्यान भारताला धक्कादायक माहिती आढळून आली आहे. यामुळे भारताने तिसऱ्या देशांकडून येणाऱ्या मालाची कडक तपासणी सुरु केली आहे.
पाकिस्तान संयुक्त अरब अमेरितीच्या मदतीने आपला माल भारतात पोहोचवत आहे. भारतीय एक्सप्रेसच्या सराकरी अधिकाऱ्यानी दिलेल्या माहितीनुसार, पाकिस्तानमधून येणारे खजूर आणि सुकामेवा यूएईच्या मार्गाने भारतात येत असल्याचा संशय आहे. हा मुद्दा युएई सरकारमध्ये उपस्थित करण्यात आला आहे. परंतु यूएईने असा कोणताही व्यापार केला नसल्याचे म्हटले आहे.
इतर देशांमधून येणार्या मालासाठी रुल्स ऑफ ओरिजिन सर्टिफिकेट देण्याची तरदूत आहे. यावरुन हे लक्षात येते की, उत्पादन कोणत्या देशात उत्पादित झाले याची माहिती असते. परंतु पाकिस्तानचा तिसऱ्या देशांमधून येणारा माल हा रुल्स ऑफ ओरिजिन सर्टिफिकेटवर असतो. तरीही अनेकवळा पाकिस्तानचा माल ओळखणे कठीण जाते. यामुळे लेबलिंग तपाणसणी बारकाईने केली जाते.
२२ एप्रिल रोजी भारताच्या जम्मू आणि काश्मीरच्या पहलगाम येथे दहशतवादी हल्ला झाला होता. या हल्ल्यानंतर पाकिस्तानविरोधात भारताने आक्रमक पवित्रा स्वीकारला. तसेच पाकिस्तानविरोधी कारवाईअंतर्गत पाकिस्तानी वस्तूंवर बंदी घातली. अगदी पाकिस्तानी जहाजांना भारतीय बंदरावर थांबण्याची देखील परनावगी नाही. सध्या सरकार पाकिस्तानमधून येणाऱ्या प्रत्येक मालावार बारकाईने लक्ष ठेवून आहे. परंतु पाकिस्तान यूएईच्या मध्यस्थीने माल बारतात पाठवत असल्याचा संशय आहे. परंतु पाकिस्तान तिसऱ्या देशाच्या मध्यस्थीने माल बारतात पाठवत असल्याचा संशय आहे. तसेच असे काही पुरावे आढळून आल्यास त्या देशाविरोधातही कडक कारवाई केली जाईल असे अधिकाऱ्याने म्हटले आहे.