
India seek to buy russia's s-500 air defensecs during putin India Visit
Vladimir Putin भारतात येण्यापूर्वी ट्रम्पच्या सल्लागारांची घेणार भेट; काय आहे कारण?
सध्या भारताकडे रशियाची S-400 ही संरक्षण प्रणाली आहे. या संरक्षण प्रणाली भारताला पाकिस्तानविरुद्ध युद्धात आणि ऑपरेशन सिंदूर दरम्यान महत्त्वपूर्ण साथ दिली होती. या प्रणालीमुळे भारताने केवळ काही मिनिटांतच पाकिस्तानच्या हवाई हल्ल्यांना हाणून पाडले होते. ड्रोन, क्रूझ मिसाईल्स, फायटर जेट्स सर्वांना एका क्षणात या प्रणाली उद्ध्वस्त केले होते. यामुळे भारताने लगेचच या प्रणालीचे आणखी पाच रेजिमेंट्स खरेदीचा निर्णय घेतला. सध्या याची डिलिव्हरी सुरु आहे.
याच पार्श्वभूमीवर आता रशियाच्या S-400 चा उत्तराधिकारी S-500 भारत खरेदी करणार असल्याचीही जोरदार चर्चा सुरु आहे. पुतिन यांच्या भारत भेटीत या प्रोडक्शनचा प्रस्ताव भारताला मिळण्याची शक्यता आहे. भारताची DRDO आणि रशियाच्या अल्माज एंटे कंपनीत आणि खाजगी संरक्षण कंपन्यां मिळून S-500 च्या भारतात सह-उत्पादना करण्याची शक्यता आहेत. हा करार झाल्यास भारत आणि रशियामध्ये सर्वात मोठा संरक्षण सहकार्य निर्माण होईल.