India-Russia Relations: व्लादिमिर पुतिन यांची भारतीयांना भेट; 2025 पासून रशियात होणार व्हिसा फ्री एन्ट्री
मास्को: भारत-रशियाच्या मैत्रीपूर्ण संबंधाची चर्चा सध्या जगभर सुरु आहे. पंतप्रधान मोदी आणि रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमिर पुतिन दोन्ही देशांतील संबंध दृढ करण्यावर चर्चा करत असतात. यामुळे भारत आणि रशिया संबंध अधिक बळकट होत चालले आहे. भारताला भेट देणार आहेत. या मैत्रीचा आणखी एक महत्त्वाचा टप्पा पुढे आला आहे. 2025 पासून भारतीय नागरिक रशियामध्ये व्हिसाशिवाय प्रवास करू शकतील. तसेच व्लादिमिर पुतिन 2025 च्या सुरूवातील भारत दौऱ्यावर येणार असल्याचे देखील म्हटले जात आहे.
2023 मध्ये झाली होती चर्चा
इंग्रजी वृत्तपत्राने दिलेल्या माहितीनुसार, रशियाचे नवीन व्हिसा नियम लागू झाल्यानंतर भारतीय नागरिकांना रशियात व्हिझा फ्री एन्ट्री मिळणार आहे. मिळालेल्या माहितीनुसार, जून 2023 मध्ये भारत आणि रशियाने परस्पर व्हिसा निर्बंध कमी करण्यासाठी चर्चा केली होती. सध्या भारतीय नागरिक रशियाच्या ई-व्हिसासाठी पात्र आहेत.
2023 मध्ये एकूण 9500 भारतीय प्रवाशांना रशियाकडून ई-व्हिसा मिळाला होता. ही संख्या 2022 च्या तुलनेने अधिक होती. तसेच यामध्ये रशियाला भेट देणारे भारतीय प्रवासी व्यापारी आणि पर्यटनाचे प्रमाण अधिक होते. सध्या रशियात चीन आमि इराणच्या नागरिकांना व्हिसा फ्री प्रवेश मिळतो.या यादीत भारताचा देखील समावेश होण्याची शक्यता आहे. हा निर्णय भारत आणि रशियाच्या मैत्रीपूर्ण संबंधांमुळे महत्त्वाचा ठरणार असल्याचे तज्ञांनी म्हटले आहे.
भारत-रशिया मैत्रीपूर्ण संबंध
काही दिवसांपूर्वी भारताचे संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी रशियाला भेट दिली होती. भारतीय नौदलामध्ये नवीन मल्टी-रोल स्टेल्थ गाइडेड मिसाईल फ्रिगेट ‘INS तुशील’चा समावेश करणे आणि भारत-रशिया यांच्यातील 21व्या आंतर-सरकारी लष्करी व तांत्रिक सहकार्य बैठकीत भाग घेण्यासाठी ते गेले होते. यादरम्यान त्यांनी पुतिन यांची देखील भेट घेतली. या दौऱ्याचा उद्देश भारत-रशिया संरक्षण सहकार्य अधिक दृढ करणेहोता.
या दौऱ्यामुळे भारत आणि रशियामधील द्विपक्षीय संबंध आणि लष्करी भागीदारी नव्या उंचीवर पोहोचेल, आहेत. भारत-रशिया संबंध केवळ व्यापार किंवा संरक्षण पुरवठ्यापुरते मर्यादित नसून, आता पर्यटन, सांस्कृतिक देवाणघेवाण आणि नागरिकांच्या सहज प्रवासाच्या दृष्टीनेही बळकट होत आहेत. याशिवाय भारतीयांसाठी रशियाची व्हिसा फ्री एंट्री जागतिक स्तरावर भारताच्या वाढत्या महत्त्वाचीही ओळख आहे.