Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • बुध, 12 ऑगस्ट 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • IND vs SL |
  • Politics |
  • NEET Exam |
  • maharashtra |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Track 2 Dialogue: पाकिस्तानसोबत कोणतीही गुप्त चर्चा होत नाही; परराष्ट्र सचिव विक्रम मिस्री यांचे ‘ट्रॅक-2’ बैठकीवरील विधान चर्चेत

भारताचे परराष्ट्र सचिव, विक्रम मिस्री यांनी पाकिस्तानसोबतच्या गुप्त चर्चेसंदर्भात एक निवेदन जारी केले आहे. मिस्री म्हणाले की, कोलंबोमध्ये झालेल्या कथित बैठकीशी भारतीय सरकार असहमत आहे. त्या बैठकीत सरकारी प्रतिनिधी उपस्थित नव्हते.

  • By हर्षदा पाटोळे
Updated On: Jun 29, 2026 | 04:50 PM
india pakistan track 2 dialogue colombo foreign secretary vikram misri statement secret talks

india pakistan track 2 dialogue colombo foreign secretary vikram misri statement secret talks

Follow Us
Follow Us:
  • गुप्त चर्चेचे दावे फेटाळले
  • ‘ट्रॅक-२’ बैठकीशी सरकारचा संबंध नाही
  • वैयक्तिक स्तरावर सहभाग

India Pakistan Track 2 dialogue Colombo 2026 : भारत आणि पाकिस्तान (India-Pakistan relation) यांच्यातील संबंधांविषयी नेहमीच जगभरात उत्सुकता आणि तणाव पाहायला मिळतो. मे २०२५ पासून दोन्ही देशांमधील अधिकृत चर्चा (Track-1 Dialogue) पूर्णपणे ठप्प झाल्यानंतर, आता पडद्यामागे काही गुप्त हालचाली सुरू आहेत का? असा प्रश्न आंतरराष्ट्रीय वर्तुळात चर्चिला जात होता. यातच श्रीलंकेची राजधानी कोलंबो येथे दोन्ही देशांमधील नेत्यांची आणि माजी अधिकाऱ्यांची एक गुप्त बैठक पार पडल्याचा दावा काही माध्यमांनी केला होता. या तथाकथित ‘ट्रॅक-२’ (Track-2) बैठकीवरून सुरू असलेल्या वादावर आता भारताचे परराष्ट्र सचिव विक्रम मिस्री यांनी अधिकृतपणे मौन सोडले असून, केंद्र सरकारची भूमिका अत्यंत स्पष्ट शब्दांत मांडली आहे.

परराष्ट्र सचिव विक्रम मिस्री यांनी स्पष्ट केले की, भारत आणि पाकिस्तान यांच्यात सुरू असलेल्या तथाकथित ‘ट्रॅक-२’ संवादात भारत सरकारचा कोणताही अधिकृत सहभाग, पाठिंबा किंवा कोणतीही भूमिका नाही. नवी दिल्ली येथे एका प्रश्नाला उत्तर देताना त्यांनी सांगितले की, या प्रकारच्या आंतरराष्ट्रीय कार्यक्रमांमध्ये किंवा अनौपचारिक बैठकांमध्ये सहभागी होणारे भारतीय नागरिक हे पूर्णपणे त्यांच्या वैयक्तिक क्षमतेनुसार उपस्थित राहत असतात. अशा बैठकांमध्ये त्यांनी मांडलेली मते ही त्यांची वैयक्तिक मते आहेत. ती मते म्हणजे भारत सरकारची अधिकृत भूमिका किंवा धोरण अजिबात मानले जाऊ नये. या बैठकांना सरकारच्या दृष्टीने कोणतेही विशेष महत्त्व नाही, असेही त्यांनी स्पष्ट केले.

जागतिक घडामोडी संबंधित बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा : Indian Navy: चीनच्या ‘स्ट्रिंग ऑफ पर्ल्स’ला भारताचे चोख उत्तर; सेशेल्सच्या असम्प्शन बेटावर नौदल तळ उभारण्याबाबत मोठी घडामोड

कोलंबो बैठकीत नेमके काय घडले आणि भारताचा आक्षेप काय?

परराष्ट्र सचिवांनी सांगितले की, त्यांनी या संदर्भातील काही अहवाल आणि बातम्या पाहिल्या आहेत. पाकिस्तानच्या बाजूने या बैठकीत कोण आले होते याबद्दल अधिकृत माहिती नसली, तरी कोलंबोमध्ये ज्या बैठकीबद्दल चर्चा सुरू आहे, त्यात भारताकडून अधिकृतपणे कोणताही सरकारी प्रतिनिधी किंवा अधिकारी सहभागी झाला नव्हता. या बैठकीत केवळ काही निवृत्त अधिकारी आणि नागरी समाजातील (Civil Society) प्रतिष्ठित लोक सहभागी झाले होते. विक्रम मिस्री यांनी थेट शब्दांत सांगितले की, अशा अनौपचारिक मंचांवरून समोर येणाऱ्या विधानांशी आणि निष्कर्षांशी भारत सरकार अजिबात सहमत नाही.

