Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • गुरु, 8 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ind vs WI |
  • asian games 2026 |
  • entertainment |
  • bigg boss 20 |
  • crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

India Russia Relations : भारत नेहमीच…; रशियन मंत्र्यांचा पाश्चात्य देशांना टोला; तेलाच्या मुद्द्यावरुन अमेरिकेला सुनावलं

India Russia Relations : रशियाच्या परराष्ट्र मंत्र्यांनी भारताच्या परराष्ट्र धोरणाचे कौतुक केले आहे. तसेच पाश्चात्य देश आणि अमेरिकेला तेलाच्या व्यापारावरुन कडक शब्दात सुनावलं आहे.

  • By स्वराली शहा
Updated On: May 13, 2026 | 11:59 AM
Minister of Foreign Affairs of the Russian Federation Sergey Lavrov

Minister of Foreign Affairs of the Russian Federation Sergey Lavrov

Follow Us
Follow Us:
  • रशियन मंत्र्यांचा पाश्चात्य देशांना टोला
  • तेल व्यापारावरुन अमेरिकेला सुनावलं
  • जाणून घ्या नेमकं काय प्रकरण आहे?
India Russia Relations News in Marathi : जागतिक राजकारणात पुन्हा एकदा भारत आणि रशियाच्या दृढ संबंधाची चर्चा सुरु झाली आहे. रशियाचे परराष्ट्र मंत्री सर्गेई लाव्हरोव यांनी तेलाच्या व्यापारावरुन मोठे विधान केले आहे. त्यांनी पाश्चात्य देशांच्या विशेष करुन अमेरिकेच्या डिक्टेटरशिपवर कडक शब्दांत टीका केली आहे. तर भारताच्या परराष्ट्री धोरणाचे तोंडभरुन कौतुक केले आहे.

Russian Oil : भारत रशिया मैत्रीत मिठाचा खडा? सवलत बंद करुन रशियाने वाढवले तेलाचे भाव

पाश्चात्य देशांना लगावला टोला

एका विशेष मुलाखतीदरम्यान सर्गेई लाव्हरोव यांनी पाश्चात्य देशांवर गंभीर आरोप केले आहेत. त्यांच्या मते, अमेरिका (America) आणि त्याचे मित्र राष्ट्र अजूनही जुन्या वसाहतवादी मानसिकतेत आहेत. दुसऱ्या देशांवर स्वत:च्या अटी लादणे आणि त्यांच्या उर्जा गरजांवर नियंत्रण मिळवण्याचा प्रयत्न करणे ही लोकशाही नसल्याचे लावरोव यांनी म्हटले.

ते पुढे असेही म्हणाले की, अमेरिका भारतासारख्या देशांना रशियाकडून स्वस्त तेल खरेदी करणे बंद करण्यास सांगून स्वत: महागडे तेल विकण्याचा प्रयत्न करत आहे. हा एक प्रकारे अनुचित व्यापार खेळ असल्याचा आरोप लावरोव यांनी केला आहे.

भारताच्या ठाम भूमिकेला रशियाचा पाठिंबा

गेल्या दोन वर्षात भारताने रशियाकडून कच्चा तेलाची आयात मोठ्या प्रमाणावर केली आहे. पाश्चात्य देशांच्या निर्बंधाची भीती न बाळगता राष्ट्रीय हिताला भारताने प्राधान्य दिले आहे. लावरोव यांनी भारताच्या या भूमिकेचे कौतुक केले आहे. भारत नेहमीच आपल्या बाजारपेठेच्या गरजा आणि जनतेचे हित पाहून निर्णय घेतो, कोणच्या दबावाला बळी पडत नाही असे त्यांनी स्पष्ट शब्दांत सांगितले. यावरुन भारत आणि रशियाचे संबंध (India Russia Relations) किती दृढ आहे.