यापूर्वी, राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे (RSS) ज्येष्ठ नेते राम माधव यांनीही या ट्रॅक-२ बैठकीवरून निर्माण झालेल्या वादाला पूर्णपणे फेटाळून लावले होते. विशेष म्हणजे, कोलंबोमध्ये झालेल्या या कथित बैठकीला राम माधव स्वतः उपस्थित होते. प्रसारमाध्यमांमध्ये आणि राजकीय वर्तुळात या विषयावर विनाकारण उलटसुलट चर्चा करून हा मुद्दा वाढवू नये, असे आवाहन त्यांनी केले. भारत आणि पाकिस्तान या दोन्ही देशांमधील तणाव पाहता अशा प्रकारच्या अनौपचारिक बैठकांकडे संशयाने पाहिले जात असल्याने त्यांनी ही प्रतिक्रिया दिली.

Breaking
Foreign secretary Vikram Misri reacts on reports of India, Pakistan track 2
“far as the Government of India is concerned, there is no official participation, no official support or involvement, in these visits” pic.twitter.com/xFaIr0oOSj — Sidhant Sibal (@sidhant) June 29, 2026

credit – social media and Twitter

जागतिक घडामोडी संबंधित बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा : Israel-Turkey Conflict: इस्रायलच्या ‘त्या’ निर्णयाने तुर्कीला संताप अनावर; पहिल्या महायुद्धातील ‘या’ घटनेवरून जागतिक राजकारण तापले

काय आहे ‘ट्रॅक-२’ बैठक आणि ती का ठरली चर्चेचा विषय?

भारत आणि पाकिस्तान यांच्यात अधिकृत राजनैतिक चर्चा म्हणजेच ‘ट्रॅक-१’ संवाद गेल्या बऱ्याच काळापासून, विशेषतः मे २०२५ पासून पूर्णपणे बंद आहे. अशा परिस्थितीत दोन्ही देशांमधील तणाव कमी करण्यासाठी गुप्तपणे किंवा अनौपचारिक मार्गाने प्रयत्न सुरू असल्याचा दावा नुकताच एका आंतरराष्ट्रीय अहवालात करण्यात आला होता. या पार्श्वभूमीवर कोलंबो येथे ‘इंटरनॅशनल इन्स्टिट्यूट फॉर स्ट्रॅटेजिक स्टडीज’ (IISS) या संस्थेने एका बैठकीचे आयोजन केले होते, ज्याला ‘ट्रॅक-२’ संवाद असे म्हटले जाते.

या बैठकीला भारताच्या बाजूने आरएसएस अधिकारी आणि इंडिया फाउंडेशनचे सदस्य राम माधव, भारताचे माजी लष्करप्रमुख जनरल एम. एम. नरवणे आणि माजी राजनैतिक अधिकारी रुची घनश्याम उपस्थित होते. तर दुसरीकडे, पाकिस्तानच्या बाजूने आयएसआय (ISI) चे माजी अधिकारी अली खान पतौदी, माजी मंत्री शेरी रहमान आणि पाकिस्तानी परराष्ट्र मंत्रालयाचे अधिकारी सज्जाद हैदर खान या बैठकीला उपस्थित असल्याची माहिती समोर आली होती. दोन्ही बाजूंच्या एवढ्या मोठ्या आणि महत्त्वाच्या व्यक्ती एकत्र आल्यामुळेच भारत सरकार पाकिस्तानसोबत गुप्त वाटाघाटी करत असल्याच्या चर्चांना उधाण आले होते, ज्यावर आता परराष्ट्र सचिवांनी पूर्णविराम लावला आहे.

Web Title: India pakistan track 2 dialogue colombo foreign secretary vikram misri statement secret talks

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jun 29, 2026 | 04:50 PM

Topics:  

  • India-Pakistan Conflict
  • India-Pakistan relation
  • World news

संबंधित बातम्या

Colombia Earthquake : कोलंबियाला 7.4 तीव्रतेच्या भूकंपाचा तडाखा; 160 हून अधिक जणांचा मृत्यू, हजारो बेपत्ता
1

Colombia Earthquake : कोलंबियाला 7.4 तीव्रतेच्या भूकंपाचा तडाखा; 160 हून अधिक जणांचा मृत्यू, हजारो बेपत्ता

Ebola Virus: खतरनाक! ४,३८१ रुग्ण, २,०११ मृत्यू…; काँगोमध्ये इबोलाचा विक्रमी वेगाने फैलाव, आरोग्य यंत्रणेसमोर मोठे आव्हान
2

Ebola Virus: खतरनाक! ४,३८१ रुग्ण, २,०११ मृत्यू…; काँगोमध्ये इबोलाचा विक्रमी वेगाने फैलाव, आरोग्य यंत्रणेसमोर मोठे आव्हान

Netanyahu Vs Trump: इस्रायलचा युद्धाबाबत कठोर पवित्रा! गाझा करारावरून Israel-US आमनेसामने; नेतान्याहूंच्या एका निर्णयाने खळबळ
3

Netanyahu Vs Trump: इस्रायलचा युद्धाबाबत कठोर पवित्रा! गाझा करारावरून Israel-US आमनेसामने; नेतान्याहूंच्या एका निर्णयाने खळबळ

Mecca Pact :एकाच वेळी सहा-बाजूंनी ‘युद्धात’ अडकला आहे पाकिस्तान; करारानंतरही सौदीचा पैसा अन् तुर्कीची लष्करी मदतही ठरणार निष्फळ
4

Mecca Pact :एकाच वेळी सहा-बाजूंनी ‘युद्धात’ अडकला आहे पाकिस्तान; करारानंतरही सौदीचा पैसा अन् तुर्कीची लष्करी मदतही ठरणार निष्फळ

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.