जागतिक उर्जा संकट

ऑक्टोबर २०२५ मध्ये अमेरिकेने रोसनेफ्ट आणि लुकोइल सारख्या रशियन कंपन्यांवर निर्बंध लादले होते. यामुळे आयातीत मोठ्या प्रमाणात रखडली होती. तसेच पश्चिम आशियातील तणावामुळे जागतिक उर्जा बाजारातही मोठी अस्थिरता निर्माण झाली आहे.  अमेरिकेने काही निर्बंधात १६ मे पर्यंत सुट दिली आहे, यामुळे भारताला काही दिलासा मिळाला आहे. यामुळे रशियाकडून सवलतीच्या दरात तेल आयात करणे सोपे होईल असे तज्ज्ञांचे म्हणणे आहे.

India Russia Relations : पुतिनने मोदींच्या पाठीत खुपसला खंजीर? युद्धजन्यपरिस्थितीत पाकिस्तानला मदत तर भारताला आठकाडी

💡

Frequently Asked Questions

  • Que: रशियाच्या परराष्ट्र मंत्र्यांनी पाश्चात्य देशावर काय टीका केली?

    Ans: रशियाचे परराष्ट्र मंत्री यांनी अमेरिका आणि पाश्चात्य देशांच्या भूमिकेला जुन्या वसाहतीवादी मानसिकतेचे मानले आहे. त्यांच्या मते हे देश दुसऱ्या देशांवर आपल्या अटी लाहण्याचा आणि जागतिक उर्जा बाजारावर ताबा मिळवण्याचा प्रयत्न करत आहेत. भारताला रशियन तेल स्वस्त दरात मिळण्यापासून रोखण्याचा डाव आहे.

  • Que: रशियन तेल खरेदीवर भारताची भूमिका काय आहे?

    Ans: भारताने नेहमीच स्पष्ट केले आहे की, तेल खरेदीचा निर्णय हा राष्ट्रीय हितानुसार आणि बाजारपेठेच्या गरजेनुसार खरेदी करतो. यामुळे कोणत्या देशाकडून तेल खरेदी करायचे याचा निर्णय भारत स्वत: घेतो, कोणाच्या दबावाखाली नाही.

Web Title: India russia relations russian minister slams west over oil trade

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: May 13, 2026 | 11:23 AM

Topics:  

  • America
  • India Russia relations
  • Russia
  • World news

संबंधित बातम्या

Hormuz Crisis:तेलाच्या मार्गावर पुन्हा हल्ला; Hormuzजवळ जहाजाला आग, 11 भारतीय जखमी
1

Hormuz Crisis:तेलाच्या मार्गावर पुन्हा हल्ला; Hormuzजवळ जहाजाला आग, 11 भारतीय जखमी

World News:तेलाचा भाव १०० डॉलरपार,जगाला महागाईचा झटका; पेट्रोल-डिझेलपासून वाहतुकीपर्यंत वाढणार दबाव
2

World News:तेलाचा भाव १०० डॉलरपार,जगाला महागाईचा झटका; पेट्रोल-डिझेलपासून वाहतुकीपर्यंत वाढणार दबाव

भारतीय कुस्तीपटूंच्या स्वप्नांना ब्रेक? अमेरिकेने व्हिसा नाकारल्याने U23 वर्ल्ड चॅम्पियनशिपपूर्वी खळबळ
3

भारतीय कुस्तीपटूंच्या स्वप्नांना ब्रेक? अमेरिकेने व्हिसा नाकारल्याने U23 वर्ल्ड चॅम्पियनशिपपूर्वी खळबळ

Taiwan-China : तैवानजवळ चीनची लष्करी हालचाल; १४ लढाऊ विमानांसह ८ जहाजांची घुसखोरी, तणाव वाढला
4

Taiwan-China : तैवानजवळ चीनची लष्करी हालचाल; १४ लढाऊ विमानांसह ८ जहाजांची घुसखोरी, तणाव वाढला

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.